पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड आवटी, मनोहर प्रल्हाद ते । आ | इ आ ते इ आवटी, मनोहर प्रल्हाद नौसेना - अ‍ॅडमिरल परमविशिष्टसेवापदक, वीरचक्र ७ सप्टेंबर १९२७ मनोहर प्रल्हाद आवटी यांचा जन्म गुजरात राज्यातील सुरत येथे झाला. त्यांच्या आईचे नाव शांताबाई होते. नगर जिल्ह्यातील त्या वेळच्या राहुरी तालुक्यातील मळुंजे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे पूर्वज नारोपंत रत्नपारखी ह्यांनी राघोबादादांची नदीत हरवलेली वस्तू शोधून परत आणून दिली. त्यांच्या ह्या कामगिरीवर खूष होऊन पेशव्यांनी त्यांना ‘आवटकी’ (शासकीय महसुलाचा अंदाजे एक दशांश भाग) बहाल केली. त्याच आवटकीचे पुढे आवटी ह्या आडनावात रूपांतर झाले. आवटी ह्यांचे पूर्वज उच्चशिक्षित, वैभवसंपन्न असून समाजसुधारणेसाठी, विशेषत: स्त्रियांच्या प्रश्नांबाबतीत कार्यरत होते. एफ.आर.सी.एस., एम.आर.सी.पी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या त्यांच्या आजी श्रीमती द्वारकाबाई केळवकर ह्या सुरतच्या महिलांसाठी असलेल्या तत्कालीन गोषा रुग्णालयाच्या पर्यवेक्षिका होत्या. आवटी यांचे शालेय शिक्षण हे १९३५ ते १९४२ ह्या कालावधीत मुंबईतील दादरमधील राजा शिवाजी विद्यालय (तत्कालीन किंग जॉर्ज शाळा) येथे झाले. १९४२मध्ये महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आवटी भावंडांची रवानगी कोल्हापूर येथे झाली. जून १९४२मध्ये त्यांनी कोल्हापूरहून थेट पुण्यातील डेक्कन जिमखाना येथील शाळेत (सध्याची विमलाबाई गरवारे प्रशाला) सातवीत प्रवेश घेतला. ‘डफरीन’ या प्रशिक्षण जहाजावर शिकणार्‍या मोठ्या भावाच्या रुबाबाकडे आकर्षित होऊन ऑक्टोेबर १९४२मध्ये त्यांनीही डफरीनची प्रवेश परीक्षा दिली. शिष्यवृत्तीसह उत्तीर्ण झाल्यावर त्यांचे पुढील शिक्षण डफरीनमध्ये पार पडले. सप्टेंबर १९४५मध्ये रॉयल इंडियन नेव्हीच्या परीक्षेत त्यांची सरकारतर्फे पुढील शिक्षणासाठी ब्रिटन येथे रवानगी झाली व मार्च १९५० मध्ये शिक्षण पूर्ण करून ते भारतात परतले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर रॉयल इंडियन नेव्हीचे ‘भारतीय नौसेने’त रूपांतर झाले. त्या वेळचे राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी २७ मे १९५१ रोजी आपला पहिला ध्वज नौसेनेला मुंबईत बहाल केला. आवटी यांनी १९६१ ते १९६४ ह्या कालावधीमध्ये लंडन येथे तत्कालीन उपायुक्त विजयालक्ष्मी पंडित यांचे सल्लागार म्हणून काम पाहिले. त्यांनी १९६०मध्ये ‘आय.एन.एस. बेटवा’चे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम पाहिले. पुढे १९६५-१९६६ मध्ये ‘आय.एन.डी.एस. तीर’ या प्रशिक्षण नौकेचे व १९६६-१९६७ मध्ये सिग्नल स्कूलचे काम त्यांनी पाहिले. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे मुख्य प्रशिक्षक म्हणून १९६७ ते १९७० मध्ये त्यांनी कार्यभार सांभाळला. १९७१मध्ये पाकबरोबरील युद्धात त्यांच्या नेतृत्वाखालील भारतीय नौसेनेने अतुलनीय कामगिरी शिल्पकार चरित्रकोश ४११