पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड शेकटकर, दत्तात्रेय बालाजी शेकटकर, दत्तात्रेय बालाजी भूसेना - लेफ्टनंट जनरल परमविशिष्टसेवापदक, अतिविशिष्टसेवापदक १९ मार्च १९४२ - दत्तात्रेय बालाजी शेकटकर यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे झाला. जबलपूर विद्यापीठात १९६१मध्ये बी.कॉम.चे शिक्षण घेत असताना ते राष्ट्रीय छात्रसेनेमध्ये (एन.सी.सी.) दाखल झाले. पुढे डेहराडूनच्या भारतीय सैनिकी प्रबोधिनीमधून (आय.एम.ए.) रीतसर शिक्षण घेऊन ते सैन्यात दाखल झाले. भारतीय सैन्यातल्या मराठा रेजिमेंटमध्ये सेकंड लेफ्टनंट या पदावर ३० जून १९६३ रोजी त्यांची नेमणूक झाली. प्रारंभीचे एक वर्ष त्यांनी बेळगाव येथील मराठा प्रशिक्षण केंद्र आणि मराठा लाइट इन्फन्ट्रीमध्ये व्यतीत केले. सैन्यात कार्यरत झाल्यानंतर वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी ‘वेपन ट्रेनिंग - ७.२ सेल्फ लोडिंग रायफल’ हे शस्त्र चालवण्याबद्दलचे पुस्तक लिहिले. शेकटकर यांनी आपल्या सैन्यजीवनातल्या चाळीस वर्षांपैकी विविध पदांवरून, विविध कालावधीतील जवळपास बावीस वर्षे भारताच्या ईशान्य भागात कार्यरत होते. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा व अरुणाचल प्रदेशांत भारताविरोधी काम करणार्‍या बंडखोर तत्त्वांच्या विरुद्ध सैन्याने केलेल्या कारवाईत ते अग्रणी होते. या कामगिरीसाठी त्यांना १९८१ मध्ये ‘विशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. १९७१च्या ऑगस्टपासून भारत - पाक सीमेवर सांबा येथे ते कार्यरत होते. भारत-पाक युद्ध झाल्यानंतर भारताने जिंकलेल्या युद्धक्षेत्रातच १९७३ पर्यंत त्यांची नियुक्ती होती. घुसखोरांवर कारवाई करणे, सीमारेषेवर नियंत्रण ठेवणे यांसाठी ते कार्यरत होते. पंजाबमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेतही त्याचा सहभाग होता. काश्मीरमधल्या नियंत्रणरेषेच्या संरक्षणार्थ तैनात असलेल्या सहाव्या मराठा बटालियनचे १९८१ ते १९८४ या कालावधीत त्यांनी संचालन केले. काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या विरोधातील अनेक कारवायांमध्ये त्यांनी बटालियनचे नेतृत्व केले. बंडखोरांना व अतिरेक्यांना सामूहिक शरणागती पत्करायला लावण्याच्या तंत्राचा प्रारंभ जनरल ऑफिसर कमांडिंग शेकटकर यांनी सुरू केला. या पद्धतीने जवळपास बाराशे अतिरेक्यांना शरण आणण्यात ते यशस्वी झाले होते. काश्मीरमधल्या बंडखोरांविरुद्धच्या अशा कारवायांमधले त्यांच्या कर्तृत्वासाठी १९९७मध्ये त्यांना ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. बंडखोरांविरुद्ध लढून कारवाई करण्यात त्यांना दीर्घ अनुभव आहे. शेकटकर यांना दहशतवादाविरुद्धच्या युद्धाचे आणि मनोवैज्ञानिक तज्ज्ञ मानले जाते. या युद्धपद्धती संदर्भात लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांचे व लेखांचे ते लेखक अथवा सहलेखक आहेत. लेफ्टनंट जनरल पदावर असताना चौथ्या कॉर्पसचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून फेब्रुवारी १९९९ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्या वेळी ईशान्य भारतातल्या आसाम आणि अन्य भागांतील उल्फा शिल्पकार चरित्रकोश ४८९ श ।