पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारताला स्वातंत्र्य मिळत असताना भारतातील ४४ संस्थानांचे एकूण ७५,००० लढवाय्यांचे सैन्य होते. या सर्व संस्थानांचे विलीनीकरण होत असताना या सैन्याचे भवितव्य हा एक महत्त्वाचा विषय होता. या सर्व सैन्याचे भारतीय सैन्यातील विविध विभागांत विलीनीकरण करण्यात आले. यात प्रामुख्याने राजेंद्र शिख इन्फन्ट चे रूपांतर सध्याच्या १५ पंजाब, प्रथम मेवार इन्फन्ट्रीचे रूपांतर सध्याच्या ९ ग्रेनेडियर, बडोदा फोर्सचे रूपांतर २० मराठा, राजाराम रायफलचे रूपांतर १९ मराठा, हैद्राबाद फोर्सचे रूपांतर २२ मराठा, सिंदीया फोर्सचे रुपांतर कुमांऊ बटालियनमधे विलीनीकरण करण्यात आले. ब्रिगेड ऑफ गार्ड व पॅरेंशूट रेजिमेंटची पुनर्रचना करण्यात आली. याच काळात दुस-या महायुद्धात मोठ्या संख्येने भरती केलेले सैनिक व त्यांच्या तुकड्यांचीही पुनर्रचना करण्यात आली. युद्धकाळात उभ्या केलेल्या महार रेजिमेंटमधून नवीन मीडियम मशीनगन रेजिमेंट करण्यात आली, परंतु पुन्हा तिचे नामकरण 'महार रेजिमेंट' असे करण्यात आले. विभाजनाच्या वेळी सीमेची सुरक्षा करण्याकरिता बॉर्डर स्काउटची स्थापना करण्यात आली होती, १९५६ मध्ये तिचे भारतीय सैन्यात विलीनीकरण करण्यात आले. सर्व भारतीय संस्थानांचे विलीनीकरण सुरळीतपणे होत असताना जुनागढ व हैद्राबाद या दोन संस्थानांनी मात्र विलीनीकरणात अडथळे आणले. त्यामुळे जुनागढमध्ये नसला तरी हैद्राबादमध्ये मात्र लष्करी बळाचा वापर करावा लागला. १९४७ - ४८ मध्ये पाकिस्तानमधील रझाकारांचा वापर करून काश्मीरवर आक्रमण केले व त्याला पाकिस्तानच्या लष्कराचेही सक्रिय साहाय्य होते. या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यशक्तीचा वापर करण्याशिवाय अन्य पर्यायच नव्हता. काश्मीर युद्धात ९०,००० भारतीय सैनिकांनी भाग घेतला. आजवर भारतीय सैन्य हे ब्रिटिश साम्राज्य वाचविण्याकरिता लढत होते. काश्मीरमध्ये आता मात्र ते स्वतंत्र भारताच्या संरक्षणाकरिता लढत होते. या युद्धात १५०० सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले, ३५०० जखमी झाले. पाकिस्तानचे सैन्य व रझाकार मिळून वीस हजारांवर मृत्युमुखी पडले. भारतीय सैन्याच्या पराक्रमामुळे जम्मू- काश्मीरचा मोठा भाग भारतात राहिला. . | १९६१ मध्ये पोर्तुगिजांच्या ताब्यातून गोवा मुक्त करण्यासाठी भारताला लष्करी कारवाई करावी लागली. वस्तुतः ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर ज्याप्रमाणे फ्रेंचांनी पाँडेचरीला स्वातंत्र्य दिले त्याप्रमाणे पोर्तुगिजांनीही गोव्याला द्यायला हवे होते. परंतु ते न दिल्याने भारताला नाइलाजाने लष्करी कारवाई करून गोवा स्वतंत्र करावा लागला. | १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. अनेक वरिष्ठ सैनिकी अधिकारी व राजकीय नेत्यांनी वारंवार इशारे देऊनही तत्कालीन राजकीय नेत्यांनी चीनच्या धोक्याची योग्य नोंद घेतली नाही व चीनच्या आक्रमणाला तोंड देण्याची कोणतीही पूर्वतयारी केली नाही. त्या मुळे त्यावेळचे राजकीय नेतत्व व भारतीय लष्कर या आक्रमणाला तोंड देण्यास सज्ज नव्हते. कोणतीही पूर्वतयारी नसताना भारतीय सैन्याला “श्रो द चाईनीज आउट असे आदेश दिले गेले. कोणत्या प्रकारे वे कशाच्या बळावर याचे उत्तर मात्र कोणापाशी नव्हते. चीनने लडाख व नेफा (आताचा अरुणाचल प्रदेश) भागांत आक्रमण केले तरी त्याची खरी दृष्टी हिमाचल प्रदेश, आताचा उत्तराखंड व सिक्कीम यांच्यावर होती. चीन युद्धात भारताचा दारुण पराभव झाला असे सर्वसाधारणपणे मानले जात असले, तरी चीनच्या सैन्याशी मात्र विपरीत स्थितीत लढूनही भारतीय सैन्याने जो शौर्य व धैर्याचा परिचय दिला, त्याची प्रशंसा केली गेली. चिनी सैन्य लेहपर्यंत आले नाही किंवा अरुणाचल अजूनही भारताचाच अविभाज्य भाग राहिला आहे, तो भारतीय सैन्याने दाखविलेल्या आपल्या शौर्याच्या परिचयामुळेच. ३९२ शिल्पकार चरित्रकोश । ५।