पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग । संरक्षण खंड गांधी, रुस्तुम खुशरो शापोरजी त्यांप्रदान करण्यात आले. हा सन्मान स्वीकारणारे ते सर्वांत कमी वयाचे अधिकारी होते. त्यांनी अनेक शिक्षणक्रम यशस्वीरित्या पूर्ण केले. फायटर कॉम्बॅट लीडर्स कोर्स, ज्युनिअर कमांड, हायर एअर कमांड, सीनियर डिफेन्स मॅनेजमेंट आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्स अशा पाठ्यक्रमांत त्यांनी उत्तम यश मिळवले. नायजेरियन वायुसेनेत प्रशिक्षक म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले. महू येथील आर्मी कॉलेज ऑफ कॉम्बॅट मध्ये त्यांनी निर्देशक प्रशिक्षकाचा (स्टाफ डायरेक्टिंग एअर) कार्यभार सांभाळला. त्यानंतर त्यांनी सिकंदराबादच्या कॉलेज ऑफ एअर वॉरफेअरचे कमांडंटचे पद भूषविले. पंधराव्या स्क्वॉड्रनचे व चाळीसाव्या विंगचे नेतृत्व केले. .वायुसेनेच्या मुख्यालयात ‘अ‍ॅडिशनल असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ-ऑपरेशन्स’, ‘असिस्टंट चीफ ऑफ एअर स्टाफ-पर्सोनेल’ अशी महत्त्वाची पदे सुद्धा सांभाळली. वायुसेनेच्या नैऋत्य विभागामध्ये गांधीनगर येथे सीनियर एअर स्टाफ ऑफिसर म्हणून काम केले. मानाचा शिरपेच समजल्या जाणार्‍या वायुसेनेच्या पश्चिम विभागात व नैऋत्य विभागाचे सर्वोच्च अधिकारी म्हणजेच ‘एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ’ म्हणून त्यांनी मोठ्या कौशल्याने धुरा सांभाळली. त्यांना वीरचक्र (१९६५), एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफचे प्रशस्तिपत्र (१९७५), चीफ ऑफ एअर स्टाफचे प्रशस्तिपत्र (१९७८), अतिविशिष्ट सेवा पदक (१९९४) व परमविशिष्ट सेवा पदक (२००३) असे सन्मान मिळाले. १९८७ मध्ये महाराष्ट्र शासनाचा गौरव पुरस्कार व १९९४ मध्ये फेडरेशन ऑफ पारशी अंजुमनने दिलेला ‘कर्नल अडी तारापोर अचीव्हमेंट पुरस्कार’ही त्यांना मिळाले. डॉ. राधाकृष्णन, शंकर दयाळ शर्मा व डॉ. अब्दुल कलाम ह्या तीन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारण्याचे भाग्य त्यांना लाभले. - गीतांजली जोशी

गांधी, रुस्तुम खुशरो शापोरजी नौसेना - व्हाइस अ‍ॅडमिरल परमविशिष्टसेवापदक, वीरचक्र १ जुलै १९२४

रुस्तुम खुशरो शापोरजी गांधी यांचा जन्म मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १ मे १९४५ पासून त्यांनी भारतीय नौसेनेत सेवेस सुरुवात केली.

१९७१ च्या भारत-पाक युद्धात कॅप्टन रुस्तुम गांधी यांच्याकडे नौसेनेच्या पश्चिम विभागातील ताफ्याचेे फ्लॅग कॅप्टन म्हणून जबाबदारी होती. शत्रूच्या पाणबुड्या आणि वायुसेनेकडून मोठा धोका होता. परंतु गांधी यांनी धोक्याची पर्वा न करता त्यांनी पश्चिम विभागातील तुकड्यांचे अत्यंत स्फूर्तीने नेतृत्व केले आणि कराची बंदराकडे जाणार्‍या सर्व मार्गांवरील दबाव कायम ठेवला. कराची बंदराच्या परिसरात या तुकड्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे एकाही जहाजाला बंदरात प्रवेश करणे शक्य झाले नाही. अशा प्रकारे नौसेनेची कारवाई

शिल्पकार चरित्रकोश ४२१