पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पाणबुड्या, आय.एन.एस. विजयदुर्ग, सिंधुदर्ग, होशर्ग इत्यादी मिसाइल गाइडेड कॉरव्हेटस् जहाजे भारतीय नौसेनेत रुजू झाली. पाणबुडीच्या प्रशिक्षणाची गरज लक्षात घेऊन १९६९ च्या प्रारंभी विशाखापट्टणम मुक्कामी आय.एन.एस. वीरबाह व आय.एन.एस. सातवाहन ह्या दोन प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात येऊन भारताने सागरी जलपृष्ठाखालील युद्धाच्या (अंडरवॉटर वॉरफेअर) यगात यशस्वी पदार्पण केले. १९७० मध्ये अतिशय लहान परंतु मर्मभेदी व महाशक्ती शाली मिसाइल बोट्स आय.एन.एस. प्रचंड, प्रताप, निर्भीक, नाशक इत्यादी भारताच्या नौसेनेत दाखल झाल्या. ह्या मिसाइल स्क्वॉड्रन्सनी १९७१ च्या भारत-पाक युद्धात शत्रूवर एवढी जरब बसवली, की अमेरिकनांनी ह्या स्क्वॉड्रनला 'किलर स्क्वॉड्रन' ह्या नावाचा लष्करी बहुमान दिला. भारतीय नौसेनेच्या विमानवाहू नौका विक्रांत व विराटसाठी सीहॉक, सी-हॅरिअर, आलीझे व जग्वार इत्यादी विमानेही भारतीय आरमाराला मिळाली आणि नौसेनेचे विमानदल हे प्रभावी व गरुड भरारी घेण्यास सज्ज झाले. | या सर्व प्रगतीमुळे व नौसेनेच्या विकासाकडे लक्ष दिल्याने १९७१ च्या भारत-पाकमधील बांगलादेश मुक्ति संग्रामात भारतीय आरमाराने पाकिस्तानी आरमाराचे कंबरडे मोडून भीमपराक्रम केला. युद्धाच्या पहिल्या चार दिवसांतच प्रभावशाली, प्रत्ययकारी कामगिरी बजावून पाकिस्तानची पी. एन. एस. शहाजहान, जहागीर, आलमगीर, बाफर, नूरजहांन इत्यादी जहाजे बुडवली. अनेक जहाजे जायबंदी केली, महत्त्वाचे म्हणजे पूर्व किना-यावरील पाकिस्तानी पाणबुडी पी.एन.एस. गाजीला जलसमाधी देऊन अमेरिकेच्या ह्या पाणबुडीचा धुव्वा उडवला. पाकिस्तानच्या मदतीला अमेरिकेने एंटरप्राइझ ह्या वैमानिक जहाजाच्या नेतृत्वाखालील आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागात उतरवलेले असताना न डगमगता भारतीय आरमाराने जी विजिगीषु व लढाऊ वृत्ती दाखवली, ती पाहुन अमेरिका स्तिमित झाली. 'हजारों साल लड़ेंगे।' ही जनाब भुट्टो ह्यांची दर्पोक्ती भारतीय सेनेने केवळ दहा दिवसांत मोडीत काढत पाकिस्तानला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. १९७१ चे भारत- पाक हे एक सर्वंकष युद्ध होते. स्वातंत्र्योत्तर काळात नौसेना व वायुसेना ह्यांना ह्या युद्धातच प्रथम लढण्याची व आपली प्रतिकारशक्ति जगाला दाखविण्याची संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन भारतीय नौसेनेने जगाला आपली ताकद दाखवून दिली. दुर्दैवाने ह्या युद्धात आय.एन.एस. खुकरी ह्या भारतीय नौसेनेच्या फ्रिगेट जहाजाला जलसमाधी मिळून १३० पेक्षा जास्त नौसेना अधिका-यांनी सर्वोच्च बलिदानाचा, प्राणार्पण करण्याच्या नौसेनेच्या परंपरेचा आदर्श जगासमोर ठेवून एक इतिहास घडविला. ह्यानंतरच्या १९९८ च्या कारगिल युद्धात सागरी किना-याची देखभाल करण्याइतकीच मर्यादित कामगिरी भारतीय नौसेनेला पार पाडावी लागली. | परदेशाकडून युद्धनौका विकत घेत असतानाच १९७० ते १९८० ह्या दशकात भारतीय आरमाराने स्वावलंबी व्हावे म्हणून लिएंडर क्लास फ्रिगेटची निर्मिती मुंबई गोदीत सुरू केली. ह्या युद्धनौका पूर्णत: देशी बनावटीच्या आहेत. या बोटींवर सरफेस टू सरफेस मिसाइल्स व विमानवेधी तोफा, अत्याधुनिक रडार यंत्रणा व सोनार गेम यंत्रणा बसवण्यात आली आहे. ह्या बोटीवर हेलिकॉप्टरसुद्धा तैनात असते. ह्या जहाजांना गिरी स्क्वॉइन हे नाव असुन ह्या युद्धनौकांची नावे आहेत, आय.एन.एस. नीलगिरी, हिमगिरी, उदयगिरी, द्रोणागिरी इत्यादी. | १९८५-२०१० या काळातील नौसेनेची प्रगती आता तर भारताने स्वतःची पहिली अणुपाणबुडी तयार केली आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि सोनार यंत्रणा या पाणबुडीत बसवण्यात आली आहे. आता ही अणु पाणबुडी सामरिक डावपेचांची युद्धप्रणाली अवलंबत शत्रूला प्रतिबंध करत आहे. २०१०-११ मध्ये भारतीय नौसेनेने रशियन बनावटीची आय.एन.एस. विक्रमादित्य ४०० शिल्पकार चरित्रकोश