पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लवकरच भारतीय वायुसेनेत व्हॅम्पायर' या नव्या जेट विमानांचा समावेश करण्यात आला. विमान दुरुस्ती विभाग नव्याने उघडण्यात आला. वैमानिकांसाठी अत्याधुनिक प्रशिक्षण सुरू करण्यात आले. वायुसन' प्रशिक्षण महाविद्यालय जलहळ्ळी इथे सुरू करण्यात आले. आज जी अद्यावत अशी वायुसेना आपल्या दृष्टीस पडते, ती हळूहळू आकार घेऊ लागली. ध्वज प्रदान १९५० पासून पुढे दशकभराच्या काळात वायसेनेची ही प्रगती सुरूच राहिली. १ एप्रिल १९५४ या दिवशी एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी यांनी वायुसेना प्रमुखाचा पदभार स्वीकारला. भारतीय वायुसेनेचे ते पहिले भारतीय प्रमुख होत. त्याच दिवशी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी वायुसेनेला ध्वज प्रदान केले. प्रशिक्षण विभाग, पूर्व विभाग, देखभाल विभाग आणि मध्यवर्ती विभाग असे वायूसेनेचे चार विभाग (कमांड) करण्यात आले. मिस्टेअर, कॅनबेरा, नॅट आणि हंटर अशी चार प्रकारची अगदी नवी विमाने वायुसेनेत दाखल करण्यात आली. १९६२ ची भारत-चीन लढाई या युद्धात वायुसेनेवर भारतीय सैन्य आणि युद्धसाहित्य दोन्हींच्या वाहतुकीची जबाबदारी सोपवण्यात आली. ती पार पाडण्यासाठी वायुसेनेने अगणित विमानफेच्या केल्या. दुर्दैव असे की, वायुसेनेचा उपयोग शत्रूवर बाँबफेक करण्यासाठी केला गेलाच नाही. चिनी वायुसेनेच्या सामर्थ्याबाबत हेरखात्याने चुकीची माहिती दिल्यामुळेच वरील निर्णय घेण्यात आला होता असे आता निष्पन्न झाले आहे. वायुसेनेची शक्ती ही मुळातच आक्रमक असते. आगेकूच करणाच्या चिनी सैन्याला रोखण्यासाठी वायुसेनेने बाँबफेक करून कडे कोसळवले असते, तरी पुरेसे होते. चिनी सैन्याच्या वाटा रोखल्या गेल्या असत्या आणि आपला एवढा मोठा भूभाग चीनच्या घशात जाण्यापासून वाचला असता. वायुसेनेच्या शक्तीने भारताचा इतिहास आणि भूगोल पुन्हा एकदा आपल्याला अनुकूल असा बदलला गेला असता. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. १९६५ चे भारत-पाक युद्ध १ सप्टेंबर १९६५ या दिवशी पाकिस्तानने छांब-जौरिया भागात भारतीय प्रदेशावर जोरदार आक्रमण केले. पाकिस्तानकडे भारी तोफखाना आणि चिलखती दल होते. पाकिस्तानच्या या मोहिमेचे लष्करी सांकेतिक नाव होते ‘ऑपरेशन अँड स्लॅम. भारत आणि पाकिस्तान यांच्या सरहद्दी दरम्यान जम्मू-काश्मीरकडे जाणारा एक अगदी चिंचोळा रस्ता आहे. त्याला ‘चिकन नेक' असे म्हटले जाते. हा रस्ता जिंकून भारताचा जम्मू- काश्मीरशी संबंधच तोडून टाकायचा, असा पाकिस्तानचा डाव होता नि त्यात तो जवळजवळ यशस्वी झालाही होता. त्या दिवशी संध्याकाळी ठीक ४ वाजता भारतीय भूसेनेकडून भारतीय वायुसेनेला तातडीने मदतीला येण्याचा संदेश गेला आणि बरोबर १ तास १९ मिनिटांनी म्हणजे ५ वाजून १९ मिनिटांनी वायुसेनेने पाकिस्तानी लष्करावर पहिला हल्ला चढवला. पुढच्या दीड तासात २६ हवाई हल्ले करण्यात आले आणि त्या दिवसाअखेर भारतीय वायुसेनेच्या खात्यावर १४ रणगाडे, २ तोफा आणि ६७ चिलखती गाड्या उद्ध्वस्त केल्याच्या पराक्रमाची नोंद झाली. शिल्पकार चरित्रकोश ४०५