पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वैद्य, अरूणकुमार श्रीधर संरक्षण खंड फ्रान्सला पाठवण्यात आलेल्या समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. यानंतर ग्वाल्हेरच्या वायुसेनेच्रा तळावर मिराज २००० वर त्यांची नियुक्ती झाली. तेथून त्रांची हैद्राबाद येथे बदली झाली. १९९१ ते १९९४ या काळात एअर क्रू बोर्डवर परीक्षक म्हणून वैद्य रांची नेमणूक झाली. इथे वैमानिकांचे गुणांकन, ढगांमध्ये उड्डाण असेल तर त्यांची क्षमता तपासणी, हे काम त्यांच्याकडे होते. त्यानंतर १९९४मध्ये कच्छजवळ नलिया येथील तळावर कमांडर म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९९९ ते २००० दरम्यान त्यांची लोहगाव हवाईतळाचे प्रमुख म्हणून नेमणूक झाली. २००० मध्ये राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयामधून अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांना एअर डिफेन्स कमांडर म्हणून बढती मिळाली. त्याच वेळी एअर व्हाइस मार्शल म्हणूनही बढती मिळाली. त्यानंतर दिल्ली येथे वायुभवनात वेस्टर्न एअर कमांडर म्हणून त्यांची बदली झाली. त्यानंतर २००४ ते २००६ या काळात ईस्टर्न एअर कमांडर म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर त्रांनी दिल्ली येथे डेप्युटी चीफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून अडीच वर्षे काम बघितले. या काळात उत्तर भारतात झालेल्या भूकंपानंतर उद्भवलेली आणीबाणीची परिस्थिती त्यांनी उत्तमपणे हाताळली. तसेच, अकराव्या सर्वंकष संरक्षण योजनेच्या (इंटिग्रेटेड डिफेन्स प्लॅन) आखणीतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. २००८ मध्ये एअर मार्शल म्हणून ते निवृत्त झाले. वैद्य यांनी सेवाकाळात ३००० तासांचे विना-अपघात उड्डाण केले आहे. त्यांनी नॅट, मिग-२१, मिराज-२०००, मिग-२९, तसेच अद्ययावत एसयू-३० ही लढाऊ विमाने चालवली आहेत. विंग कमांडर म्हणून त्यांनी मिराज-२००० स्क्वॉड्रनवर काम केले आहे. १९८८ साली मालदिवमध्ये शासन ताब्यात घेण्यासाठी श्रीलंकेच्या विभाजनवादी अतिरेकी संघटनेने केलेला उठाव हाणून पाडण्यासाठी भारतीय सेनेने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन कॅक्टस’ या मोहिमेत अजित वैद्य यांनी भाग घेतला होता. त्यानंतर त्यांना १९९०मध्ये ‘वायुसेना’ पदक प्रदान करण्यात आले. ३९ वर्षांच्या उत्तम सेवेबद्दल अजित वैद्य यांना जानेवारी २००८मध्ये ‘परमविशिष्ट’ सेवा पदक प्रदान करण्यात आले. - वर्षा जोशी-आठवले

वैद्य, अरुणकुमार श्रीधर सरसेनापती जनरल, भूसेना पद्मविभूषण, परमविशिष्ट सेवा पदक, महावीरचक्र (बार), अतिविशिष्ट सेवा पदक २७ जानेवारी १९२६ - १० ऑगस्ट १९८६ भारतीय सैन्याचे तेरावे सरसेनापतीपद (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) भूषविणार्‍या अरुणकुमार श्रीधर वैद्य यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील अलिबागचे जिल्हाधिकारी होते. अरुणकुमार यांचे प्राथमिक शिक्षण अलिबाग येथील टोपीवाला इंडस्ट्रीयल हायस्कूलमध्ये झाले. काही काळ पुण्याच्या रमणबाग शाळेतही त्यांचे शिक्षण झाले. मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांच्या मनात सैन्यात जाण्याची ओढ निर्माण झाली. १९४४ साली त्यांना सैन्यात तातडीची नियुक्ती (इमर्जन्सी कमिशन) मिळाली. १९४५ साली त्यांना भारतीय सैन्याच्या चिलखती दलात कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली आणि त्यांनी दुसर्‍या महायुद्धात सहभागही घेतला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात नवव्या डेक्कन हॉर्स या चिलखती तुकडीचे ते सातवे कमांडर होते. भारतीय सैन्यातील ही एक सर्वांत जुनी चिलखती तुकडी (रेजिमेंट) होय. आधी ही घोडदळाची तुकडी होती आणि नंतर तिच्याकडे ४८६ शिल्पकार चरित्रकोश