पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय आरमाराच्या नावातून ‘रॉयल' हा शब्द वगळून ‘भारतीय नौसेना' (इंडियन नेव्ही) या नावे भारतीय नौदल ओळखले जाऊ लागले व युद्धनौकांवर तिरंगा फडकू लागला. भारत सरकारच्या विनंतीवरून अॅडमिरल सर एडवर्ड पॅरी ह्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातील पहिले सेनापतिपद सांभाळले. २२ एप्रिल १९५८ ह्या दिवशी व्हाइस अॅडमिरल स्टिफन टोप कार्लाइल ह्यांच्याकडून व्हाईस अॅडमिरल रामदास कटारी ह्या भारतीय नौसेना अधिका-याने सेनापतिपदाची सूत्रे हाती घेतली व ख-या अर्थाने भारतीय आरमाराची धुरा भारतीयांकडे आली. त्यानंतरचे नौसेना प्रमुख होते, अॅडमिरल भास्कर सोमण, नौसेनेचे मुख्यालय राजधानी दिल्ली येथे स्थापण्यात येऊन पश्चिमी नौसेना बेडा, मुख्यालय मुंबई व पूर्वी नौसेना बेडा, मुख्यालय विशाखापट्टणम अशा दोन स्वतंत्र कमांड सुरू झाल्या. | १९८५ साली अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे तीनही सशस्त्र सेनादलांची एकत्रित कमांड (इंटिग्रेटेड कंबाइंड कमांड) सुरू करण्यात आली आहे. ह्या कमांडच्या आधिपत्याखाली बंगालच्या उपसागरातील परिसर व त्यालगतच्या समुद्रातील कमोर्टा, कदमत, कच्छल, कवरत्ती, रोझ, अॅन्द्रोथ इत्यादी १०० पेक्षा जास्त बेटे आहेत. ह्या भारतीय सागराच्या परिसरातील सर्व शेजारी राष्ट्रांच्या हालचालींवर देखरेख ठेवणे ही जबाबदारी ह्या कमांडवर आहे. पोर्टब्लेअरपासून बांगला देश ४०० मैलांवर, म्यानमार ४० मैलांवर, मलेशिया/थायलंड ५०० मैलांवर व इंडोनशिया १५० मैलांवर असून भारताचा किनारा पोर्टब्लेअरपासून १६५० मैल इतक्या दूर अंतरावर आहे. या द्वीपसमूहाचे विशिष्ट असे सागरामधील सामरी डावपेचात्मक स्थान (स्टॅटेजिक पोझिशन) महत्त्वाचे असून युद्धजन्य परिस्थितीमध्ये निर्णायक ठरू शकते. चीनसारख्या विस्तारवादी राष्ट्रांचा डोळा ह्या द्वीपसमूहावर आहे. म्हणून भूसेना-नौसेना-वायुसेना ह्या तिन्ही भारतीय सशस्त्र सेनादलांची ही सामाईक कमांड असून तिची धुरा व्हाइस अॅडमिरल हुद्याच्या नौसेना अधिका-यावर सोपवण्यात आली आहे. बेटांचे संरक्षण ही महत्त्वपूर्ण जबाबदारी ह्या कमांडवर आहे. | १६४ लहान-मोठी बंदरे असणा-या सागरकिना-याचे संरक्षण व निगराणी करीत, व्यापारी जहाजांना व मच्छीमारांना अडचणीत मदत करत, त्यांचे व्यवहार व्यवस्थित अडथळ्याशिवाय सुरळीतपणे चालू राहण्यास साहाय्यभूत होणे, भारताच्या सागरी संपत्तीचे संरक्षण व देखभाल करणे, सागरी संपत्तीच्या विकासास व संशोधनास मदत करणे, राष्ट्रीय आपत्तीच्या काळात उदा. महापूर, भूकंप, त्सुनामी इ. प्रसंगी मुलकी अधिका-यांना सरकारच्या आदेशाप्रमाणे मदत करणे, सरकारच्या राष्ट्रीय ध्येय, धोरणांचा पाठपुरावा करणे, मित्रराष्ट्रांसोबत संबंध दृढ करणे, परदेशातील भारतीयांना भावनिक आधार देत जगामध्ये भारतीय शक्तीचे मिळेल ती संधी साधून प्रत्ययकारी प्रदर्शन घडवणे, भारताच्या आर्थिक महसुलात भर घालत राहणे इत्यादी महत्त्वाची कर्तव्ये भारतीय नौसेनेला पार पाडावी लागत आहेत. ९५ टक्के जागतिक व्यापारी मालाची ने-आण ही सागरी मार्गानेच होत असून भारताच्या महसुलात ह्या आर्थिक उलाढालींचा वाटा ७५ टक्के आहे. । | ही आर्थिक उलाढाल नौसेनेच्या संरक्षणाच्या आधारानेच अबाधितपणे चालू आहे. सागरी तेलावर प्रक्रिया करणारे समुद्रातील ३० तराफे (प्लॅटफॉर्स) व सागरातील भारतीय किना-यालगत असणा-या १२५ पेक्षा जास्त तेलाच्या विहीरींचे संवर्धन व संरक्षण ही जबाबदारी भारतीय नौसेनेचीच आहे. | १९७२ ते १९८० ह्या काळात आय.एन.एस. (इंडियन नेव्हल शिप) दर्शक, सतलज, जमुना, इन्व्हेस्टिगेटर, निर्देशक इत्यादी भारतीय नौसेनेच्या सर्वेक्षक नौकांनी (सव्हें शिप्स) सागरी साम्राज्याच्या उभारणीत, सागरी तेल उत्खननाच्या कार्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. ३९८ शिल्पकार चरित्रकोश