पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड अंभोरे, भिवासन लक्ष्मण अं ते अं ते आ । आ । अंभोरे, भिवासन लक्ष्मण भूसेना - सुभेदार मेजर वीरचक्र २२ मे १९३६ भिवासन लक्ष्मण अंभोरे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील रायगड या खेड्यात झाला. दि. २२ एप्रिल १९५१ रोजी बॉय' म्हणून ते भूसेनेत रुजू झाले. माउण्टन डिव्हिजनच्या खेमकरण विभागात नायब सुभेदार म्हणून कार्यरत होते. सैनिकांच्या एका कंपनीचे म्हणजे सुमारे २४० सैनिकांचे ते त्यावेळी प्रमुख होते. शत्रूच्या प्रदेशात, त्यांनी त्यांच्या या पथकासह तीन वेळा टेहाळणी करून शत्रूची उपयुक्त माहिती मिळवली. | दि. १७ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानी सैन्याने रनगाडे आणि मशीनगन्स घेऊन अंभोरे यांच्या तुकडीवर हल्ला केला, तेव्हा अंभोरे यांनी प्रत्येक खंदकात शिरून आपल्या जवानांना धीर दिला. शत्रूशी निकराने लढून हल्ला परतवून लावण्यासाठी उत्तेजन दिलं. त्याच दिवशी दुपारी, पुन्हा पाक सैन्याने जोरदार हल्ला चढवला. शत्रू केवळ १८ यावर येऊन ठेपला होता. अशा वेळी ते आपल्या एका तुकडीसह पुढच्या खंदकाकडे गेले आणि तिथून त्यांनी शत्रूवर गोळीबार सुरू केला. अशा प्रकारे अंभोरे यांनी धैर्य, कुशल नेतृत्वाची चुणूक दाखवत, शत्रूला जोराचा तडाखा देत मागे हटवले. या कामगिरीसाठीच भिवासन लक्ष्मण अंभोरे यांना ‘वीरचक्र' प्रदान करण्यात आले. | ५ , अडिसरे गजानन नारायण भूसेना - मेजर वीरचक्र ४ नोव्हेंबर १९१८ | यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. राजाराम विद्यालय, कोल्हापूर व बेहॉन स्मिथ, बेळगाव येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दि. १८ फेब्रुवारी १९३८ पासून भारतीय भूसेनेत सेवा करण्यास सुरुवात केली. १ जून १९४८ रोजी त्यांना पहिले कमिशन मिळाले. शिल्पकार चरित्रकोश ५०१