पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनोच्या) नेतृत्वाखाली अनेक देशांत शांतता निर्माणाच्या = आपला सहयोग दिला आहे. युनोच्या सेक्रेटरी जनरल यांनी या कामासाठी भारतीय सैन्य व अधिकारी यां प्रशंसा केली आहे. | जेव्हा-जेव्हा भारतावर भीषण नैसर्गिक आपत्ती आल्या तेव्हा-तेंव्हा भारतीय सैन्याने आपले कर्तृत्व सिट ह, लातूर, कच्छ, काश्मीर येथील भूकंप, त्सुनामीसारख्या संकटांत भूसेना, वायुसेना व नौसेना उत्तम कार्य केले आहे. । आंतरिक सुरक्षेच्या बाबतही भारतीय लष्कराने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. ईशान्य भारतात मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, मणिपूरमधला दहशतवाद मोडून काढणे, उल्फा व बोडो यांसारख्या संघटनांनी निर्माण केलेला उत्पात काबूत आणणे यांसारख्या सोपवलेल्या सर्व जबाबदा-या भारतीय लष्कराने समर्थपणे पार पाडल्या आहेत. | पंजाब, काश्मीर येथील दहशतवादाला समर्थपणे तोंड देऊन देशाची भौगोलिक अखंडता टिकविण्याचे ऐतिहासिक कार्यही भारतीय लष्कराने केले आहे. १९९० मध्ये काश्मीर भारतात राहील की नाही अशी शंका उत्पन्न झाली होती. परंतु दहशतवादाच्या मार्गाने काश्मीर मिळविण्याचे पाकिस्तानचे सर्व मनसुबे भारतीय लष्कराने उधळून लावले. भारताचा कोणताही भूभाग बंदुकीच्या किंवा दहशतवादाच्या मार्गाने कोणालाही बळकावता येणार नाही याची अनुभूती भारतीय लष्कराने जगाला दिली आहे. शाह. नौसेना अनादी काळापासून ज्याप्रमाणे श्रीगणेशाची आद्यपूजा सांकेतिक प्रघात म्हणून चालत आली आहे. त्याचप्रमाणे वरुणाच्या आराधनेची परंपराही भारतीय दर्यासारंग पूर्वापार पाळत आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीचा उदय होण्यापूर्वी अगदी वैदिक काळापासून हिंदू समाजाला सामरिक सामर्थ्याची जाण होती. इ.स.पू. २३०० साली जगातील पहिली गोदी (डॉकयार्ड) गुजरातच्या किना-यावरील लोथल नावाच्या बंदरात उभारण्यात आली असे संदर्भ सापडतात. श्रीवरुणदेवालाच प्राचीन काळी देवांचा राजा मानत असत. समुद्रमंथनात मौल्यवान वस्तूंचा शोध लागल्याने लक्ष्मीने परिप्लुत समुद्र हे अमूल्य भांडार आहे, ह्या सार्थ श्रद्धेपोटी वरुणाला लोक ‘देवांचा राजा' मानू लागले. आजही नवीन युद्धनौकेचे जलावतरण (राष्ट्रार्पण) करताना कश्यपऋषी-दिती, आदिती व वरुणदेव ह्यांचेच स्मरण करून तिला समुद्राच्या हवाली करतात. भारतीय आरमाराच्या बोधचिन्हात म्हणूनच तर, शं नो वरुणः' ह्या वचनाचेच दर्शन होत आहे. | पूर्वोत्तर पसरलेल्या हिमालयाच्या रांगा, इराणमार्गे जाणारा खुष्कीचा मार्ग व तीनही दिशांना वेढणारा विस्तृत समुद्रकिनारा हाच मुख्यत्वे वैदिक काळातील दळणवळण, व्यापार व परराष्ट्रीय संबंधांचा प्राचीन दुवा होता. अलेक्झांडरच्या आक्रमणापूर्वी हिंदुस्थानचे रोम, जावा-सुमात्रा, मलाया, इंडोनेशिया, पर्शिया, तुर्कस्तान व श्रीलंका इत्यादी देशांशी व्यापारी व राजकीय संबंध होते हे रोमन पर्यटक प्लीनी ह्याने आपल्या प्रवासवर्णनात स्पष्ट केले आहे. | नौकानयन शास्त्राचा अभ्यास जगाला प्रथम शिकवला तो आर्यभट्ट व मिहिरसेन ह्या दोन हिंदुस्थानी शास्त्रज्ञांनीच. सन ४३० च्या सुमारास 'मल्स' यंत्राचा (मॅग्नेटिक कंपास) भारतात शोध लागन सामुद्रिक मार्गाचे (सी-कोर्स) नकाशे (नेव्हिगेशन चार्ट्स) तयार होऊ लागले. | अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर सम्राट चंद्रगुप्ताने आरमार उभे करून आपल्या दर्याधुरंधरांना नद्या, समुद्र, महासागर ह्यांची निगराणी करून गस्त (पॅट्रोलिंग) घालण्याचा आदेश दिला. ज्या जहाजातून अलेक्झांडर वे ३९४ शिल्पकार चरित्रकोश