पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय वायुदलाच्या पहिल्या स्क्वॉड्रनचे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली. मग भारतीय संरक्षण दलांच्या पुनर्रचनेत वायुदलाला स्वतंत्र सैन्यदलाचा दर्जा देण्यात आला. काश्मीरमधील १९४७ ची मोहिम देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच रॉयल इंडियन एअर फोर्सचेही विभाजन झाले. भारताच्या वाटणीला लढाऊ विमानांच्या सहा स्कॉड्रन व मालवाहतूक विमानांची एक स्कॉड्रन, तर पाकिस्तानच्या वाटणीला लढाऊ विमानांच्या दोन स्कॉड्रन व मालवाहू विमानांची एक स्कॉडुन गेली. २६ ऑक्टोबर १९४७ या दिवशी काश्मीरचे महाराज हरिसिंह यांनी भारत सरकारशी सामीलनाम्याचा करार केला. त्याबरोबर जम्मू-काश्मीर हा अधिकृतपणे भारताचा भाग बनला. परंतु त्यापूर्वीच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर हल्ला चढवला होता. चार ते पाच हजार टोळीवाले काश्मीर खोप्यामध्ये घुसले होते. त्यांच्या पाठोपाठ पाकिस्तानी सैन्याने नागरी वेशात काश्मीरवर आक्रमण केले. २७ ऑक्टोबर १९४७ या दिवशी भारतीय वायुदलाच्या विमानांनी लेफ्टनंट कर्नल राय यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय सैन्याची पहिली रेजिमेंट काश्मीर खो-यात उतरवली. अशा ऐन आणीबाणीच्या क्षणी भारतीय सैन्य काश्मीरमध्ये उतरू शकले म्हणूनच केवळ काश्मीर वाचवले गेले. लॉर्ड लुई माउण्टबॅटन यांनी या घटनेचे वर्णन, 'आग्नेय आशियातील माझ्या सेनापतित्वाच्या काळातील सर्वांत वेगवान आणि निर्णायक हवाई हालचाल' अशा शब्दांत केले. या पाठोपाठ लेहमध्येही भारतीय सेना उतरवण्यात आली. त्यामुळे लडाख आणि कारगिल वाचले. मग विमानांनी फे-यांमागून फे-या करून तेथे सैन्य आणि सामग्री उतरवण्यात आली. श्रीनगर, पूंछ आणि लेह यांच्या रक्षणाबरोबरच कोटली, झांगर, नौशेरा आणि टिथवाल इथल्या लढायांमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन वायुदलाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. भारतीय सैन्य हवाई मार्गाने श्रीनगरमध्ये उतरवण्यात जर विलंब झाला असता, तर पुढील सर्व इतिहास बदलून गेला असता. या कारवायांमध्ये श्रीनगरच्या विमानतळाचे प्रमुख म्हणून तत्कालीन ग्रूप कॅप्टन हृषिकेश मुळगावकर यांनी फार मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी हवाई हल्ल्यांचे नेतृत्वही केले. पुढे ते एअर चीफ मार्शल झाले. जागतिक उच्चांक | काश्मीर मोहिमेत एअर कमांडर मेहर सिंग यांनी वायुदल क्षेत्रातील काही जागतिक उच्चांक प्रस्थापित केले. डकोटा हे विमान मालपुरवठा, मालवाहतूक यांसाठी वापरले जाणारे; त्याचा चक्क लढाऊ बाँबफेकी विमानाप्रमाणे उपयोग करून मेहर सिंगांनी पाकिस्तानी सैन्यावर बाँबफेक केली. त्याचप्रमाणे लडाखची राजधानी लेह या ठिकाणी, समुद्रसपाटीपासून ११ हजार ५४० फूट उंचीवर त्यांनी डकोटा विमान उतरवले आणि तेदेखील त्या भागाचे नकाशे उपलब्ध नसताना! प्रारंभीचा काळ देशाच्या फाळणीपाठोपाठ लगेचच झालेल्या या काश्मीर युद्धाने भारतीय वायुसेनेला आत्मविश्वास दिला, गगनभरारीसाठी लागणारे बळ दिले. भविष्यात एक शक्ती बनण्यासाठी जो भक्कम पाया लागतो, तो या १९५० च्या दशकाने घातला. भारतीय वायुसेनेचे भक्कम संघटन उभे राहिले. त्यात मोहिमा, प्रशिक्षण, प्रशासन आणि विमानांची, उपकरणांची तत्पर देखभाल या सर्वच घटकांचा समावेश करण्यात आला. शिल्पकार चरित्रकोश ४०४