पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड मुंजे, बाळकृष्ण शिवराम कुठेही उतावीळपणा न दाखवता थंड डोक्याने या हल्ल्याचा स्वत: मुकाबला केला. त्यामुळे त्यांच्या दलातील इतर सैनिकांनाही लढण्याचे बळ प्राप्त झाले. नंतर त्यांनी दरसान या शत्रूच्या ठाण्यावर जोरदार आक्रमण केले. मिशीगन यांचे हे आक्रमण पाहूनच त्यांच्या तुकडीला प्रेरणा मिळाली. मग या तुकडीने निकराने हल्ला करून शत्रूकडील मशीनगन, तोफखाने उद्ध्वस्त करून निर्णायक विजय मिळवला. या काळात मिशीगन यांनी अत्युच्च व्यावसायिक कौशल्य दाखविले. त्याबद्दल त्यांना ‘महावीर चक्रा’ने सन्मानित करण्यात आले. नोकरीच्या पुढील काळात मेजर जनरल पदपर्यंत त्यांना बढती मिळाली. - मानसी आपटे

मुंजे, बाळकृष्ण शिवराम सैनिकी शिक्षणाचे प्रणेते १२ डिसेंबर १८७२ - ३ मार्च १९४८ बाळकृष्ण शिवराम मुंजे यांचा जन्म बिलासपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बिलासपूर येथेच झाले. १८८८ मध्ये माध्यमिक परीक्षेत त्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. मॅट्रिकपर्यंतचे त्यांचे शिक्षण रायपूर येथे झाले. मॅट्रिकच्या परीक्षेत ते अनुत्तीर्ण झाले. पुढे ती परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. इंटरमीजिएटची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. १८९८ मध्ये ते एल.एम. अँड एस. ही परीक्षा दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. लगेच डॉ.मुंजे यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळाली. नोकरीत गर्क असताना त्यांना दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा योग आला. द. आफ्रिकेतील बोअर जमातीशी इंग्लंडचे युद्ध चालू होते. बोअर जमातीची सरशी होत होती. सेठ सुकातवाला यांनी जाहिरात देऊनही कोणी भारतीय डॉक्टर तेथे जाण्यास तयार होईना. तेव्हा अँग्लो इंडियनचीच निवड करावी लागेल असे ते खेदाने म्हणाले. तेव्हा मुंजे आणि त्यांचे मित्र डॉ.पारधी, डॉ.जतकर आणि डॉ.गाडगीळ हे आफ्रिकेत जायला तयार झाले. मुंबईत महिना बाराशे रुपये उत्पन्न मिळत असूनही त्या सर्व डॉक्टरांनी रु.२५०/- पगारावर वैद्यकीय अधिकारी म्हणून जायचे ठरवले. दरबान येथे गेल्यावर ते मोहनदास गांधी (महात्मा गांधी) यांच्याकडे उतरले. गांधीजींप्रमाणे मुंजे यांनाही काळे-गोरे हा भेद जाणवला. पण मुंजे यांच्या सैनिकी पोशाखामुळे त्यांना त्रास कमी झाला. युद्ध संपल्यानंतर त्यांचे मित्र पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. मुंजे मात्र भारतात परतले. १९०१ पासून नागपूर येथे ते नेत्रवैद्य म्हणून स्थायिक झाले. ते संशोधकही होते. त्यांनी कसाई खान्यातील शेळ्या-बोकडांची मुंडकी मिळविली. त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियेची नवी पद्धत शोधून काढली. त्यामध्ये कौशल्य प्राप्त केले. चरक, सुश्रुत यांचे ग्रंथ अभ्यासले व नेत्रचिकित्सेवर त्यांनी संस्कृत भाषेतून ग्रंथ लिहिला. मुंजे यांनी १९०४ च्या काँगे्रस अधिवेशनात ‘रिफॉर्म्ड ओपिनियन ऑन हिंदू सोशल रिफॉर्म्स’ या विषयावर एक निबंध सादर केला. लोकमान्य टिळकांनाही तो आवडला. टिळकांचे विचार नागपूरमध्ये दृढ करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय शिवाजी महोत्सव सुरू केला. १९०५ मध्ये बंगालची फाळणी झाली आणि भारतभर असंतोष उसळला. सुरतच्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी काँग्रेस पुढार्‍यांतील मतभेद वाढीस लागले. जहाल आणि मवाळ असे स्पष्ट गट दिसू लागले. टिळकांच्या विचारांनी भारून मुंजे राजकारणात ओढले गेले. त्यांनी आपला डॉक्टरी शिल्पकार चरित्रकोश ४७५