पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड वैद्य, अजित विश्वनाथ करण्यात आल्या होत्या. अत्यंत अचूक पद्धतीने बॉम्बफेक केली तरच उद्दिष्ट साध्य होणार होते. ह्या अवघड कामगिरीचे आव्हान विल्सन यांनी स्वीकारले. लढाऊ विमानातून नेहमीच्या उंचीवरून या रडारवर बॉम्बहल्ला केला तर विमानविरोधी तोफा आपल्यावर तातडीने हल्ला करतील हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी जमिनीपासून अत्यंत कमी उंचीवरून बॉम्बफेकी विमाने वेगाने रडार यंत्रणा बसविलेल्या ठिकाणावरून नेली आणि अचूक लक्ष साधत त्या रडारवर बॉम्बहल्ला केला. विमानविरोधी तोफांनी विमानांचा वेध घेण्याच्या आतच या सर्व हालचाली पार पाडल्याने रडार उद्ध्वस्त होताना त्या तोफा कुचकामी ठरल्या. लढाऊ विमान चालविण्याचे त्यांचे कसब आणि लढाईतील धैर्य वाखाणण्याजोगे होते. त्यांच्या या शौर्याचा सन्मान २१ सप्टेंबर १९६५ रोजी ‘वीरचक्र’ देऊन करण्यात आला. पुढे त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदका’नेही सन्मानित करण्यात आले. एअर कमोडोर पदावरून ते निवृत्त झाले. - समीर कोडिलकर

वैद्य, अजित विश्वनाथ वायुसेना - एअर मार्शल परमविशिष्ट सेवा पदक १९ फेब्रुवारी १९४८ अजित विश्वनाथ वैद्य यांचा जन्म कानपूर येथे झाला. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण नागपुरातील सीताबर्डी मध्ये न्यू इंग्लिश विद्यालयात झाले. १९५८मध्ये त्यांच्या वडिलांची पुण्यात कृषी महाविद्यालयाचे संचालक म्हणून बदली झाली. त्यामुळे त्यांचे पुढील शिक्षण पुण्यात श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल (एस.एस.पी.एम.एस.) व सेंट व्हिन्सेंट या शाळांमध्ये झाले. अजित वैद्यांचे शिक्षण सुरू असताना त्यांच्या वडिलांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एन.डी.ए.) पाहिली. तेथील शैक्षणिक वातावरण पाहून आपल्या मुलाने सैन्यात जावे असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी अजित वैद्यांना सैन्यात जाण्यास सुचविले. त्यांची पत्नी सुशीलाबाई यांनीही पतीच्या सांगण्याला पाठिंबा दिला. १९६३ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९६४मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची परीक्षा दिली. अजित यांनी वायुसेनेचा अभ्यासक्रम निवडला. १९६७मध्ये प्रबोधिनीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना दीड वर्षांचे प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर लढाऊ वैमानिक म्हणून त्यांना पहिली नियुक्ती लुधियानाजवळ हलवारा येथे मिळाली. १९६८ ते १९७० पर्यंत नॅट स्क्वॉड्रन मध्ये काम केल्यानंतर दिल्लीजवळच्या वायुसेनेच्या तळावर मिग-२१ या रशियन बनावटीच्या विमानांचे वैमानिक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९७१मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी भाग घेतला. १९७४मध्ये त्यांनी विमानोड्डाण प्रशिक्षक विद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमानंतर विमानोड्डाण प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यानंतर १९७६च्या सुरुवातीला मद्रासजवळील तांंंबरम येथे प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सप्टेंबर १९७७ ते सप्टेंबर १९७९ अशी दोन वर्षे इराक येथेही त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले. इराकहून परतल्यानंतर नॅट विमानांच्या पथकावर त्यांची पुन्हा नियुक्ती झाली. नंतर १९८२मध्ये उटीजवळ डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांची एका वर्षासाठी नियुक्ती झाली. तिथून दिल्लीजवळ हिंडन येथे १९८२ ते १९८४ या काळात त्यांची परीक्षक मंडळावर नियुक्ती झाली. १९८५मध्ये मिराज २००० विमानांच्या खरेदीसाठी शिल्पकार चरित्रकोश ४८५