पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिस-या दिवशी म्हणजे ३ सप्टेंबर १९६५ या दिवशी भारतीय वैमानिक स्क्वॉड्रन लीडर ट्रेव्हर किलर यांनी आपले 'किलर' हे आडनाव सार्थ केले. त्यांनी आकाशात समोरासमोरच्या लढाईत पाकिस्तानचे एक अवाढव्य सेबर जेट विमान नष्ट केले. भारताच्या नॅट या छोट्याशा लढाऊ विमानाने, अमेरिकेने पाकिस्तानला दिलेले भले प्रचड सेबर जेट विमान उद्ध्वस्त करावे हा एक चमत्कार होता. या एकंदर युद्धात भारतीय नॅट विमानानी अशी एकूण तेरा सेबरजेट विमाने पाडली. १९७१ ची पाकिस्तानविरुद्धची लढाई १९७१ साली पाकिस्तानने तिस-यांदा भारतावर आक्रमण करण्याचा आततायीपणा केला. त्यातून भारतीय वायुसेनेला पराक्रमाची सुवर्णसंधी मिळाली. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने भारताच्या अनेक विमानतळांवर एकाच वेळी योजनाबद्ध हल्ला चढवला. श्रीनगर, अवंतीपुर, हलवाड़ा, अंबाला, आग्रा, जामनगर, जोधपूर, शिरसा इत्यादी विमानतळांवर पाकने बाँबफेक केली. ही सगळी ठिकाणे पश्चिम आघाडीवरची होती. त्यामुळे सुरुवातीला भारतीय वायुसेनेने पश्चिम आघाडीवर बचावात्मक धोरण स्वीकारले आणि ४ डिसेंबर १९७१ च्या पहाटेपासून पूर्व आघाडीवरील पाकिस्तानी विमानतळांवर झंझावाती हवाई हल्ले चढवायला सुरुवात केली. तेजगाव आणि ढाका येथील विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. फक्त ४८ तासांमध्ये पूर्व विभागाच्या आकाशावर भारतीय वायुसेनेचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले. भारतीय सैन्याच्या हाती लागू नयेत म्हणून पाकिस्तानने स्वत:च आपली किमान आठ सेबर जेटूस निकामी किंवा नष्ट करून टाकली. यानंतर वायुसेनेने पश्चिम आघाडीवरही आक्रमणाला सुरुवात केली. ४ डिसेंबरलाच आपल्या हंटर विमानांनी पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराचीवर हल्ला चढवला. कराची बंदरातल्या तेलटाक्या आणि बादिन सिग्नल विभागावर बाँबफेक करण्यात आली. ८-९ डिसेंबरला विंग कमांडर बधवार यांनी कहरच केला. त्यांनी कराची बंदराच्या तेलटाक्यांवर इतका तुफानी हल्ला चढवला, की ती भडकलेली आग पुढे कित्येक दिवस जळतच होती. त्याचप्रमाणे सुई या ठिकाणचा वायुप्रकल्पही साफ नष्ट करण्यात आला. चंगा-मंगा येथील पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय, हाजी पीर हे अत्यंत महत्त्वाचे ठाणे, लष्कराला रसदपुरवठा करणारे माँटगोमेरी रेल्वे केंद्र ही ठिकाणेदेखील भारतीय हवाई हल्ल्यांनी साफ उद्ध्वस्त करून टाकली. | या सर्व कामगिरीवर यशाचा तुरा चढवला तो मात्र पूर्व आघाडीने. पाकिस्तानी सेना टेकीला आल्याच होत्या. भारतीय वैमानिकांनी ढाक्याच्या पाकिस्तानी गव्हर्नर हाउसवर बाँबफेक केल्यावर पाकने गुडघे टेकले. चौदा दिवसांच्या या युद्धात भारतीय वायुसेनेने पाकिस्तानची एकंदर ९४ विमाने नष्ट केली. ‘परमवीरचक्र' हे तीनही भारतीय सेनादलांमधले सर्वोच्च शौर्यपदक. या युद्धात भारतीय वायुसेनेने आपल्या पहिल्या परमवीरचक्राची नोंद केली. फ्लाइंग ऑफिसर निर्मलजितसिंग सेखों यांना ‘परमवीरचक्र' हे सर्वोच्च शौर्यपदक मरणोत्तर प्रदान करण्यात आले. सामथ्र्थ्यांची वाढ | १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये भारत-चीन व भारत-पाक संघर्षांमध्ये भारतीय वायुसेनेचा कस लागला. त्यात तावून-सुलाखून उतरत असतानाच वायुसेनेने त्या अनुभवांच्या आधारावर पुढील धोरण ठरवले. अधिक सुसंघटितपणा आणि विस्तार यांसाठी ही योग्य वेळ होती. नवी विमाने, नवी शस्त्रास्त्रे वायुसेनेच्या भांडारात भरती करण्यात आली. आंध्रप्रदेशातील दिंडीगल या ठिकाणी वायुसेना अकादमीची स्थापना करण्यात ४०६ शिल्पकार चरित्रकोश