पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याचे सैन्य मेसोपोटेमियात परतले, ती सागवान लाकडापासून बनवलेली अत्युच्च दर्जाची (सी वदी) दणकट जहाजे सिंध प्रांतात (आता पाकिस्तानात) बनवलेली होती. दक्षिणेतील विजयनगर व पूर्वेकडील कलिंग सम्राटांनी ३सवी सनाच्या पाचव्या व दहाव्या शतकात समुद्रमार्गे मलाया, जावा, सुमात्रा, बाली ह्या परराष्ट्राशी व्यापारी संबंधांद्वारे आपले साम्राज्य उभे केले. सन ८५०-८६० काळात पाश्चिमात्य व पौर्वात्य देशांतून भारतात आयात होणा-या सोन्याचे रोजचे महसुली उत्पन्न १५० ते २५० मण होते. भारतीय समुद्रातील चाचेगिरीला वेसण घालण्यासाठी चौल वंशीय राजांनी आपले आरमार उभे करून बर्मा (म्यानमार), मलाया, जावा-सुमात्रा ह्या देशांवर सन ९९० ते १०५० च्या दरम्यान हल्ले करून त्या देशांना आपले मांडलिकत्व स्वीकारण्यास भाग पाडले होते. बाराव्या व तेराव्या शतकांत शंभर वल्ह्यांची मजबूत, अद्यायावत, लक्ष्यभेदी व ६० ते १०० नौसैनिक वाहून नेण्याची क्षमता असणारी जहाजे भारतात बनत. जहाजबांधणीचा उद्योग पाश्चिमात्य राष्ट्रांपेक्षा हिंदुस्थानात अधिक प्रगत होता असा निर्वाळा मार्कोपोलो ह्या विदेशी पर्यटकाने देऊन ठेवला आहे. परंतु इसवीसन १३०० नंतर पोर्तुगिजांनी समुद्रमार्गाने हिंदुस्थानाच्या दक्षिण भागावर आक्रमण करून भारताच्या विस्कळीत-खंडित आरमारावर विजय मिळवून भारतीय व्यापारी नौकांवर ‘परवाना कर (ट्रेडिंग लायसन्स टॅक्स) लादला. १५३४ सालापर्यंत कोचीन ते मुंबईपर्यंत आपले वर्चस्व निर्माण करत पार्तुगीज आरमाराने भारतीय किनाच्यावर आपला झेंडा रोवला. त्याच सुमारास ब्रिटिश आरमाराचे आव्हान पोर्तुगिजांना पेलता आले नाही. त्यामुळे १६६२ साली पोर्तुगिजांनी आपली राजकन्या इन्फंटा कॅथेरीन हिचा विवाह ब्रिटिश राजपुत्र दुसरा चार्लस ह्याच्याशी लावून दिला व एक तह करून मुंबई हे बेट ब्रिटिशांना आंदण' म्हणून दिले. पोर्तुगिजांच्या आक्रमणाचा बीमोड करण्याचा प्रयत्न केरळातील झामोरीन व कुंजाली राजवंशानी केला. १५०३ साली झामोरीन व पोर्तुगिज यांच्यात कोचीनच्या किना-यालगत व १५०९ साली कुजाली व पोर्तुगिज यांच्यात दिवू बंदराच्या जवळ दोन घनघोर सागरी युद्धे होऊन पोर्तुगिजांनी ह्या केरळी सत्ता नेस्तनाबूत केल्या. ह्या राजांचे आपसात असलेले हाडवैर पोर्तुगिजांच्या पथ्यावर पडले. ह्या सागरी युद्धानंतर केरळ ते महाराष्ट्रापर्यंत पोर्तुगीज अंमल सुरू झाला. हा अंमल १३०० व्या शतकापासून १७०० व्या शतकापर्यंत होता. व्यापारासाठी हातात तागडी घेऊन आलेले हे फिरंगी सागरी व लष्करी सामर्थ्यावर साम्राज्याचे धनी झाले. विविध जाती, भाषा, प्रात यांतील भेदभाव आणि राज्यकर्त्यांचे आपसातील हेवेदावे या सर्वांचा उपयोग करून घेत ‘फोड़ा आणि राज्य करा' या धोरणाने भारताला ब्रिटिशांनी दीडशे वर्षे गुलामीत ठेवले. मात्र १७०० व्या शतकात मराठ्यांच्या आरमाराने ब्रिटिश व पोर्तुगीज आरमाराचा प्रतिकार करून त्यांच्यावर जरब बसवली. शिवकालीन व पेशवेकालीन आंग्यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरमाराने, जंजि-यातील सिद्दी बंधूचा अपवाद वगळता, ब्रिटिश, डच, फ्रेंच व पोर्तुगीज आरमाराला कोकण किनारपट्टीतून हद्दपार करून टाकले होते. | हिंदुस्थानी इतिहासात जे प्रमुख राज्यकर्ते झाले, त्यांत सागरीबळाचे अनन्यसाधारण महत्त्व फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले व मराठा आरमाराच्या बांधणीला १६४९ साली सुरुवात केली. तेव्हा मराठ्यांच्या जंगी बेड्यात (वॉरशिप्स) केवळ २८ नौका होत्या. १६७४ साली हीच संख्या ७४ युद्धनौका इतकी झाली होती. मराठ्यांच्या ह्या आरमारात वेगवेगळ्या प्रकाराची जहाजे होती. नाव किंवा मचवा ही लहान जहाजे मालाची ने-आण करून रसद पुरवठा कायम ठेवून शिबंदीचा (लॉजिस्टिक सपोर्ट) व्यवहार पाहत असत. गलबत ही तीन-तीन शिडांची मध्यम पल्ल्याची जहाजे होती. या जहाजांवर एका दर्यासारंगाच्या हाताखाली २० ते २५ शिल्पकार चरित्रकोश ३९५