पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गोखले, भूषण नीळकंठ संरक्षण खंड असा पेच मराठी वृत्तपत्रांपुढे उभा राहिला. त्या वेळी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वृत्तसंपादक असलेल्या गोखले यांनी हे आव्हान स्वीकारले आणि या युद्धाचे दररोज विश्लेषण करणारा स्तंभ लिहिण्यास सुरुवात केली. मराठी वर्तमानपत्रातला हा पहिलाच प्रयोग होता आणि तो कमालीचा गाजला. पुढे या स्तंभातील लेखांचे पुस्तक प्रसिद्ध झाले, तेव्हा त्याला पु.ल. देशपांडे यांनी प्रस्तावना लिहून गोखले यांच्या युद्धविषयक लिखाणाचा गौरव केला. १९६२ च्या युद्धामुळे सैन्याला अनेक नव्या गोष्टी शिकाव्या लागल्या. त्यातली एक म्हणजे वृत्तपत्रांशी संपर्क ही एक गोष्ट होय. यानंतर सैन्याची कार्यालय पत्रकारांसाठी खुली झाली व त्यांना बोलावून आवश्यक ती माहिती देण्यात येऊ लागली. त्यांना सैन्याचे कार्य दाखविण्यात येऊ लागले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ इंग्रजी वृत्तपत्रांशी संबंध ठेवणार्‍या सैन्याचा प्रादेशिक वृत्तपत्रांशी संबंध दिवसेंदिवस वाढू लागला. याचे श्रेय गोखले यांना द्यावे लागेल. युद्धाचे विश्लेषण करण्यासाठी सैन्याच्या युद्धपद्धती व युद्धनीतीची माहिती असावी लागते. तसेच कोणती शस्त्रे व अस्त्रे केव्हा व कशी वापरली जातात, याचीही माहिती असावी लागते. गोखले यांच्या काळात ही माहिती देण्याएवढे भारतीय सैन्य पारदर्शक झाले नव्हते. त्यामुळे गोखले यांना पहिल्या व दुसर्‍या महायुद्धावर पाश्चात्त्य लेखकांनी लिहिलेली खूप पुस्तके वाचून अभ्यास करावा लागला. त्यातून त्यांनी जे निष्कर्ष व ठोकताळे काढले ते बरोबर आहेत की नाही, याचा सेनाधिकार्‍यांशी चर्चा करून पडताळा घ्यावा लागला. त्यामुळे अनेक उच्चपदस्थ सेनाधिकार्‍यांशी त्यांच्या ओळखी झाल्या. त्यामुळेच १९७१ चे बांगलादेश युद्ध, अरब-इस्त्रायल युद्ध, फॉकलंड युद्ध आणि पहिले इराक-अमेरिका युद्ध यांचे अचूक विश्लेषण करणारे स्तंभलेखन ते करू शकले. या निमित्ताने त्यांना शेकडो युद्धविषयक ग्रंथ, युद्धनेत्यांची चरित्रे, आत्मचरित्रे, इतिहास या विषयांवरची पुस्तके वाचावी लागली. त्यातून त्यांनी स्वत: अनेक पुस्तके लिहिली. त्यांतील ‘माओचे लष्करी आव्हान’, ‘युद्ध नेतृत्व’, ‘पहिले महायुद्ध’ ही पुस्तके गाजली. लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांच्या इंग्रजी आत्मचरित्राचा ‘माझी शिपाईगिरी’ या नावाने मराठी अनुवाद त्यांनी प्रसिद्ध केला. गोखले यांच्यातील पत्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडला होता. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला प्रखर राष्ट्रवादाची जोड होती. त्यांनी त्या वेळी सुरू केलेली अनेक सदरे पुढे ‘म.टा.’मध्ये जशीच्या तशी चालू राहिली. युद्धशास्त्राच्या अभ्यासकाला कार्ल फान क्लॉजवित्स या युद्धतज्ज्ञाच्या ‘ऑन वॉर’ या ग्रंथाला टाळून पुढे जाताच येत नाही. जगातल्या सर्व युद्धतज्ज्ञांची ती ‘गीता’च आहे. गोखले यांनी या ग्रंथाच्या अनुवादाचे काम निवृत्तीनंतर हाती घेतले होते. हा अनुवाद शेवटच्या टप्प्यात असताना गोखले यांना कर्करोगाने ग्रासले. तरीही त्यांनी हे काम जिद्दीने पूर्ण करीत आणले. परंतु त्याच्या प्रकाशनाच्या आधीच त्यांना मृत्युने गाठले. त्यांच्या मृत्युनंतर ‘युद्धमीमांसा’ या नावाने हा ग्रंथ प्रकाशित झाला. गोखले यांच्या युद्धपत्रकारितेने अनेक तरुण पत्रकारांना प्रेरित केले. स्वत: गोखले मराठी पत्रकारितेत तरुण युद्धपत्रकार तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करीत व प्रोत्साहन देत. त्यामुळे मराठी युद्धपत्रकारितेचे जनक म्हणून ‘दि.वि.’ यांचे नाव घेतले जाणे अपरिहार्य आहे. - दिवाकर देशपांडे

गोखले, भूषण नीळकंठ वायुसेना - एअर मार्शल परमविशिष्टसेवापदक, अतिविशिष्टसेवापदक २५ डिसेंबर १९४७ भूषण नीळकंठ गोखले यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शिक्षण पुण्यातल्या बालशिक्षण मंदिर आणि

४२४ शिल्पकार चरित्रकोश