पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चिटणीस, हेमंत रामकृष्ण संरक्षण खंड हेलिकॉप्टरचे एखादे इंजिन बंद पडले तर असे हेलिकॉप्टर जहाजावर उतरावयाचे नाही असा या हेलिकॉप्टरबाबत दंडक होता. आय.एन.एस. रजपूतवर रशियन हेलिकॉप्टर उतरवत असताना त्याचे एक इंजिन निकामी झाले. एक इंजिन बंद पडलेले हेलिकॉप्टरही आपण व्यवस्थितरीत्या जहाजाच्या डेकवर उतरवू शकतो असे चिटणीस यांनी जहाजावर कळवले. अत्यंत काळजीपूर्वक व सावकाशपणे त्यांनी हे हेलिकॉप्टर जहाजावर उतरवले. असे नादुरुस्त झालेले हेलिकॉप्टर जहाजावर उतरवण्याचे धाडस रशियन वैमानिकांनीही केले नव्हते. या त्यांच्या कृतीमुळे प्रवाशांचे प्राण वाचले आणि हेलिकॉप्टरही सुखरूप राहिले. या त्यांच्या धाडसासाठी त्यांना ‘शौर्यचक्र’ प्रदान करण्यात आले. अजय चिटणीस यांनी जून २००१ मध्ये भारतीय नौसेनेतून सेवानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी व्यापारी नौदलामध्ये नवीन कामास सुरुवात केली. पुरवठा जहाजांवर ‘मास्टर’ या पदावर त्यांनी पाच वर्षे काम केले. सध्या ते ग्रेट ऑफशोअर लि., या कंपनीत प्रशिक्षण प्रमुख म्हणून काम बघत आहेत. - वर्षा जोशी-आठवले

चिटणीस, हेमंत रामकृष्ण वायुसेना - एअर मार्शल परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, वायुसेना पदक १९ फेब्रुवारी १९२४ -

हेमंत रामकृष्ण चिटणीस यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील रामकृष्ण उर्फ बाळासाहेब चिटणीस हे ठाण्यातील नामवंत वकील होते. चिटणीस यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे येथील एम्. एच्. विद्यालयात झाले. मुंबईत एलफिन्स्टन महाविद्यालयात शिकत असतानाच ते १९४३ मध्ये पुण्यात वायुसेनेत दाखल झाले. १९४४ मध्ये त्यांना सिकंदराबादला नियुक्ती मिळाली. अंबाला, पेशावर इत्यादी ठिकाणी ते काही काळ होते. नंतर त्यांना ब्रह्मदेशावर झालेले जपानी आक्रमण थोपवण्यासाठी रंगूनला पाठवण्यात आले. 

१९४६ मध्ये चिटणीस कलकत्ता येथे परतले आणि तेथून उड्डाण प्रशिक्षक अभ्यासक्रमासाठी इंग्लंडला गेले. हा सात महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते भारतात परत आले. त्यांच्या प्रयत्नाने १९४७ मध्ये अंबाला येथे ‘फ्लाइंग इन्स्ट्रक्टर्स स्कूल’ची स्थापना झाली. १९५२-५२ च्या दरम्यान त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेत वायुसेना विभागाची स्थापना मुंबईत केली. १९५२ ते १९५४ या काळात जोधपूर अ‍ॅकॅडमीत स्क्वॉड्रन लीडर म्हणून त्यांना बढती मिळाली. हैद्राबादेतील हकीम पेठमधील तळावर असिस्टंट डायरेक्टर ऑफ फोरकास्टिंग अँड प्लॅनिंग आणि हंटर विमानाचे स्क्वॉड्रन लीडर म्हणून १९६० पर्यंत त्यांनी काम पाहिले. १९६० मध्ये विंग कमांडर म्हणून दिल्ली येथे मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये त्यांची बदली झाली. ते ‘जॉईंट आपरेशन कमांड’मध्ये कार्यरत होते. याच काळात चिटणीस वेलिंग्टन येथे डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये दाखल झाले व १९६१-६२ मध्ये तेथील परीक्षा उत्तीर्ण झाले. १९६२ मध्ये चिनी आक्रमणाच्या काळात त्यांची नियुक्ती दिल्लीला सेनाध्यक्षांच्या समितीवर झाली. १९६३ मध्ये चुम्बी व सिलिगुडी नेक येथे चिनी आक्रमणाची शक्यता ध्यानात घेऊन त्यांची बदली बदादोरा वायुदलाच्या तळावर झाली. १९६५ मध्ये चिटणीस दिल्लीला परत आले. त्यानंतर त्यांनी विविध महत्त्वाची पदे भूषविली. वायुसेनेतील सैनिकांची वेतन आयोगाला द्यावयाची कैफियत त्यांनी तयार केली. १९६९ मध्ये चिटणीस यांना वायुसेनेचे पहिले पदक एअर मार्शल अर्जनसिंग यांच्या हस्ते मिळाले. नंतर ४३० शिल्पकार चरित्रकोश