पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

24- पाटकर, विजय अच्युत संरक्षण खंड २५ नोव्हेंबर १९८७ रोजी पहाटे साडेपाच वाजता शोधमोहिमेस सुरुवात झाली. पण तेथे काहीही न आढळल्यामुळे त्यांनी माघारी परतण्याचेे ठरविले. त्याच वेळी देवळाजवळच्या वनराईतून बंदुकीच्या गोळ्यांचा मारा झाला. कंपनीनेही लगेचच प्रत्युत्तर दिले. त्याच वेळी त्यांनी कॅप्टन शर्मा यांना सूचना दिली, की शत्रूवर गोळीबार करीत त्याला गुंतवून ठेवा. नंतर परमेश्वरन आणि त्यांच्या तुकडीने एल.टी.टी.ई.च्या गटाच्या पाठीमागून जाऊन त्याना घेरण्यासाठी पश्चिमेच्या बाजूने कूच केले. अतिरेकी बेसावध असतानाच सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. समोरासमोर झालेल्या लढाईत एका अतिरेक्याने झाडलेली गोळी त्यांच्या छातीत घुसली. तरीही न डगमगता परमेश्वरन यांनी त्या अतिरेक्याची रायफल हिसकावून घेतली व उलट हल्ला करून त्यालाच यमसदनास पाठवले. या तुकडीने पाच अतिरेकी मारले आणि तीन रायफल्स व दोन रॉकेट लाँचर्स हस्तगत केले. मेजर परमेश्वरन अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या तुकडीला मार्गदर्शन करत राहिले. परमेश्वरन यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना मरणोत्तर ‘परमवीरचक्र’ बहाल करण्यात आले. - वर्षा जोशी-आठवले संदर्भ : १. मेजर जनरल कारडोझो, इयान; अनुवादक- लेले ज्योत्स्ना ‘परमवीरचक्र - रणांगणावरील आपले महान योद्धे’; एप्रिल २००८.

पाटकर, विजय अच्युत वायुसेना - एअर मार्शल परमविशिष्टसेवापदक,अतिविशिष्टसेवापदक २९ एप्रिल १९४५ विजय अच्युत पाटकर यांचा जन्म मुंबई येथे झाला. पाटकर कुटुंब गुजरात राज्यात बडोदा (वडोदरा) येथे स्थायिक झालेले होते. त्यांचे वडील अच्युत हे टाटा ऑइल मिलमध्ये नोकरीस होते. त्यांनी दादरच्या बालमोहन विद्यामंदिरात मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतल्याच एल्फिन्स्टन महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. लहानपणापासूनच त्यांना ‘ऑटोमोबाइल्स आणि एव्हिएशन’ या विषयांत रस होता. त्यांनी नंतर बडोदा विद्यापीठात ‘इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी’ला प्रवेश घेतला. अभियांत्रिकीला असताना ते चारही वर्षे एन.सी.सी.च्या एअर विंगमध्ये होते. या काळात त्यांनी बडोदा फ्लाइंग क्लबमधून विमान उडवण्याचे प्रशिक्षणही पुष्पक विमानात घेतले होते. विजय यांनी १९६३मध्ये अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्षाला असतानाच भारतीय वायुसेनेतील सेवेसाठी मुलाखत दिली होती. १९६०च्या दशकात भारत-चीन युद्धानंतर भारतीय वायुसेनेने प्रवेशासाठी थेट प्रवेश योजना राबवली होती. त्या अंतर्गत मग डिसेंबर १९६२मध्ये ग्वाल्हेरमध्ये सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाची परीक्षा आणि दिल्लीत वैद्यकीय चाचणी होती. या प्रक्रियेतून ते तावून-सुलाखून निघाले. विजय यांना जून १९६४मध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना भारतीय वायुसेनेचेे पायलट ऑफिसर पद बहाल करण्यात आले. इंजिनिअर झाल्यानंतर जुलै १९६५मध्ये त्यांनी बंगळुरू इथल्या एअर फोर्स तांत्रिक महाविद्यालयात ‘टेक्निकल सिग्नल’ या खात्यात सुरुवात केली. जुलै १९६६मध्ये प्रशिक्षणानंतर त्यांनी जोधपूर इथे सहा महिने ‘एअर सिग्नलर’ म्हणून काम करत प्रशिक्षण घेतले. त्यांचे पहिले पोस्टिंग देशाच्या पूर्व भागात ‘सी-११९ जी’ या विमानावर होते. लष्कराच्या दुर्गम भागात सामान ने-आण करणारे त्यांचे कार्गो विमान ४६२ शिल्पकार चरित्रकोश | प |