पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज । संरक्षण खंड जोशी, अविनाश देवदत्त संरक्षणमंत्री स्वर्णसिंग यांच्या हस्ते त्यांना फ्लाइंग ट्रॉफी देण्यात आली. पुण्याच्या पहिल्या नेमणुकीनंतर हलवारा आणि पठाणकोट येथे असताना त्यांनी हंटर विमानांवर कामगिरी केली. १९७१ च्या लढाईत अविनाश जोशी यांनी हंटर विमानातून सत्ताविसाव्या स्क्वॉड्रनमधून सरहद्दीपार सात आक्रमक उड्डाणे करून उरी आणि पूंछ भागातील पाकिस्तानी सैनिकी ठिकाणांवर हल्ले केले व ‘सपोर्ट मिशन्स’ही पार पाडली. ह्या सर्व हल्ल्यांमधील उड्डाणपथकांचे त्यांनी नेतृत्व केले होते. ह्या कार्यासाठी त्यांचे ‘मेन्शन इन डिस्पॅच’ द्वारा कौतुक केले गेले. जोशी यांनी तांबरम येथे फ्लाइंग इन्स्ट्रक्टरचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर १९७४ मध्ये हैद्राबादच्या ‘एअरफोर्स अकॅडमी’ मध्ये एच.जे.टी.-१६ ह्या विमानावर छात्रसैनिकांना शिकवण्याचे काम केले. त्यावेळच्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना ‘कमांडर इन चीफ’नेे प्रशस्तिपत्रक दिले. वायुसेनेच्या पश्चिम विभागाकडून त्यांना दोनदा प्रशस्तिपत्रके देण्यात आली. १९७६ मध्ये सदतिसाव्या स्क्वॉड्रनमध्ये असताना हंटर व मिग-२१ मधून त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्येे ‘कलर फ्लाय पास्ट’ही सादर केले. १९७९ साल हे त्यांच्या जीवनाला नवी दिशा देणारे ठरले. श्रीनगरच्या खोर्‍यातले लढाऊ विमानाचे रात्रीचे पहिले उड्डाण त्यांनी केले. ‘फायटर कॉम्बॅट लीडर’चे प्रशिक्षण त्यांनी १९८० मध्ये पूर्ण केले. १९८१ मध्ये मिग-२३ च्या प्रशिक्षणासाठी ते सोव्हिएट युनियनला गेले. त्यानंतर त्याच विमानांच्या दोनशे एकविसाव्या स्क्वॉड्रनमध्ये ‘फ्लाइट कमांडर’ म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्या वेळी त्यांनी लढाऊ विमानांच्या डावपेचांच्या तंत्रात सुधारणा केली. अनेक नव्या शस्त्रास्त्रांची चाचणी त्यांनी स्वत: पार पाडली. श्रीनगरच्या खोर्‍यात उड्डाणाचे नवे प्रयोग केले. २३एप्रिल १९८४ रोजी लेह या समुद्रसपाटीपासून ३००० मीटर उंचीवर असणार्‍या विमानतळावर सर्वप्रथम मिग-२३ हे विमान उतरवण्याचा आणि तिथून उड्डाण भरण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला. सोव्हिएट युनियनच्या वैमानिकांनीही ह्या अवघड कामगिरीचे कौतुक केले. १९८५ मध्ये त्यांना दोनशेएकविसाव्या स्क्वॉड्रनची कमांड मिळाली. १९८४ मध्य ओझर येथील बी.आर.डी.तील अल्पावधीच्या वास्तव्यात रशिराकडून मिळणार्‍या नव्या विमानांची तपासणी करण्याचे काम अविनाश जोशी यांनी चाचणी वैमानिक (‘टेस्ट पायलट’) म्हणून केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ह्या स्क्वॉड्रनने अनेक नवी कामे पार पाडली. अधिक उंचीवर केल्या जाणार्‍या आक्रमणांच्या चाचण्या पीर पांजाल भागातील तोष मैदान रेंज व लडाखमधील पंधरा हजार फुटांच्या उंचीवरील कारसो रेंजवर त्यांनी स्वत: पार पाडल्या. वायुसेनेतील निवडक पथकांना अशा ‘हार आल्टिट्यूड फायरिंग’संबंधी प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याचे कामही त्यांनी केले. ‘फोटो रिकॉनिसन्स’, रात्री केली जाणारी अवघड उड्डाणे व इतर गुप्त कामगिर्‍याही ह्याच कालावधीत पार पाडल्या. ‘ऑपरेशन मेघदूत’ही यशस्विरीत्या पार पाडले गेले. ह्या कामांसाठी, त्यांची कमांड पूर्ण झाल्यावर त्यांना ‘वायुसेना’ पदक देण्यात आले. पुढे २००५ च्या जुलैमध्ये ह्याच स्क्वॉड्रनचे कमोडोर कमांडंट म्हणून त्यांची नेमणूक झाली. वायुसेना भवन व वेस्टर्न एअर कमांडमधील चार वर्षांच्या कामानंतर १९९१ मध्ये महू येथे हार कमांड (आर्मी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर राजस्थानमधील उत्तरलाई विमानतळाचे नेतृत्व त्यांच्यावर सोपवण्रात आले. त्यानंतर महूच्या ‘कॉलेज ऑफ कॉम्बॅट’मध्ये त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम केले व बीदर (कर्नाटक) येथील विमानतळाची कमांडरशिप सांभाळली. ‘सूर्यकिरण’ ह्या विमानपथकाच्या उभारणीचे काम त्यांनी मोठ्या कौशल्याने पार पाडले. परंतु त्यांच्या आवडीचे वैमानिक प्रशिक्षणाची उड्डाणे करण्याचे काम शिल्पकार चरित्रकोश ४३७