पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सालच्या गुजरातच्या भूकंपात आणि २००४ सालच्या अंदमानमधल्या त्सनामी संकटातही वायुसेनेने आपले मदतकार्य चालू ठेवले. त्सुनामीमुळे अंदमानमधल्या वायसेनेच्या तळाचे अतोनात नुकसान झाले होते. खूप मोठ्या प्रमाणावर वायुसेनेची जिवीत हानी व साधनसामग्रीची हानी झाली असुनही वायुसेनेने आपले मदतकार्य जारी ठेवले. एप्रिल २०११ मध्ये ही प्रस्तावना लिहीली जात असताना लिबियातील अंतर्गत लढाईत भारतीय नागरिकांना सुखरुप स्वदेशी आणण्याची कामगिरीही भारतीय वायुसेनेने तत्परतेने यशस्वी केली आहे. हाली जात असताना लिबियातील अंतर्गत लढाईत अडकलेल्या तसेच जपानमधील भूकंपप्रवास नागरिकांना मदत म्हणन भारतीय वायुसेने तातडीने आयएल-७६ विमानातून आवश्यक मदत सामग्री पोहोचवली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या कार्यात सहभाग विविध परकीय देशांमधल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मोहिमांमध्ये भारतीय वायुसेना नेहमीच सहभागी होत आली आहे. त्या-त्या देशांमधल्या स्थानिक जनतेकडून त्याबाबत तिचे नेहमीच कौतुक झाले आहे. १९५२- १९५३ मधल्या कोरिया किंवा काँगो मोहिमेपासून ते १९९३ च्या सोमालिया मोहिमेपर्यंत प्रत्येक वेळी भारतीय वायुसेनेने आपला वाटा उचलला आहे. नंतरच्या काळातही सुदान, सिएरा लिओने किंवा अगदी कालपरवा झालेल्या काँगो पेचप्रसंगात वायुसेनेने योग्य तो सहभाग दिलेला आहे. नवे सहस्रक एकविसाव्या शतकात, नव्या सहस्रकातही भारतीय वायुसेनेची गरुडभरारी सुरूच आहे. एसयू- ३० आणि मानवरहित विमान या नव्या विमानांनी वायुसेनेच्या प्रहारक्षमतेची धार आणखी वाढवली आहे. आयएल- ७८ हेही आणखी एक नवे विमान वायुसेनेत दाखल झाले आहे. २६ जानेवारी २००२ रोजी वायुसेनेच्या इतिहासात एक नवे गौरवशाली पान लिहिले गेले. भारत सरकारने एअर चीफ मार्शल अर्जनसिंग यांना भारतीय वायुसेनेचे ‘मार्शल ऑफ एअरफोर्स' असा किताब दिला. भूसेनेत जसा ‘फील्ड मार्शल' हा सर्वोच्च मानांकित पद आहे, तसाच हेही वायुसेनेतील मानांकित पद आहे. ४ जानेवारी २००१ रोजी विंग कमांडर राजीव कोठियाल यांनी ‘लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट' या विमानाचे पहिले उड्डाण केले. हे विमान पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. ही एक अतिशय अभिमानास्पद घटना आहे. या विमानाचे नाव 'तेजस' असे ठेवण्यात आले असून २०१२ पासून ते मिग-२१ ची जागा घेईल. त्याचप्रमाणे 'इंद्र' या संपूर्ण भारतीय बनावटीच्या रडार यंत्रणेचा व जमिनीवरून आकाशात मारा करणा-या 'आकाश' या क्षेपणास्त्राचाही समावेश झाल्यामुळे वायुसेनेचे सामर्थ्य अनेक पटीने वाढले आहे. त्याचप्रमाणे, आकाशातच इंधन भरणारी यंत्रणा आणि ‘अॅबॅक्स' ही रडार प्रणालींच्या समावेशाने वायुसेना पुन्हा अत्याधुनिक बनली आहे. भविष्याचा वेध । २००७ साली भारतीय वायुसेनेने आपला अमृत महोत्सव म्हणजे पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला. आपल्या आकाशाचे कमालीच्या सावधानतेने रक्षण करणे, लढायांमध्ये यश मिळवणे, नैसर्गिक संकटात तत्परतेने धावून जाणे, आपल्या उदात्त परंपरांची जपणूक करत असतानाच तांत्रिकदृष्ट्या सतत अत्याधुनिक राहणे, अशा सर्व देदीप्यमान वैशिष्ट्यांसह वायुसेनेची आगेकूच सुरूच आहे. आजच्या आण्विक युगातही शिल्पकार चरित्रकोश ४०९