पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। संरक्षण खंड पाटकर, विजय अच्युत होते. त्यानंतर त्यांनी हवाई सेवेतली विविध ठिकाणची कामे केली. १९६८पासून ते पुण्यात, तर १९७०पासून दिल्लीतल्या पालम विमानतळावर होते. त्या वेळी अति महत्त्वाच्या व्यक्तींबरोबर विमानप्रवास करण्याची संधी त्यांना मिळाली. ‘टीयू-१२४’ हे त्या वेळचे रशियन बनावटीचे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीचे विमान होते. राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी, उपराष्ट्रपती गोपाल स्वरूप पाठक, पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विमानप्रवासाची जबाबदारीच जणू त्यांच्यावर होती. विमान उड्डाण ही आनंदाची गोष्ट असली, तरी सहा वर्षांनतर विजय यांना विमान उड्डाणासंदर्भातल्या तांत्रिक बाजूचे काम पाहावे लागले. संगणकाच्या आगमनाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे १९७३-७४मध्ये त्यांना आय.आय.टी., मुंबई, टी.आय.एफ.आर. या संस्थांमध्ये, तर फ्रान्समधल्या संगणक निर्माण करणार्‍या कंपनीत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. १९७५ ते १९७८ या कालावधीत त्यांनी घेतलेले प्रशिक्षण प्रत्यक्ष वापरून रडार यंत्रणा, रडार डेटा या सर्वांचे संगणकीकरण केले. त्यांनी या संदर्भातले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तयार करण्याचे काम केले. यानंतर त्यांना आय.आय.टी. खरगपूरमध्ये ‘मायक्रोवेव्ह आणि रडार’ यंत्रणेत एम.टेक. करण्याची संधीही मिळाली. १९८०मध्ये एम.टेक. झाल्यावर वायुसेनेच्या मुख्यालयामध्ये स्क्वॉड्रन लीडर म्हणून ते कार्यरत झाले. पुढच्या कालावधीत रशियन बनावटीच्या आय.एल.सारखे त्या वेळचे सर्वांत मोठे मालवाहू विमान असणे वायुसेनेला आवश्यक वाटू लागले. त्याकरिता १९८४मध्ये पाटकर यांना विंग कमांडर करून त्यांच्या हाताखाली चांगला गट रशियामध्येे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आला. तेथे प्रशिक्षण घेतले, तरी असे विमान आणण्यासाठीची पुरेशी यंत्रणा, विमान ठेवण्याची जागा (हँगर्स), शिड्या (लॅडर्स), इ. आवश्यक बाबी भारतात नव्हत्या. त्या सर्व तयार करण्याचा, या विमानाची दुरुस्ती करणारा कर्मचारी वर्ग, तो चालवणारा कर्मचारी वर्ग तयार करणे ह्या सर्व जबाबदार्‍या पाटकर यांच्यावर होत्या. हा कर्मचारी वर्ग तयार करण्यासाठी त्यांनी अल्पकाळात प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली. या सेवेसाठी त्यांना १९८८मध्ये राष्ट्रपती आर. वेंकटरामन यांच्या हस्ते ‘विशिष्ट सेवा पदक’ देण्यात आले. त्याच वेळी त्यांना ग्रूप कप्तानपदी बढती देण्यात आली. १९९५मध्ये पाटकर यांची नियुक्ती पुन्हा मुख्यालयामध्ये तांत्रिक संचालकपदी झाली. इथल्या सर्व हेलिकॉप्टर आणि विमानांची निगा राखण्याचे व्यवस्थापन त्यांच्याकडे होते. ही विमाने रशियामधून घेतली होती. मात्र रशियाच्या झालेल्या विलगीकरणामुळे या कंपन्या बरखास्त झाल्या, विखुरल्या. अशा वेळी कोणत्याही प्रत्यक्ष निर्मिती केंद्राचे पाठबळ नसताना विमानांची निगा राखणे हे अतिशय कठीण काम पाटकर यांनी केले. ते पाच वर्षे या पदावर होते. इथेच त्यांना एअर व्हाइस मार्शल या पदावर बढती मिळाली. आणि २००१मध्ये याच कामासाठी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते ‘अतिविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. २००१मध्ये वेस्टर्न एअर कमांडमध्ये ‘सीनिअर मेन्टेेनन्स स्टाफ ऑफिसर’, नोव्हेंबर २००१पासून एअर मार्शल झाल्यावर ‘एअर ऑफिसर’ या पदांवर त्यांनी काम केले. इथे विमान, मिसाइल्स रडार, संदेशवहन, प्रत्यक्ष दळणवळणाची साधने यांची निगा राखण्याची जबाबदारी त्यांनी दोन वर्षे पेलली. त्याकरिता मार्च २००३मध्ये त्यांना राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. जुलै २००४मध्ये नागपूर येथे ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ ऑफ मेन्टेनन्स कमांड’ पदी त्यांची नियुक्ती झाली. हे वायुसेनेत अभियंता

शिल्पकार चरित्रकोश ४६३