पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कारगिल मोहीम | २६ जून १९९९ रोजी लडाखमधील कारगिलजवळच्या हिमालय पर्वतीय रांगांमध्ये 'ऑपरेशन सफेद सागर' ही मोहीम सुरू झाली. आजवर जगातल्या कोणत्याही वायूसेनेने कधीही हाती न घेतलेली, अशा प्रकारची ही अद्वितीय मोहीम होती. अद्वितीय यासाठी, की पर्वतीय प्रदेशात, इतक्या उंचीवर, दर मिनिटाला बदलणा-या हवामानात, छोट्या-छोट्या गटांमध्ये विखरून, लपतछपत घुसखोरी करणा-या शत्रूविरुद्ध ही मोहीम होती. वायुसेनेने शत्रूची रसद तोडली आणि लढाईचा तोल आपल्या बाजूने झुकवला. यामुळे लढाई झपाट्याने संपली. पाकिस्तानी सेनापतींनीही वायुसेनेचे हे निर्णायक वर्चस्व मान्य केले. वायुसेनेने या लढाईत आपले पाच झुजार मोहरे गमावले; पण देश जिंकला. | अशा प्रकारे १९८० आणि १९९० च्या दशकांत भारतीय वायुसेनेचे झपाट्याने आधुनिकीकरण झाले. मिग-२३, मिग-२७, जग्वार आणि तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम विकास मानले जाणारे एसयू-३० ही सगळी विमाने याच काळात वायुसेनेत सामील झाली. | भारतीय अंतराळवीर : स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा हा लढाऊ विमानाचा वैमानिक, भारताचा पहिला अवकाशयात्री ठरला. ३ एप्रिल १९८४ रोजी एका भारत-सोवियत रशिया संयुक्त अवकाश मोहिमेतून राकेश शर्माने अंतराळात सफर केली. १२ मे १९८४ रोजी राष्ट्रपती भवनात एका भव्य समारंभात त्याला 'अशोकचक्र' हे शौर्यपदक बहाल करण्यात आले. वायुसेनेत महिला | वायुसेनेने जमिनीवरील अतांत्रिक कामे, तांत्रिक कामे व प्रत्यक्ष विमान उड्डाण या सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना प्रवेश देण्यास सुरुवात केली. अल्प कार्यकाळासाठी महिला अधिका-यांना वायुसेनेच्या सेवेत घेण्यात येऊ लागले. जमिनीवरील कामकाजासाठी पहिली महिला अधिकारी तुकडी २१ जून १९९३ रोजी सेवेत दाखल झाली. त्या पाठोपाठ तंत्रज्ञ महिला अधिका-यांची तुकडी समाविष्ट झाली. रसद पुरवठा दलातील वैमानिक महिलांच्या प्रशिक्षणाला ११ जुलै १९९३ रोजी सुरुवात झाली. काही काळाने हेलिकॉप्टर चालक म्हणून महिलांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. आता अशा महिला अधिका-यांची वायुसेनेत कायमस्वरुपी नियुक्ती (पर्मनंट कमिशन) करण्यात येत आहे. आपद्ग्रस्तांना मदत | पूर, चक्रीवादळे किंवा भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जनतेच्या साहाय्यार्थ धावून जाण्यात वायुसेना नेहमीच अग्रेसर असते. काही वर्षांपूर्वी इराणमध्ये भीषण भूकंप झाला. त्या वेळी वायुसेनेच्या पुरवठा विभागाने फार मोठे मदतकार्य केले. १९९१ साली इराकने कुवेतवर स्वारी केली. त्या वेळी तिथे अडकून पडलेल्या सुमारे पाच हजार भारतीय नागरिकांना आपल्या वायुसेनेने भारतात सुखरूप परत आणले. १९९४ च्या मे महिन्यात एका भीषण चक्रीवादळाने बांगलादेशाला झोडपून काढले. त्या वेळीही एमआय-८, एमआय-१७ व एएन-३२ या भारतीय हेलिकॉप्टर विमानांनी भरपूर मदतकार्य केले. १९९२ च्या सप्टेंबरमध्ये एएन-३२ या विमानाद्वारे अफगाणिस्तानच्या मझारे शरीफ या शहरालाही मदत पोहोचवण्यात आली. अशा प्रकारचे संकटकालीन साहाय्य २००५ मध्ये पाकिस्तानलाही करण्यात आले. २००१ ४०८ शिल्पकार चरित्रकोश