पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आली. 'एअरक्राफ्ट अॅण्ड सिस्टिम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट' म्हणजे विमाने व विमानोड्डाण यंत्रणा यांची सतत तपासणी करीत राहणारी यंत्रणा, अशा अनेक अत्याधुनिक यंत्रणा विकसित करण्यात आल्या. 'एअर डिफेन्स अॅण्ड ग्राउण्ड एन्व्हायरन्मेंट सिस्टिम' अशासारख्या यंत्रणांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. आधुनिकीकरण व विविध मोहिमा | १९७९ साली वायुसेनेचे आणखी आधुनिकीकरण करण्यात आले. जग्वार ही अत्याधुनिक विमाने वायुसेनेच्या ताफ्यात दाखल झाली. १९८२ साली भारतीय वायुसेनेच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली. त्या मुहूर्तावर मिग-२३ व मिग-२५ ही नवी विमाने वायुसेनेत दाखल झाली. आणखी काही काळाने डकोटा आणि पॅकेट ही जुनी विमाने निवृत्त करण्यात येऊन मिग-२७, आयएल-७६ आणि एएन-३२ या नव्या विमानांचा समावेश करण्यात आला. १९८५ साली मिराज २००० या प्रचंड क्षमतेच्या विमानाचे आगमन झाले. या अत्याधुनिक विमानात तंत्रज्ञान व आक्रमकता यांचा उत्कृष्ट समतोल आहे. त्याच वर्षी मिग- २९, एमआय- १७, एमआय- २६ आणि डॉर्निअर ही नवी विमानेही आली. नवीनतम अशा जमिनीवरील व आकाशातील इलेक्ट्रॉनिक यंत्रणांचा वापरही त्याच वर्षी सुरू झाला. त्याअगोदर वर्षभर म्हणजे २० जुलै १९८४ रोजी दक्षिण विभाग हा वायुसेनेचा नवा विभागही अस्तित्वात आला होता. १९८० च्या दशकात एका पाठोपाठ एक अनेक मोहिमा पार पाडण्यात आल्या. ३ एप्रिल १९८४ रोजी हिमालयात सियाचीन क्षेत्रात 'ऑपरेशन मेघदूत' या मोहिमेची सुरुवात झाली. २७ जून १९८७ रोजी पाच एएन- ३२ विमाने व चार मिराज-२००० विमानांनी मिळून श्रीलंकेत जाफना या ठिकाणी वेढ्यात अडकून पडलेल्या तमीळ लोकांना रसद पुरवठा करण्याचे काम हाती घेतले. श्रीलंका सरकारच्या विनंतीवरून वरील ‘ऑपरेशन पवन', तर मालदीव सरकारच्या विनंतीवरून ‘ऑपरेशन कॅक्टस' या मोहिमा राबविण्यात आल्या. 'ऑपरेशन पवन'मध्ये रसदपुरवठ्यासाठी एएन- ३२ आणि आयएल- ७६ ही विमाने व आक्रमणासाठी एमआय- २५, एमआय- १७ व एमआय- ८ ही हेलिकॉप्टर्स वापरण्यात आली. “ऑपरेशन पवन'मध्ये वायुदलाने विविध उद्दिष्टे ठरवली व ती यशस्वीपणे पार पाडली. दिवसाउजेडी आणि रात्रीसुद्धा आकाशातून शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, रसदपुरवठ्याप्रमाणेच बाँबफेकीसाठीसुद्धा शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्सचा वापर करणे; शस्त्रे व अन्य सामग्रीसह सैन्याला एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेणे-आणणे; नवीन सैनिकांना रणभूमीचा प्रत्यक्ष अनुभव देणे, अशी ही विविध उद्दिष्टे होती. । ‘ऑपरेशन कॅक्टस' ही एक फार मोठी आणि अतिशय वेगवान अशी हवाई मोहीम होती. आयएल-७६ या विमानातून भूसेनेचे छत्रीधारी दल (पॅराटुपर्स) पहिल्यांदाच उतरवण्यात आले. ग्रूप कॅप्टन बेवूर यांनी स्वत: त्या विमानाचे चालकत्व घेतले होते. ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष श्री. एम.ए. गयूम भारतीय वायुसेनेच्या या पराक्रमावर बेहद्द खूष झाले. भारतीय सैन्यदले माघारी निघाल्यावर ३ नोव्हेंबर १९८९ रोजी त्यांनी स्वतः वायुसेनेला एक स्मरणचिन्ह भेट दिले. । १९९२ साली ‘ऑपरेशन व्हायनो' ही मोहीम हाती घेण्यात आली. आसामात घुसलेले अतिरेकी व त्यांना मदत करणारे विदेशी लोक यांना हुसकावण्यासाठी ही मोहीम होती. एमआय-८ व एमआय-१७ या हेलिकॉप्टर्सनी या मोहिमेत भाग घेतला. शिल्पकार चरित्रकोश ४०७