पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुप्ते, राजेंद्र केशव संरक्षण खंड यशस्वी करण्यात कॅप्टन रुस्तुम गांधी यांनी मोलाची कामगिरी बजावली. आपल्या मोहिमांदरम्यान कॅप्टन रुस्तुम गांधी यांनी धाडस, निष्ठा आणि नेतृत्वगुणांचे सर्वोच्च प्रदर्शन घडविले. या कामगिरीबद्दल त्यांना डिसेंबर १९७१ मध्येे ‘वीरचक्र’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नोकरीच्या उर्वरित काळात ‘परमविशिष्ट सेवा पदक’ देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला. - रूपाली गोवंडे

गाडगीळ मिलिंद युद्ध पत्रकार ऋमुख्यनोंद-पत्रकारिताआणिललितेतरसाहित्यखंड

गुप्ते, राजेंद्र केशव भूसेना - मेजर जनरल परमविशिष्टसेवापदक ५ डिसेंबर १९२७ राजेंद्र केशव गुप्ते यांचा जन्म मध्यप्रदेशातील कटणी येथे झाला. पुण्यातील आंबेगाव हे त्यांचे मूळ गाव. आंबेगावकर गुप्ते म्हणूनच ते सर्वांना परिचित आहेत. सरदार गायकवाडांनी त्यांच्या पणजोबांना वडोदरा (बडोदा) येथे नेले व सुमारे ६० एकर जमीन बक्षीस दिली. तेथे ते वरिष्ठ नागरी अधिकारी म्हणून काम पाहात. तेव्हापासून आजतागायत त्यांच्या सहा पिढ्या वडोदर्‍यातच वाढल्या. त्यांचे वडील इंपीरियल बँक ऑफ इंडिया येथे व्यवस्थापक होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धुळे, वडोदरा व अमरावती येथे झाले. त्यानंतर पुणे येथील वाडिया महाविद्यालयात त्यांनी दोन वर्षे शास्त्रशाखेचे शिक्षण घेतले. त्या काळी युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्स नव्यानेच सुरू झाला होता. तेथे त्यांनी प्रवेश घेतला. वडिलांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे एप्रिल १९४६ मध्ये त्यांनी सैनिकी प्रवेश परीक्षा दिली व ते उत्तम प्रकारे उत्तीर्णही झाले. डेहराडून येथे प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘रेडिओ अभियांत्रिकी’ या अडीच वर्षांच्या कोर्ससाठी त्यांची निवड झाली. या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने महू येथील सैनिकी महाविद्यालयात कनिष्ठ प्रशिक्षक म्हणून ते रुजू झाले. १९५० मध्ये कॅप्टन म्हणून त्यांना बढती मिळाली. अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी दिलेल्या स्पर्धापरीक्षेतही त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यानंतर अमेरिकेतील चेल्पार्क येथील मार्कोनी कॉलेज ऑफ रेडिओ इंजिनिअरिंग येथून त्यांनी मार्च १९५३ ते जुलै १९५६ या काळात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले. पुढे दिल्लीमध्ये मुख्यालयात ‘स्टाफ ऑफिसर इन चार्ज’ या पदावर त्यांना बढती मिळाली. सैन्यासाठी उपयोगात येणार्‍या इलेक्ट्रॉनिक साधनांचा विकास साधण्याचे व त्यासाठीच्या दीर्घकालीन योजना आखण्याचे जबाबदारीचे काम त्यांनी या कालावधीत पार पाडले. त्यांनी आखलेला धोरणांचा हा आराखडा पुढे भारतीय प्रशासनाने जसाच्या तसा स्वीकारला. डॉ. होमी भाभा समितीनेही त्यांच्या या कार्याचे विशेष कौतुक केले. १९६२ च्या भारत-चीन युद्धात पूर्वेकडील सीमेवर त्यांनी सेकंड-इन-कमांड म्हणून काम पाहिले. त्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीतील मुख्यालयात त्यांना धोरण व सुसंवाद अधिकारी म्हणून बोलवण्यात आले. १९६५ मध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून, तर १९७४ मध्ये ब्रिगेडिअर म्हणून त्यांना बढती मिळाली. सैन्यात सिग्नल यंत्रणेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषत: १९६५ व १९७१ च्या युद्धांमध्ये आजसारखी संपर्क साधने अस्तित्वात नसल्याने ही यंत्रणा म्हणजे संपूर्ण सैन्याचा कणा समजला जाई. याच काळात त्यांनी सिग्नल कोअरचे आधुनिकीकरण केले. पुढे १४,००० ४२२ शिल्पकार चरित्रकोश