पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मालशे, यशवंत विनायक संरक्षण खंड मालशे, यशवंत विनायक वायुसेना - एअर व्हाइस मार्शल परमविशिष्ट सेवा पदक जन्म मृत्यू दिनांक अनुपलब्ध यशवंत विनायक मालशे हे वायुसेनेत १९४० मध्ये दाखल झाले. हवाई मुख्यालयाच्या महत्त्वपूर्ण ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्याचबरोबर हवाई दलाच्या अनेक तुकड्या त्यांच्या नेतृत्वाखाली होत्या. १९४७ मध्ये त्यांनी क्वेट्टा येथे स्टाफ कॉलेज अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी १९५१ मध्ये लंडनमधील लॅण्ड अ‍ॅण्ड एअर वॉरफेअर स्कूलमधून वरिष्ठ हवाई साहाय्यक अभ्यासक्रम पूर्ण केला. १९६२-६३ मध्ये त्यांनी नॅशनल डिफेन्स कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर ते त्याच कॉलेजचे वरिष्ठ संचालक होते. दि.१ ऑक्टोबर १९६४ रोजी मालशे यांची पूर्व विभागाचे ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली. सेवेत असताना त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मोहिमा चांगल्या पद्धतीने हाताळल्या. चीन आणि पाकिस्तानकडून होणार्‍या संभाव्य आक्रमणांना तोंड देण्यासाठी त्यांनी वायुसेनेचे तळ मजबूत केले. सीमेवरील सैन्यदलांची वाहतूकही हवाई मोहिमांद्वारे त्यांनी उत्तमरीत्या केली. मिझोराममधील घुसखोरीला तोंड देताना भूसेनेला त्यांनी वायुसेनेचे उत्तम छत्र मिळवून दिले. त्यांनी यात तत्परता आणि अचूकता दाखविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वायुसेनेने आसाम सरकारला अनेक घडामोडींत मदत केली. त्यांनी वैयक्तिकरीत्या सार्‍या मोहिमांचे संचालन केले आणि स्वत:ही त्यात सहभागी झाले. या त्यांच्या कामगिरीसाठी १९६७मध्ये त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. - संपादित

मिशीगन, अ‍ॅन्थोनी हेरॉल्ड एडवर्ड भूूसेना - मेजर जनरल महावीरचक्र १३ ऑक्टोबर १९२५ - अ‍ॅन्थोनी हेरॉल्ड एडवर्ड मिशीगन यांचा जन्म महाराष्ट्रातील विजापूर येथे झाला. मिशिगन अ‍ॅन्थोनी हे मूळचे कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील होते. १० डिसेंबर १९४८ रोजी अ‍ॅन्थोनी हे सैन्यात दाखल झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. १९७१ मध्ये पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात ब्रिगेडिअर मिशीगन यांची नेमणूक माऊंटन ब्रिगेड मध्ये करण्यात आली. पूर्वेकडील प्रांताच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. यावेळी पाकिस्तानी सैनिकांनी उथली या तळावर हल्ला केला. तिन्ही बाजूने त्यांच्या तळाला रणगाड्यांनी घेरले होते. त्यावेळी या कठिण परिस्थितीमध्येही अ‍ॅन्थोनी यांनी शिल्पकार चरित्रकोश ४७४