पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राष्ट्रपती, सर्व सेनादलांचे सर्वोच्च प्रमुख या नात्याने करतात. त्याला प्रेसिडेन्शिअल रिव्ह्यू' असे संबोधले जाते. हा एक नयनमनोहारी, डोळ्यांचे पारणे फेडणारा असा नाविकोत्सवच असतो. | भारतीय नौसेनेकडे आजमितीस १३७ युद्धनौका असून २०० नाविक लढाऊ विमाने आहेत. नाविक दलात ७०२० नौसेना अधिकारी व ३९,८२० नौसैनिक सध्या कार्यरत आहेत. पाकिस्तानी नौसेनेच्या जंगी बेड्यात ३६ युद्धनौका व ५ पाणबुड्या असून २४ हजार कर्मचारी तैनात आहेत. पाकिस्तानी नाविक आकाश बळ ३६ लढाऊ विमाने इतके आहे. लॉकहीड, अलौटे ३, टाकन झेड- ९, शेअरोस्पाटाइल एसए-३१९ बी ही अण्वस्त्रधारी जपानी, अमेरिकन, फ्रेंच बनावटींची लढाऊ विमाने सध्या पाकिस्तान आपल्या काफिल्यात जमा करत आहे. पाकिस्तानचे नाविक मुख्यालय इस्लामाबादमध्ये असून पश्चिमी नौसेना कमांड, उत्तरी नौसेना कमांड व दक्षिणी नौसेना कमांड हे तीन मुख्य तटीय विभाग आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मी-नेव्ही ही चीनची नौसेना अमेरिकन नाविक ताकदीची बरोबरी करण्यात गुंतली असून चीनच्या नाविक तांड्यात २६० युद्धनौका व ६० पाणबुड्या आहेत. अमेरिकन नौसेनेकडे २८६ युद्धनौका व अंदाजे ७५/९० अणुपाणबुड्या आहेत. दक्षिणपूर्व आशिया खंडात चीन आपले नाविक प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या उद्योगात गुंतला असून सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, पाकिस्तान इत्यादी राष्ट्रवाशी संधान बांधून भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाच्या विघटनामुळे व अमेरिकेच्या पाकिस्तानधार्जिण्या हेतूमुळे चीन १९६२ ची पुनरावृत्ती करू शकतो. १०५ कोटी हजार अमेरिकन डॉलर्स इतका खर्च चीन आपल्या सेनादलावर करत आहे. पाकिस्तानी लष्करी अंदाजपत्रक हे भारताच्या दीडपट असून अमेरिका २०१०-२०११ ह्या आर्थिक वर्षात ५०० कोटी हजार डॉलर्स इतकी रक्कम सेनादलावर खर्च करत आहे. एकंदरीतच चीन आणि पाकिस्तान ह्यांचे दृढ होत चाललेले सैनिकी संबंध आणि अमेरिका, पाकिस्तानसारख्या आक्रमक राष्ट्राला करत असलेली सैनिकी व आर्थिक मदत हे आपल्या दृष्टीने असलेले चिंतेचे विषय. ह्या सर्व बाबींचा गंभीर विचार करून हिंदुस्थानी सरकारने नौसेनेचा विस्तार करणे अगत्याचे आहे, नव्हे त्यास अग्रक्रम देणे गरजेचे आहे असे वाटते. भारतीय नौसेनेला बराच मोठा पल्ला गाठण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, हे मात्र खरे. | भारत हे एक सागरी राष्ट्र आहे. शांततेच्या व युद्धाच्या काळात समुद्री व्यापार आणि सागरी दळणवळणाच्या मार्गाचे व सागरी हद्दींचे संरक्षण करणे ही गांभीर्याने लक्ष देण्याची बाब आहे. जमिनीवर सुरक्षित राहण्यासाठी आपण आधी समुद्रावर अधिराज्य गाजवायला हवे,' अशी एक म्हण आहे. आजच्या काळानुसार ती अधिकच लागू पडते. वायुसेना हवेपेक्षा जड असे मानवसहित विमान, ही संकल्पना भारतीयांना प्राचीन काळापासून माहीत आहे. रामायण आणि महाभारतात विमानोड्डाणाचे उल्लेख आहेत. किमान सहा हजार वर्षांपूर्वी महर्षी भारद्वाज यांनी लिहिलेल्या ‘वैमानिक शास्त्र' या ग्रंथात चार प्रकारची विमाने वर्णिली आहेत. ती कशी बांधावीत आणि त्यांच्या वैमानिकांना कसे प्रशिक्षण द्यावे, याचाही उल्लेख त्यात आहे. मुंबईचे एक रहिवासी शिवकर बापूजी तळपदे यांनी सन १८९५ साली असे एक विमान तयार करून ते उडविण्याचे प्रात्यक्षिकही मुंबईच्या चौपाटीवर करून दाखविले होते. मात्र, या संदर्भात अधिक विश्वसनीय माहिती मिळत नाही. ४०२ शिल्पकार चरित्रकोश