पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोशी, अविनाश देवदत्त संरक्षण खंड आले. तेथे दोन वर्षे प्रशिक्षण घेतल्यावर जोगळेकर यांची ‘कोअर ऑफ सिग्नल्स’मध्ये (आर्मी कम्युनिकेशन बँ्रच) सेकंड लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली. १९५१मध्ये त्यांची पहिली नियुक्ती सिग्नल रेजिमेंटला झाली. बिनतारी व दूरध्वनी आणि इतर पद्धतीने सैन्याची संपर्कयंत्रणा सांभाळणे हे त्यांच्या रेजिमेंटचे काम होते. काश्मीरनंतर पंजाब, आसाम, झाशी अशा ठिकाणी त्यांनी काम केले. १९६५मध्ये ते कमांडर झाले. १९६९मध्ये प्रभाकर जोगळेकर यांना लेफ्टनंट कर्नल म्हणून बढती मिळाली. अर्थात ही नियुक्तीही सिग्नल रेजिमेंटमध्येच होती. १९७१ मधील भारत-पाक युद्धाच्या वेळी ते ‘सिग्नल डायरेक्टोरेट’मध्ये मुख्य समन्वयक या पदावर दिल्लीतील सेना मुख्यालयामध्ये कार्यरत होते. त्यानंतर १९७८मध्ये ब्रिगेडियर पदावर पुण्यातील दक्षिण विभाग मुख्यालयामध्ये चीफ सिग्नल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज येथे पदवी घेतली. त्यानंतर १९८०मध्ये ब्रिगेडियर असताना नॅशनल डिफेन्स कॉलेज येथे एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यानंतर दिल्लीत सेना मुख्यालयात ते १९८४मध्ये मेजर जनरल म्हणून सुरुवातीला डेप्युटी सिग्नल ऑफिसर इन चीफ या हुद्द्यावर काम करत होते. जोगळेकर यांना एका वर्षाने डेप्युटी कोड मास्टर जनरल हा हुद्दा मिळाला व डिसेंबर १९८६मध्ये ते तिथूनच निवृत्त झाले.

१९८६च्या जानेवारीमध्ये त्यांना त्यांच्या सैनिकी सेवेसाठी ‘परमविशिष्ट सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. ह्या दोन युद्धांमध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. निवृत्त झाल्यानंतर ते चार वर्षे गुजरातमध्ये अ‍ॅन्टिफ्रिक्शन बेअरिंग्ज कॉर्पोरेशनमध्ये जनरल मॅनेजर या पदावर काम करत होते. १९९१पासून त्यांचे पुण्यात वास्तव्य आहे. मेजर जनरल जोगळेकर सैन्यात असताना हॉकी आणि बास्केटबॉल खेळत असत. त्यांना स्क्वॉश, टेनिस व गोल्फ या खेळांचीही आवड आहे. - रूपाली गोवंडे

जोशी, अविनाश देवदत्त वायुसेना - एअर मार्शल परमविशिष्टसेवापदक २० डिसेंबर १९४६ अविनाश देवदत्त जोशी यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील सैन्य अभियांत्रिकी सेवेमध्ये (एम.इ.एस.) मोठ्या पदावर होते. वडिलांच्या फिरतीच्या नोकरीमुळे अविनाश यांचे शालेय शिक्षण पुणे, हैद्राबाद, विशाखापट्टणम आणि नागपूर येथे झाले. नागपूरच्या हडस् विद्यालयामधून त्यांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी हिस्लॉप महाविद्यालयामध्ये वैद्यकपूर्व पाठ्यक्रमाला प्रवेश घेतला. त्याच वेळी थेट प्रवेश पद्धतीतून १९६४ मध्ये त्यांना वायुसेनेत प्रवेश मिळाला. वायुसेनेत एअरफोर्स अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेज (कोईंबतूर), ई.एफ.टी.यू. (नागपूर), पायलट ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंट (अलाहाबाद), एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज (जोधपूर), नं १ जेट ट्रेनिंग विंग (हकीमपेठ) अशा विविध संस्थांमध्ये त्यांचे प्रशिक्षण झाले. एल-५, एचटी-२, हावर्ड व व्हॅम्पायर अशा विविध विमानांवर त्यांना वैमानिक कौशल्याचे धडे मिळाले. या प्रत्येक पातळीवर त्यांनी सर्वांत कमी कालावधीत पहिले ‘सोलो’ उड्डाण केले. तसेच त्यात प्रथम क्रमांक पटकाविण्याचा विक्रम केला. अविनाश जोशी यांना ४ जून १९६७ रोजी नियुक्ती मिळाली व तत्कालीन ४३६ शिल्पकार चरित्रकोश