पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ज जोशी, पंकज शिवराम संरक्षण खंड त्यांनी सोडले नाही. फ्लाइंग ए.ओ.सी. अशी त्यांची ख्याती झाली ती त्यामुळेच! १९८८ मध्ये प्रख्यात नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम केल्यावर सिकंदराबाद येथील ‘कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर’मध्ये त्यांनी ‘डेप्युटी कमांडंट’चा कार्यभाग सांभाळला. त्यानंतर दिल्लीला ‘असिस्टंट चीफ ऑफ द एअर स्टाफ इन्स्पेक्शन व फ्लाइट सेफ्टी’ व ए.सी.ए.एस. पर्सोनेल म्हणून काम केल्यावर २००४ मध्ये एअर मार्शलच्या बढतीच्या रँकवर गांधीनगरला, साउथ वेस्टर्न एअर कमांडमध्ये ‘एस.ए.एस.एस.ओ.’ म्हणून त्यांची बदली झाली. तिथे त्यांनी पोखरण रेंजवरील एअर पॉवर डेमॉन्स्ट्रेशन व मुंबईला झालेल्या अवेअरनेस कॅम्पेन यांचे आयोजन व नियंत्रण केले. मुंबईच्या कॅम्पेनमध्ये प्रथमच वायुसेना व एअर इंडियाच्या विमानांनी एकत्र उड्डाण केले होते. गांधीनगरला असताना, इस्त्रायलला राष्ट्रीय सुरक्षेसंबंधीचा अभ्यासक्रम सुप्रसिद्ध गॅलिली कॉलेजमध्ये करण्याची संधी त्यांना मिळाली. ईस्टर्न एअर कमांडचे ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ (एओसीइनसी) चे महत्त्वपूर्ण पद त्यांना नोव्हेंबर २००४ मध्ये देण्यात आले. इथल्या त्यांच्या वास्तव्यात त्यांच्या कमांडमधील प्रशिक्षणाच्या व इतर कार्यांच्या स्तरात प्रगती घडली. लढाऊ विमानांच्या कामगिरीसाठी प्रथमच नागरी विमानतळांचा वापर झाला. ईशान्येकडील सात राज्यांच्या हवाई सुरक्षेची मोठी जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. त्यानंतर २००५ मध्ये त्यांची नियुक्ती दिल्लीला, ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’चे ‘कमांडर इन चीफ’ म्हणून केली गेली. भूसेना, नौसेना व वायुसेना ह्यांना एकत्रित करून निर्माण केलेली ही कमांड आण्विक शस्त्रास्त्रांसंबंधी कार्यासाठी बनवली होती. प्रत्यक्ष पंतप्रधान, त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व तिन्ही सेनाप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली हे पद सांभाळण्यात ते यशस्वी झाले. ईस्टर्न एअर कमांड व स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडमधील यशस्वी कामगिरीनंतर मार्च २००६ मध्ये त्यांच्या असाधारण कर्तृत्वाचा सन्मान म्हणून राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदका’ने गौरवले गेले. त्याच वर्षी राष्ट्रपतींचे मानद ए.डी.सी. म्हणूनही त्यांचे नाव घोषित केले होते. २००६ वर्षाच्या अखेरीस ४० वर्षांची गौरवपूर्ण सेवा संपवून ते निवृत्त झाले. - गीतांजली जोशी

जोशी, पंकज शिवराम भूसेना - लेफ्टनंट जनरल परमविशिष्टसेवापदक, अतिविशिष्टसेवापदक ९ सप्टेंबर १९४३ - २ जुलै २००९ पंकज शिवराम जोशी भूसेनेच्या अठराव्या गोरखा रायफल्सच्या पलटणीमध्ये कॅप्टन पदावर कार्यरत होते. ही पलटण सिक्कीममधील भारत-चीन सीमेवरील आघाडीच्या १३ हजार ५२५ फुटांवरील ठाण्यामध्ये तैनात होती. १९६५च्या भारत-पाक युद्धात या पलटणीने खेमकरण विभागात कमालीची मर्दुमकी गाजवली होती. १ऑगस्ट१९६७ची ढगाळ आणि पावसाळी पहाट. भारत-चीन सीमेवर पंकज जोशी यांनी नुकताच मोर्चाचा ताबा घेतला होता. त्यांच्या कंपनीला त्यांच्या भोवतालच्या भागात पेरलेले सुरुंग निकामी करण्याच्या सूचना मिळाल्या. त्यानुसार काम चालू झाले. त्या दिवशी सकाळी जोशी यांनी भूसुरुंगाच्या क्षेत्रात नुकताच प्रवेश केला होता. अचानक त्यांच्या पायाखाली मोठा स्फोट झाला. एका सुरुंगावरच त्यांचा पाय पडला होता. ते हवेत उडून जमिनीवर कोसळले. त्यांचा एक पाय ४३८ शिल्पकार चरित्रकोश