पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९६५ चे भारत-पाक युद्ध हे भारतीय उपखंडातले पहिले आधुनिक युद्ध ठरले. विमानदल, रणगाडे, तोफा या सर्व शस्त्रास्त्रांचा वापर या युद्धात केला गेला. १९६२च्या युद्धाच्या अनुभवामुळे भारताला सहज पराभूत करता येईल असे पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल अयबखान यांना वाटत होते. पाकिस्तानने प्रथम कच्छ भागात व नंतर पंजाबमध्ये आक्रमण केले, काश्मीरमध्ये सशस्त्र मुजाहिदीन पाठविले ज्यांचे नेतत्व पाकिस्तानचे सेनाधिकारी करीत होते. पंजाबमधल्या खेमकरण भागात, जम्मूच्या अखनूर व छांब, राजौरी क्षेत्रात, काश्मीरमध्ये उरी व हाजीपीर क्षेत्रात तंबळ यद झाले. या युद्धात छांब क्षेत्रातील भौगोलिक स्थिती पाकिस्तानला अनुकूल असल्यामुळे प्रारंभी पाकिस्तानचा वरचष्मा राहिला, तरी अन्य सर्व क्षेत्रांत भारतीय सैन्याने मुसंडी मारली व पाकिस्तानला तह करणे भाग पडले. त्यानंतर रशियाच्या मध्यस्थीने ताश्कंद येथे करार होऊन युद्धात जिंकलेला सर्व भूभाग भारताला परत द्यावा लागला. या करारावर सही केल्यानंतर काही तासांतच भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले. १९६५ च्या महाराष्ट्रातील अनेक सैनिकांनी व अधिका-यांनी युद्धात भाग घेतला व आपल्या शौर्याचा परिचय दिला. मराठा लाइट रेजिमेंटच्या अनेक बटालियनांनी युद्धभूमीवर आपल्या शौर्याचे प्रकटीकरण केले. आर्टिलरी, आर्ड कोअर, पॅरॅशूट रेजिमेंट इन्फन्ट्री, सिग्नल्स, इंजिनिअरिंग कोअर विभाग आणि इतर विभागांतही महाराष्ट्रातील अधिकारी व सैनिक चमकले. वायुसेनेत व नौसेनेतही त्यांचा समावेश होता. | १९७१ च्या युद्धाने तर भारतीय सैन्याने इतिहास घडविला. बांगलादेश मुक्त करण्यासाठी स्थापन झालेल्या मुक्ती वाहिनीला साहाय्य केले. त्यानंतर जेव्हा पाकिस्तानने ३ डिसेंबर १९७१ रोजी भारतावर वायुदलाने हुल्ला चढविला, तेव्हा भारताने प्रतिआक्रमण करून अवघ्या पंधरा दिवसांत पूर्व पाकिस्तानातील पाक सैन्याचा संपूर्ण पराभव करून बांगलादेश मुक्त केला. ९८,००० पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैन्याच्या पूर्व कमांडचे सेनापती जनरल जगजितसिंह अरोरा यांच्यापुढे शरणागती पत्करली. एक नवे राष्ट्र निर्माण करून व विजयश्री घेऊन भारतीय सैन्य परत आले. पूर्व रणक्षेत्राबरोबरच पश्चिम रणक्षेत्रावरही, राजस्थान ते काश्मीर या क्षेत्रांत भारतीय सैन्याने मोठे विजय मिळविले. पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. तत्कालीन भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ने पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्यात सिमला येथे करार झाला व या करारात भारताने पाकिस्तानचा जिंकलेला सर्व प्रदेश परत दिला व युद्धबंदी मुक्त केले. | १९८७ मध्ये श्रीलंका सरकारच्या निमंत्रणावरून भारतीय सैन्य तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ‘ऑपरेशन पवन' योजनेअंतर्गत गेले होते. लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलम (एलटीटीए) ने दहशतवादी मार्गाने श्रीलंकेची फाळणी करण्याचे ठरविले होते. परंतु भारतीय सैन्याने आपल्या प्राणांची आहुती देऊन श्रीलंकेचे अखंडत्व कायम राखले. जर त्या वेळी भारतीय सैन्याने कारवाई केली नसती, तर आजचा श्रीलंकेचा नकाशा वेगळाच दिसला असता. १९९९ मध्ये पाकिस्तानने कारगिल भागावर १९४७ प्रमाणे दहशतवाद्यांच्या रूपाने सैन्य पाठवून आक्रमण केले. भारतालासुद्धा आपले सैन्य पाठवून आपल्या हद्दीचे संरक्षण करावे लागले. या युद्धातही भौगोलिक स्थिती पाकिस्तानला अधिक अनुकूल असतानाही भारतीय सैन्याने व विशेषतः भारतीय अधिका-यांनी आपल्या शौर्याचा पाकिस्तानी सैन्याला परिचय करून देऊन आपला सर्व भूभाग परत मिळविला. या संदर्भात एक अभ्यासाचा व विश्लेषणाचा विषय असा आहे, की पाकिस्तानच्या ज्या-ज्या राज्यकर्त्यांनी भारतविरोधी धोरणांची आखणी व त्यावर कार्यवाही केली त्या सर्वांना राज्य सोडावे लागले किंवा मृत्यू पत्करावा लागला. शिल्पकार चरित्रकोश ३९३