पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संरक्षण खंडसहस्रबुद्धे यशवंत दातात्रेय सहस्रबुद्धे यांची तुकडी सीमा भागाकडे रवाना केली. त्या वेळी ए.एस.सी. ची तुकडी जालंधरमध्ये, तिथून पठाणकोट आणि पुढे चालत जम्मू-काश्मीरमध्ये गेली. या तुकडीकडे त्या वेळी जनावरांच्या वाहतुकीचे काम होते. या तुकडीमधून सहस्त्रबुद्धे जम्मूहून अखनूर, नवशेराला गेले. नवशेरात पाकिस्तानी सैन्याशी झालेल् मोठ्या चकमकींमध्ये सहस्रबुद्धे सहभागी होते. १९४८ च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत झालेल्या लढायांमध्ये सहस्रबुद्धे यांच्या तुकडीने पाकिस्तानी सैन्याला पराभूत केले. त्यानंतर १९४९ मध्ये त्यांची लखनौमध्ये पुरवठा विभागात बदली झाली. त्या वेळी ते लेफ्टनंट या पदावर होते. तेथील नेहमीचे काम सुरू असतानाच मूलभूत प्रशिक्षणासाठी त्यांना बरेलीला पाठवण्यात आले. १९५१ मध्ये त्यांना कॅप्टन या पदावर बढती मिळून त्यांची बंगलोर येथे बदली झाली. तेथे नव्याने भूसेनेत भरती होणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम सहस्रबुद्धे यांच्यावर सोपवण्यात आले. तेथून पुढे दिल्लीत ‘ग्राउण्ड लीझ ऑफिसर' म्हणून त्यांची बदली झाली. त्याच वेळी जपानी भाषा व संस्कृतीच्या आकर्षणापोटी त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून जपानी भाषेचे विशेष प्रशिक्षण घेतले. दोन वर्षे पूर्ण वेळ चाललेल्या या प्रशिक्षणानंतर त्यांची १९५७ मध्ये संरक्षण मंत्रालयाने जपानी भाषेचे अधिकृत भाषांतरकार म्हणून नियुक्ती केली. १९६० मध्ये पुन्हा त्यांची जम्मूत बदली झाली. तीन वर्षांनंतर त्यांची बदली बरेलीत झाली. बरेलीतच तीन महिन्यांचा ए.एस.सी. चा वरिष्ठ पदाचा प्रशिक्षणक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यानंतर तेथेच त्यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. १९६० च्या जुलै महिन्यात त्यांना संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेमधील भारताच्या सैन्य तुकडीतून काँगो येथे पाठवण्यात आले. तेथे त्यांच्यावर हवाई वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. चौदा शिल्पकार चरित्रकोश सहस्रबुद्धे, यशवंत दत्तात्रेय महिन्यांच्या मुक्कामानंतर १९६१ मध्ये भारतात परत आल्यावर सिमला येथे त्यांची नियुक्ती झाली. चीनबरोबरचे युद्ध १९६२ मध्ये सुरू झाले. या युद्धात यांनी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी निरीक्षक म्हणून त्यांच्या तुकडीला सीमेवर पाठवण्यात आले होते. १९६४ मध्ये पुण्यातल्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी चार महिन्यांचा पेट्रोलियम विषयातील प्रशिक्षणक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांची बदली मुंबई व तेथून पुढे तेजपूरला झाली. तेथूनच त्यांनी ब्रह्मदेशाला भेट दिली. ब्रह्मदेश भेटीनंतर १९६७ मध्ये त्यांना लेफ्टनंट कर्नल पदावर बढती मिळाली. त्या वेळी नव्या आलेल्या टँक ट्रान्सपोर्टवर ट्रेनिंग सुरू होते. पुढे १९७१ च्या पाकिस्तानबरोबरच्या युद्धात हेच युनिट वापरले गेले. येथील दोन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर त्यांना कॉलेज ऑफ कॉम्बॅट मध्ये वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षण देण्यात आले. १९७१ च्या पाकविरूद्धच्या युद्धात त्यांची रवानगी पंजाबात झाली. १९७३ मध्ये दिल्ली येथील सेना मुख्यालयात ‘आर्मी सर्व्हिस कॉस' चे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. येथे त्यांनी समन्वय विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांना ब्रिगेडियर म्हणून १९७४ मध्ये बढती मिळाली आणि सेनादलांच्या पुरवठा आणि वाहतूक विभागाचे सहसंचालक म्हणून त्यांची जम्मूत नियुक्ती झाली. खरे तर लेफ्टनंट कर्नल पदानंतर कर्नल पदावर पदोन्नती होते. परंतु यशवंत सहस्रबुद्धे यांना थेट ब्रिगेडियरपदी पदोन्नती मिळाली. त्यानंतर जानेवारी १९७५ मध्ये लखनौ येथे आणि १९७७ मध्ये पुन्हा दिल्ली येथे सेना मुख्यालयात त्यांची नियुक्ती झाली. यशवंत सहस्त्रबुद्धे यांना १९७८ मध्ये मेजर जनरल पदावर पदोन्नती मिळाली आणि त्यानंतर १९७९ पासून 'आर्मी सर्व्हिस कॉर्स चे कर्नल कमांडंट म्हणून त्यांनी निवृत्तीपर्यंत काम पाहिले. मार्च १९८१ मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरलपदी पदोन्नती मिळाली आणि त्यांची सेनादलांच्या पुरवठा ४९३ स