पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरसर, मुकुंद एम. संरक्षण खंड सरसर, मुकुंद एम. भूसेना - मेजर शौर्यचक्र जन्मदिनांक अनुपलब्ध १९९७ मध्ये झालेल्या ‘ऑपरेशन रक्षक’ या मोहिमेमध्ये मुकुंद सरसर सहभागी झाले होते. त्यावेळी ते सेकंड लेफ्टनंट या पदावर येते. १९ ऑगस्ट १९९७ रोजी श्रीनगर जिल्ह्यातील बरसू गावात एक शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी अचानक अडीचशे मीटर अंतरावरच्या दोन घरांमधून स्वयंचलित बंदुकांचा अंदाधुंद गोळीबार होऊ लागला. एक क्षणही वाया न घालवता मुकुंद सरसर एका घराच्या दिशेने सरपटत गेले. त्या घराच्या खिडकीतून त्यांनी हातबाँब आत फेकला. समोरून होत असलेल्या गोळीबाराची त्यांनी पर्वा केली नाही. घरात फेकलेला हातबाँब फुटून एक अतिरेकी जखमी झाला व तो पळून जाऊ लागला. तेव्हा सरसर यांनी त्याच्यावर गोळीबार करून त्याला ठार मारले. तेथे असणार्‍या अन्य दोन अतिरेक्यांवरही अचूक गोळीबार करून त्यांनाही सरसर यांनी ठार केले. या कारवाईमध्ये तीन रायफल्स व दारूगोळा हस्तगत करण्यात आला. मुकुंद सरसर यांनी अंदाधुंद गोळीबारामध्ये स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सैन्याचे जे नेतृत्व केले त्यासाठी त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले. - रूपाली गोवंडे सहस्रबुद्धे, यशवंत दत्तात्रेय भूसेना - लेफ्टनंट जनरल परमविशिष्ट सेवा पदक ६ मार्च १९२६ यशवंत दत्तात्रेय सहस्रबुद्धे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये झाले. १९३९मध्ये त्यांचे वडील परदेशी वास्तव्यास गेल्याने त्यांनी यशवंत यांना नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षणासाठी पाठवले. पुढे त्यांनी फगर्र्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. जनरल थोरात यांचा आदर्श डोळ्यांसमोर असल्यामुळे भूसेनेत जायचे त्यांनी लहानपणापासूनच ठरवले होते. १९४५मध्ये त्यांना बी.ए.ची पदवी मिळाली. त्यानंतर त्यांनी ‘डिप्लोमा इन मिलिटरी स्टडीज’चा अभ्यासक्रम पूर्ण केला. लगेचच त्यांना १९४६मध्ये डेहराडून येथे इंडियन मिलिटरी अकॅडमी मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. या प्रशिक्षणानंतर १९४६च्या डिसेंबर महिन्यात त्यांना मीरत येथे ‘आर्मी सर्व्हिस कोअर’मध्ये पहिले पोस्टिंग मिळाले. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळताना भारताची फाळणी झाली. पाकिस्तानातून निर्वासितांचे प्रचंड लोंढे भारतात येऊ लागले. सीमा भागामध्ये आणि पाकिस्तानात ठिकठिकाणी दंगे माजले होते. हे एक प्रकारचे युद्धच सुरू होते. त्या वेळी केंद्र सरकारने ४९२ शिल्पकार चरित्रकोश