पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आ इ ते । इंजिनिअर, मीनू मेरवान संरक्षण खंड बजावली. त्यांनी शत्रुपक्षाची तीन जहाजे ताब्यात घेतली, तसेच एक पाणबुडी उद्ध्वस्त केली. १९७१च्या युद्धामधील युद्धकैद्यांना घेऊन त्यांनी चितगाव ते कलकत्ता असा प्रवास केला. त्यांच्या ह्या कामगिरीबद्दल त्यांना जानेवारी १९७२मध्ये ‘वीरचक्र’ प्रदान करण्यात आले तसेच फलटणजवळ जमीनही देण्यात आली. ‘आय.एन.एस. म्हैसूर’चे १९७३-१९७४मध्ये ते कमांडिंग ऑफिसर होते. १९७५मध्ये रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीजचे, तर १९७६-१९७७मध्ये राष्ट्रीय रक्षा प्रबोधिनी (एन.डी.ए) चे कमांडर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९७९-१९८० दरम्यान नौसेना मुख्यालयात उपप्रमुख, तर १९८० ते १९८३ या काळात ते नौसेनेच्या पश्चिम विभागाचे प्रमुख होते. ३१ मार्च १९८३ रोजी ते सेवानिवृत्त झाले. नौदलातील त्यांच्या सेवेबद्दल २६ जानेवारी १९८२ रोजी त्यांना ‘परमविशिष्ट सेवा पदक’ बहाल करण्यात आले. निवृत्तीनंतर त्यांनी तोलानी शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये अध्यक्ष म्हणून नोकरी पत्करली, तसेच ब्लिट्झ प्रकाशनाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम बघितले. भारताच्या सागरी इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि त्याबद्दलची एकंदर अनास्था पाहून त्यांनी १९७८मध्ये ‘मेरिटाइम हिस्टरी सोसायटी ऑफ इंडिया’ची स्थापना केली. याद्वारे सागरी सामरिक इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे, त्याच्या अभ्यासाकरिता शिष्यवृत्ती देणे व विद्यापीठांमध्ये या विषयाचा समावेश करण्याचा आग्रह धरणे इत्यादी उपक्रम या संस्थेतर्फे केले जातात. मराठा आरमाराचे प्रमुख सरदार कान्होजी आंग्रेंच्या अलिबाग येथील स्मारकाच्या कामात त्यांनी या संस्थेचे प्रमुख म्हणून विशेष लक्ष घातले. त्यांच्या विशेष प्रयत्नांतून भारतीय नौसेनेचा इतिहास सांगणारे संग्रहालय त्याच परिसरात उभे राहिले आहे. सध्या त्याची देखभाल भारतीय नौसेना करीत आहे. ‘वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर’ या संस्थेच्या महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मेरिटाइम हिस्टरी सोसायटी ऑफ इंडियातर्फे आत्तापर्यंत सागरी इतिहासाशी संबंधित बारा पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांमध्ये आवटी यांचा पूर्ण सहभाग होता. भारतीय वनसेवेतील आय.एफ.एस अधिकारी एम.एम. जामखंडीकर यांच्या डायरीवर आधारित ‘रिलेशन ऑफ होमोसॅपिअन अ‍ॅण्ड पॅन्थेरा लिओ’, तसेच ‘द व्हॅनिशिंग इंडियन टारगर’ या दोन पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या जहाजामधून जगप्रवास करण्याच्या मोहिमेचे ते मार्गदर्शक आहेत. इकॉलॉजिकल सोसायटीच्या माध्यमातून ते ‘पर्यावरण’ हा विषय हाताळतात. निवृत्तीनंतर त्यांचा मुक्काम फलटणजवळील विंचुर्णी या गावात आहे. - प्रणव पवार

इंजिनिअर, मीनू मेरवान वायुसेना - एअर मार्शल पद्मभूषण, महावीरचक्र, परमविशिष्ट सेवा पदक १ डिसेंबर १९२१ मीनू मेरवान इंजिनिअर यांचा जन्म मुंबईत झाला. ते त्यांच्या भावंडांमध्ये सहावे होते आणि त्यांचे दोन मोठे भाऊ सेनादलात अधिकारी होते. मीनू यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात झाले. १ ऑगस्ट १९४० रोजी ते भारतीय वायुसेनेत वैमानिक म्हणून दाखल झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रह्मदेशातील युद्धात ४१२ शिल्पकार चरित्रकोश