पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ही विमानवाहू नौका खरेदी केली आहे. त्याचबरोबर मिग २९ के लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सही घेतली आहेत. नौसेनेने जर्मनीकडून उच्च दर्जाची आधुनिक यंत्रणा असलेली पाणबुडी जर्मनीतील एचडीडब्ल्यू शिपयार्ड मधून १९८६ मध्ये घेतली आहे. तसेच रशियन बनावटीच्या किलो क्लास हंटर किलर पाणबुड्याही भारतीय नौसेनेने प्राप्त केलेल्या आहेत, फ्रेंच बांधणीच्या स्कॉरपिन क्लास पाणबुड्या तयार करण्याचे काम मुबा माझगांव गोदीत सध्या सुरु आहे. स्टील्थ फ्रिगेटस् आणि कॉरव्हेटस् यामधील नव्या शिवालिक जातीच्या क्षेपणास्त्र वाहू विनाशिकेने नौसेनेला समुद्रात खोलवर जाण्याची (ब्ल्यू वॉटर) क्षमता प्राप्त करून दिली आहे. या उद्दीष्टांसोबत नौसेनेला आपल्या आपल्या किनारपट्टीला लागून समुद्रावर टेहळणी करायची असते. किनारपट्टीला लागून समुद्रावर आणि खोल समुद्रातह दहशतवादविरोधी कारवायांसाठी त्यांना जागता पहारा ठेवावा लागतो. तटरक्षक दलाच्या सहकार्यान गस्तीचे काम सुरू असताना शांततेच्या वेळी आणि लढाईच्या वेळी समुद्री चाच्यांना पकडण्याचे कामही बरेचदा नौसेनेला करावे लागते. । पश्चिम किनाच्यावरील कारवार येथे आय.एन.एस. कदंबा नौकेवर नौसेनेचा अत्याधुनिक नावल बेस आहे. नौसेनेने सध्या लांब पल्ल्याची पाणबुडी वेधी विमाने पी ३ सी ओरायन अमेरिकेकडून घेतली आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त लढाऊ विमाने व हेलिकॉप्टर्स उतरवता येतील अशा क्षमतेची जहाजंही अमेरिकेकडून घेतली आहेत. या जहाजाचे नाव आहे जलाश्व. भारतीय नौसेनेत खालीलप्रमाणे विभाग (खाती) असून कंसात त्यांच्या प्रशिक्षण केंद्रांची नावे आहेत. (१) कार्यकारी विभाग : आय.एन.एस. द्रोणाचार्य, (वेन्दुरथी, कोचीन), (२) वीजतंत्री विभाग : आय.एन.एस. वलसुरा (जामनगर), (३) अभियंता विभाग : आय.एन.एस. शिवाजी (लोणावळा), (४) साधनसामग्री विभाग

आय.एन.एस. हमला (मुंबई), (५) कायदा विभाग : आय.एन.एस. कंजाली (मुंबई), (६) वैद्यकीय विभाग
आय.एन.एच.एस. अश्विनी (मुंबई), (७) प्रारंभिक प्रशिक्षण केंद्र : आय.एन.एस. चिलला (ओरिसा), (८)

व्यवस्थापन व नेतृत्व विभाग : आय.एन.एस. आगक्णी (कोइमतूर), (९) नौकानयन विभाग : आय.एन.एस. गोमंतक, (गोवा) (१०) नाविक वायुदल : आय.एन.एस. गरुडा (कोचीन), (११) अण्वस्त्र प्रशिक्षण : आय.एन.एस. अग्निबाहू (मुंबई), (१२) जहाज बांधणी : शिपराइट स्कूल (विशाखापट्टणम). (१३) पाणबुडी विभाग - वीरबाहू (विशाखापट्टणम्), वज्रबाहू (मुंबई) भारतीय नौसेनेचे मुख्यालय नवी दिल्लीत असून नौसेनाध्यक्ष (चीफ ऑफ नेव्हल स्टाफ) अॅडमिरल, हे नौदलाचे प्रमुख म्हणून काम करतात. त्यांच्या साहाय्याला धोरणात्मक व भविष्यकालीन योजनांसाठी व्हाइस अॅडमिरलच्या हुद्याचा नौसेना अधिकारी वरिष्ठ साहाय्यक या नात्याने असतो. रिअर अॅडमिरल/व्हाइस अॅडमिरल या हुद्याचे दुय्यम वरिष्ठ अधिकारी युद्धाभ्यास/मोहिमा यांची आखणी करून मोन्केस, अॅम्फेससारखी सराव शिबिरे आयोजित करतात. मानवसंसाधन व युद्धसामुग्री विभागही रिअर/व्हाईस अॅडमिरल हुक्ष्याचे अधिकारी सांभाळतात. हे सर्व अधिकारी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यकालीन योजना आखत असतात. याचबरोबर विविध देशांच्या नौदलांसोबत आपल्या नौसेनेच्या संयुक्त कवायती होत असतात. अमेरिका, फ्रान्स, रशिया, जर्मनी, बिक्टन, इटली, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, इराण, सौदी अरेबिया, श्रीलंका, स्पेन, न्यूझीलंड, कुवेत, केनिया इत्यादी २५ पेक्षा अधिक राष्ट्रांच्या नौसेनेबरोबर युद्धसराव, सांघिक अभ्यास गेल्या पाच वर्षांत पूर्ण केला आहे. भारतीय नौसेनेचे युद्धाभ्यास निरीक्षण चार वर्षांतून एकदा स्वत: शिल्पकार चरित्रकोश ४०१