पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग । संरक्षण खंड फूट उंचीवर असलेल्या ‘से ला’ खिंडीच्या परिसरात माउंटन ब्रिगेडच्या सिग्नल विभागात त्यांनी कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्य केले. ‘बोमदि ला’, ‘से ला’, तवांग, पेनकिन्सो अशा उंच शिखरांवरील संपर्कव्यवस्थेचा आराखडा ठरविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण वाटा उचलला. डिसेंबर १९७१ ते जानेवारी १९७२ या काळात त्यांची नेमणूक जम्मू-काश्मीर येथे रणभूमीवर होती. या वेळी शत्रूकडून सुमारे एक लाख चौरस फूटांएवढा भूप्रदेश जिंकून घेण्यासाठी त्यांनी मोठा पराक्रम गाजविला. अशा प्रकारे युद्धकक्षातील अत्युच्च दर्जाची कामगिरी केल्याने पुणे येथील भूसेनेच्या दक्षिण विभागाच्या मुख्यालयात चीफ सिग्नल ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. दळणवळण व्यवस्थेची धोरणे निश्चित करून त्यांची योग्य अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी येथे पार पाडले. याच प्रकारचे कार्य त्यांनी लखनऊ येथील मध्य विभाग मुख्यालय आणि उधमपूर येथील उत्तर विभाग मुख्यालय येथेही मोठ्या जबाबदारीने पार पाडले. वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी सेवानिवृत्त होताना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (१९८४) देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण सेवाकालात आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा व अचूक निर्णयक्षमतेचा प्रत्यय त्यांनी वारंवार दिला. सेवानिवृत्तीनंतर लगेचच, म्हणजे फेब्रुवारी १९८४ मध्ये पुण्यातील फिनोलेक्स केबल्स लि. व फिनोलेक्स सॉफ्टवेअर सिस्टिम्सच्या संचालकपदावर त्यांची निवड झाली. त्यांनी या पदावर १९९८ पर्यंत कार्य केले. त्यानंतर अशोक ऑरगॅनिक इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीत पूर्णकालीन संचालक म्हणून त्यांनी काम केले. मध्य गुजरातमधील वडोदरा, अंकलेश्वर व बोरीदरा येथे या संस्थेची मुख्यालये होती. इथाइल अल्कोहोल व संलग्न उत्पादने घेणार्‍या या कंपनीला त्यांनी नाजूक स्थितीतून बाहेर काढले व भरघोस फायदा मिळविणारी कंपनी म्हणून नावारूपास आणले. अशोक अल्कोहोल्स लिमिटेड या कंपनीची वालचंदनगर व महाड येथे स्थापना करण्यातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानेही उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला. सध्या त्यांचे पुणे येथे वास्तव्य आहे. - ज्योती आफळे

गोखले, दिनकर विनायक युद्ध पत्रकार २५ मार्च १९२३ - २० ऑक्टोबर १९९६ ऋमुख्यनोंद-पत्रकारिताआणिललितेतरसाहित्यखंड मराठीत संरक्षण पत्रकारिता सुरू करणारे आद्य पत्रकार म्हणून दिनकर विनायक गोखले ओळखले जातात. आता भारतात युद्धपत्रकारितेने खूपच प्रगती केली आहे व वार्ताहर प्रत्यक्ष रणभूमीवरून युद्धाच्या बातम्या पाठवू शकतात. पण ज्या काळी हे शक्य नव्हते व एवढी साधने नव्हती, तेव्हा संरक्षण खात्याकडून आणि सैन्यातील माहीतगारांकडून माहिती मिळवून युद्धाचे वृत्त द्यावे लागे. गोखले अशा प्रकारे वृत्त देणारे व विश्लेषण करणारे पहिले मराठी पत्रकार होत. दि. वि. गोखले यांनी मुंबईच्या ‘नवशक्ती’ या दैनिकात १९४५ मध्ये पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली. नंतर १९६२ मध्ये ते ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये गेले व तेथे वृत्तसंपादक, सहसंपादक या पदांवर काम करून ते १९८५ मध्ये निवृत्त झाले. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. त्या वेळी मराठी पत्रकारितेने पूर्ण व्यावसायिक रूप धारण केले होते. त्यामुळे त्या वेळी या युद्धाचे वृत्त कसे द्यावे आणि युद्ध डावपेचांचे विश्लेषण कसे करावे शिल्पकार चरित्रकोश ४२३