पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड वैद्य, अरूणकुमार श्रीधर शर्मन रणगाडे देण्यात आले होते. अरुणकुमार यांनी अहमदनगर येथील ‘आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल’ येथे प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षणाच्या दरम्यान सुरुंग पेरलेल्या हौदातून पाण्यातील अडथळे ओलांडत असताना सुरुंगाच्या वायरीला पायाचा स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत अरुणकुमार बेशुद्ध होऊन पडले होते, पण काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ते आपल्या सहकार्‍यांत जाऊन मिसळले. त्यांचे मनोधैर्य पाहून निक्सन नावाच्या ब्रिटिश मेजरने ‘हा तरुण सैन्यात मोठा अधिकारी होईल’ असे म्हटले होते, ते बोल पुढे खरे ठरले. १९६५ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी लेफ्टनंट कर्नल पदावर असलेल्या अरुणकुमार यांनी डेक्कन हॉर्सचे नेतृत्व केले होते. दि.६ ते ११ सप्टेंबरच्या काळात त्यांच्या तुकडीने पंजाब प्रांतातील असल उतार व चिमा या भागात अनेक मोहिमा लढल्या. या वेळी पाकिस्तानकडे अमेरिकन बनावटीचे पॅटन रणगाडे होते, तर भारतीय सेनेकडे जुने अमेरिकन शर्मन रणगाडे होते. परंतु प्रतिकूल परिस्थितीचा धैर्याने सामना करत अरुणकुमार यांनी आपल्या कुशल नेतृत्वाचा परिचय घडविला. आपल्या तुकडीची घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करत खेमकरण विभागात ३६ पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा उडविला. या लढाईत पाकिस्तानी सैन्याने सुमारे शंभरेक रणगाडे मागे सोडून माघार घेतली. या लढाईनंतर पाकिस्तानला नाक मुठीत धरून युद्धविराम पत्करावा लागला. अरुणकुमार वैद्य यांना या शौर्यासाठी दि.६ सप्टेंबर १९६५ रोजी ‘महावीर चक्र’ प्रदान करण्यात आले. १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी ब्रिगेडियर वैद्य एका चिलखती पथकाच्या (ब्रिगेड) कमांडरपदी होते. हे पथक जाफरवाल क्षेत्रात पश्चिम आघाडीवर होते. त्यांनी आपल्या पथकाची जलद हालचाल करून शत्रूचे रणगाडे ताब्यात घेऊन शत्रूला चकित केले. आपल्या रणगाड्यांची अथकपणे आक्रमक हालचाल करून पाकिस्तानी सेनेचा सामना करण्यासाठी आपल्या डिव्हिजनला सरसावत ठेवले. चकरा व दाहिराच्या लढाईत शत्रूने पेरलेल्या भूसुरुंगाच्या भागातून त्यांनी आत्मविश्वासाने आपल्या सैनिकांना घेऊन निधड्या छातीने पुढेच वाटचाल केली. त्यांच्या प्रेरक नेतृत्वाखाली पाकिस्तानी सैन्याचा प्रतिहल्ला मोडून काढण्यास संपूर्ण स्क्वॉड्रन पुढे सरसावली. शकरगढ क्षेत्रातील बसंतारच्या लढाईतही आपल्या अतुलनीय पराक्रमाचे व नेतृत्चगुणाचे दर्शन ब्रिगेडियर अरुणकुमार वैद्य यांनी घडविले. या वेळी शत्रूने दूरवरच्या क्षेत्रात पेरलेल्या सुरुंगांवरून त्यांनी आपले रणगाडे पुढे नेले आणि शत्रूच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. या लढाईत आपल्या सैन्याने ६२ पाकिस्तानी रणगाड्यांचा धुव्वा उडविला. यातील अपूर्व शौर्याबद्दल वैद्य यांना दुसरे ‘महावीरचक्र’ प्रदान करण्यात आले. १९७३ मध्ये अरुणकुमार वैद्य मेजर जनरल झाले. त्यांनी डायरेक्टर मिलिटरी ऑपरेशन्स, सदर्न कमांड शिल्पकार चरित्रकोश ४८७ ३। व ।