पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सामंत, मोहन नारायण संरक्षण खंड आणि वाहतूक विभागाचे महासंचालक म्हणून नेमणूक झाली. पुढे तीन वर्षांसाठी त्यांची राष्ट्रपतींचे ए.डी.सी. म्हणून नेमणूक झाली. मार्च १९८४ मध्ये ते सेनादलातून निवृत्त झाले. यशवंत सहस्त्रबुद्धे यांना १९८३मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. याशिवाय त्यांना ‘भोसला भूषण’(१९८७), ‘शस्त्रपूजक सावरकर पुरस्कार’(२००६), तसेच ‘फर्गसन अभिमान पुरस्कार’ (२००८) मिळाले आहेत. १९८४मध्ये सेवानिवृत्तीनंतर ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. डेक्कन जिमखाना स्पोर्ट्सचे अध्यक्ष, महाराष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष, भारतीय विद्या भवन पुणे केंद्राचे अध्यक्ष, नागरिक चेतना मंचाचे संस्थापक अध्यक्ष अशा स्वरूपात ते कित्येक स्वयंसेवी संस्थांबरोबर कार्यरत होते. - वर्षा जोशी-आठवले

सातपुते, सतीश भालचंद्र भूसेना - लेफ्टनंट जनरल परमविशिष्टसेवापदक, अतिविशिष्टसेवापदक, विशिष्टसेवापदक २४ जानेवारी १९४४ सतीश भालचंद्र सातपुते यांचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील राहुरी होय. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण फर्गसन महाविद्यालयामधून झाले. पुढे त्यांनी ‘संरक्षण’ या विषयातून एम.एस्सी. पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकी प्रबोधिनीमधून (आय.एम.ए.) प्रशिक्षण घेतले. १९६४मध्ये प्रशिक्षणाअंती त्यांची भूसेनेच्या मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली. त्यांनी सिक्कीम, नागालँड, मध्य हिमालयीन विभागांमध्ये कार्य केले. १९७१च्या युद्धाच्या वेळी काश्मीरमध्ये तिसरी तंगधार मोहीम, तसेच १९९०-१९९२ मध्ये टिटवाल-कूपवाडा विभागात अतिरेक्यांच्या विरोधातील मोहिमेत त्यांचा समावेश होता. २००१मध्ये संसदेवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला केला. त्या वेळेस ते एकविसाव्या कोअरचे प्रमुख होते. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी आखलेल्या सैनिकी मोहिमेमधील एका भागाचे नेतृत्त्व पंचाहत्तर हजार सैन्यासह सतीश सातपुते यांनी केले. भूसेनेच्या दक्षिण विभाग मुख्यालयात २००३-२००४ ही दोन वर्षे सातपुते कार्यरत होते. त्या अवधीमध्ये त्यांनी राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र यांपासून दक्षिण भारतातील सर्व राज्यामधील सैनिकी तळांवरील विविध समस्यांचे निराकरण केले. पुणे, खडकी व देहू रोड छावण्यांमधील विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला. सतीश सातपुतेंनी केलेल्या असाधारण सेवेचा गौरव करण्यासाठी त्यांना २००४मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ‘अतिविशिष्ट सेवा पदक’, तसेच २००५मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊन सन्मानित केले गेले. - अनघा फासे

सामंत, मोहन नारायण नौसेना - कॅप्टन महावीरचक्र जन्म - मृत्यू दिनांक अनुपलब्ध मोहन सामंत हे बांगलादेशच्या मोंगला आणि खुलना बंदरावर अत्यंत धाडसी आणि यशस्वी हल्ला करणार्‍या चार युद्धनौकांच्या समूहाचे वरिष्ठ अधिकारी होते. अत्यंत धोकादायक आणि अनोळखी रस्त्याने आपल्या युद्धनौकांनी हल्ला चढवून मोंगला बंदरातील शत्रूला जखडून टाकले आणि शत्रू सैन्याचे जबरदस्त नुकसान केले. खुलनामध्ये अत्यंत चुरशीची लढाई ४९४ शिल्पकार चरित्रकोश