पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भिडे, विजयकुमार विनायक संरक्षण खंड ब्रिगेडियर पदी बढती मिळाली आणि त्यांची बदली भूसेनेच्या मध्य विभागात सैनिकी अभियांत्रिकी विभागाच्या नागपूरस्थित भांडार विभागात झाली. १९६५ च्या वर्षात पाकिस्तानसोबत युद्धाचे वातावरण तयार होताच विजय भिडे यांना अकराव्या कोअरचे प्रमुख अभियंता म्हणून जालंदर येथे घाईघाईने नियुक्त केले गेले. लेफ्ट. जन. जोगिंदर सिंग धिल्लाँ हे तेव्हा अकराव्या कोअरचे कमांडर होते. याच युद्धात डेरा बाबा नानक येथे झालेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण लढाईत भारतीय सेनेले माघार घ्यावी लागताच विजय भिडे यांना एका ब्रिगेडचे नेतृत्त्व देऊन तेथे पाठविण्यात आले. भिडे यांच्या अधिपत्याखालील सेनेने शत्रूसैन्याला त्या भागातून हुसकावून लावले. याच युद्धात खेमकरण भागातही दि. ८ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानने जोरदार हल्ला केला होता. इथल्या एका खेड्याच्या नावावरून ‘बॅटल ऑफ असल उतार’ या नावानेही ही लढाई ओळखली जाते. पहिल्या हल्ल्याच्यावेळी तेथे भारतीय तोफखाना नव्हता. केवळ सुरुंगांच्या मदतीने विजय भिडे यांच्या नेतृत्त्वाखालील ब्रिगेडने खेमकरण भारताच्या हातून जाता जाता वाचविले. त्यानंतर या भागावर पाकिस्तानच्या पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनने पूर्ण ताकदीने हल्ला केला. पुढे पाकिस्तानचे अध्यक्ष झालेले मुशर्रफ हे त्यावेळी लेफ्टनंट पदावर याच पहिल्या आर्मर्ड डिव्हिजनमध्ये कार्यरत होते. दुसर्‍या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी रणगाडा लढाई मानली जाते. त्यावेळी झालेल्या जबरदस्त लढाईत खेमकरण राखतानाच पाकिस्तानचे एकशेपाच पॅटन रणगाडे भारताने ताब्यात घेतले. अभेद्य समजले जाणारे तीनशे पॅटन रणगाडे या लढाईत भारतीय रणगाड्यांच्या हल्ल्यात नष्ट झाले. एकशेपाच पॅटन रणगाडे ज्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले, त्या ठिकाणाला ‘पॅटन नगर’ असेच नाव दिले गेले आहे. या लढाईत विजय भिडे यांच्या नेतृत्त्वाखालील अभियांत्रिकी दलाने उत्तम काम केले. भारतीय चिलखती दलाला आणि रणगाडा डिव्हिजनला खेमकरणच्या विभागातील बिआस नदीच्या परिसरातील मऊ मातीच्या भागात या अभियांत्रिकी मदतीचा चांगला उपयोग झाला. पाकिस्तानी रणगाड्यांना त्यांच्या अभियांत्रिकी विभागांकडून इतकी चांगली पाठराखण मिळाली नाही. या लढाईनंतर या भागाचे सैन्य प्रमुख अकराव्या कॉर्पस्चे कमांडर ले.जन. जोगिंदरसिंग धिल्लाँ यांची बढती झाली आणि त्यांच्या जागी ले.जन.बी.एम. कौल यांची नियुक्ती झाली. त्यांनी संपूर्ण सीमेवर कुंपण व तटबंदी बांधण्याचे (‘फोर्टिफिकेशन’) आदेश विजय भिडे यांना दिले. त्यांनी संपूर्ण भारत-पाक सीमारेषेचे सर्वेक्षण करून योग्य ते आराखडे तयार केले. संपूर्ण सीमेवरच्या कुंपणाचे हे काम भिडे यांनी उच्च दर्जा राखून पार पाडले. स्थानीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने त्यांनी हे काम पार पाडले. भिडे यांनी आरेखन केलेले ही तटबंदी व कुंपण, काँक्रिटचे स्तंभ आजही मजबुतीने उभे आहेत. त्यानंतर त्यांची राष्ट्रीय रक्षा महाविद्यालयात नियुक्ती झाली होती. परंतु सूत्रे हाती घेण्यापूर्वीच एका परिषदेत भाग घेण्यासाठी जात असता त्यांच्या जीपचा गंभीर अपघत झाला. त्यात त्यांच्या मणक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांना ती नियुक्ती स्वीकारता आली नाही. एप्रिल १९६८मध्ये विजय भिडे यांची नियुक्ती ब्रिगेडियर पदावर अभियांत्रिकी कर्मचारीवर्गाचे प्रमुख म्हणून झाली. या पदावर तीन वर्षे ते ‘बॉम्बे’, ‘मद्रास’, ‘बंगाल’ या सर्व ‘सॅपर्स’ (लढाऊ सैनिकी अभियांत्रिकी पलटणी) व अन्य ठिकाणचे गैरलढाऊ अभियांत्रिकी गट (नॉन काँबॅट इंजिनिअरिंग ग्रुप) यांचे प्रमुख होते. १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या (बांगलादेश युद्ध) काही दिवस आधी त्यांची नियुक्ती भूसेनेच्या पूर्व विभागाचे मुख्य अभियंता म्हणून झाली. त्यावेळी शिल्पकार चरित्रकोश