पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अं ते। । आ । आपटे, प्रदीप विनायक संरक्षण खंड आपटे, प्रदीप विनायक फ्लाइट लेफ्टनंट वायुसेना वीरचक्र २७ ऑगस्ट १९४५ - ४ डिसेंबर १९७१ | प्रदीप विनायक आपटे यांचा जन्म मुंबई येथे झाला. दि. २९ ऑक्टोबर १९६६ रोजी त्यांना पहिले कमिशन मिळाले. १९७१ च्या पाकिस्तान युद्धामध्ये प्रदीप आपटे लढाऊ बॉम्बर स्क्वॉड्रनमध्ये होते. त्यांच्यावर शत्रूच्या अंतर्गत रचनेवर टेहळणी करणा-या विमानाची जबाबदारी होती. | दि. ४ डिसेंबर १९७१ रोजी त्यांना नया चोर, उमरकोट, धोरनारो या टापूत धोरनारो रेल्वे स्थानकाकडे शत्रूच्या वाहनांचा ताफा जाताना दिसला. त्यांनी त्वरित त्या ताफ्यावर थेट हल्ला चढवला. पुढील मोहिमेत त्यांना धोरनारो रेल्वे स्थानकाकडे येणारी मालगाड़ी दिसली. त्यांनी त्या मालगाडीवर हल्ला चढविला. शत्रूकडून जमिनीवरून प्रखर प्रतिकार होत असतानादेखील, त्यांनी मालगाडीच्या अनेक वाघिणींचा विध्वंस केला. तिस-या वेळी परतत असताना जमिनीवरून होणा-या प्रतिहल्ल्यात शत्रूने त्यांच्या विमानाचा वेध घेतला. आपल्या क्षतिग्रस्त विमानावर नियंत्रण राखून त्यांनी तेथून १६० कि.मी. अंतरावर असलेल्या तळाकडे कूच केले. अशक्यप्राय परिस्थितीमध्ये त्यांनी विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु त्यांना मृत्यू आला. त्यांच्या पराक्रमासाठी त्यांना मरणोत्तर वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. ५०२ शिल्पकार चरित्रकोश