पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड शेख बशीर हसन होते. भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य समितीचेही ते सदस्य होते. १९६७मध्ये त्यांनी मिझोराम येथे संरक्षणविषयक महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अन्य ठिकाणीही संरक्षणविषयक शिक्षण देण्याचे काम केले. १९७६मध्ये वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेसच्या स्टाफ कॉलेजमधून त्यांनी संरक्षणशास्त्रातील पदवी घेतली. पुढे १९८६मध्ये सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ डिफेन्स मॅनेजमेंट मधूनही त्यांनी शिक्षण घेतले. मद्रास विद्यापीठातून त्यांनी १९९०मध्ये डिफेन्स स्टडीजमध्ये एम.एस्सी. पदवी प्राप्त केली. १९९२ मध्ये त्यांनी स्टॅ्रटेजिक स्टडीजमध्ये एम.ए. पदवी संपादन केली. पर्यावरण तसेच शस्त्रास्त्र व्यवस्थापन या विषयांंतही पदविका मिळविल्या आहेत. २००० मध्ये महू येथील इन्फन्ट्री स्कूलचे ते प्रमुख होते. सैनिकी खात्यातून निवृत्त झाल्यावर २००४ ते २००६ या कालावधीत पुणे विद्यापीठातल्या (डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज) संरक्षण व कूटनैतिक अभ्यास विभागाचे ते प्रमुख प्राध्यापक होेते. २००९मध्ये व्यवस्थापन विज्ञानात त्यांनी पीएच.डी. प्राप्त केली. आजही लेफ्ट. जन. शेकटकर देशभरात सातत्याने संरक्षणविषयक जनजागृती करून एका अर्थाने अव्याहत देशसेवा करीत आहेत. - पल्लवी गाडगीळ शेख, बशीर हसन भूूसेना - सुभेदार शौर्यचक्र जन्मदिनांक अनुपलब्ध - १९ सप्टेंबर १९९३ ऑपरेशन रक्षक या मोहिमेमध्ये बशीर शेख हे १९ सप्टेंबर १९९३ रोजी तिसर्‍या राष्ट्रीय रायफल बटालीयनचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या तुकडीवर काश्मीरमधील अचबल - दकसुम या रस्त्यावर पहारा ठेवण्याचे काम सोपवण्यात आले होते. या रस्त्यावर ही तुकडी गस्त घालत असताना झालंगम येथे आल्यावर अचानक अतिरेक्यांनी त्यांच्यावर हल्ला केला व गोळीबार सुरू केला. तेव्हा एक अतिरेकी जवळून गोळीबार करत असताना शेख बशीर हसन यांनी त्याच्या दिशेने धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्यास यमसदनी पाठविले. परंतु त्याच वेळेला दुसर्‍या अतिरेक्यानेे त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात जबर जखमी होऊन सुभेदार हसन वीरगतीस प्राप्त झाले. मात्र त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अन्य जवानांनी आणखी तीन अतिरेक्यांना ठार मारले. सुभेदार हसन यांच्या साहस व पराक्रमाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान केले. - रूपाली गोवंडे

  • * *

शिल्पकार चरित्रकोश