पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्णय घेतला. प्रामुख्याने रशियाचा सामना करण्याकरिता व अफगाणिस्तान यांच्या सीमेवर या सैन्याचा उपयोग व्हायचा होता. परंतु नंतर रशियाचे धोरण बदलून तो मित्रराष्ट्र बनल्यानंतर यांपैकी तीन डिव्हिजन्स इराक येथे व एक डिव्हिजन मलेशियाला पाठविण्यात आली. या वेळी ब्रिटिश सैन्य हे जर्मन आघाडीवर लढत होत व पराभूत होत होते. या पार्श्वभूमीवर पूर्व आफ्रिकेत भारताच्या चौथ्या व पाचव्या डिव्हिजनने उत्कृष्ट पराक्रम दाखवून विजयश्री प्राप्त केली. 'सिदी बरानी'च्या लढाईत फोर्थ इन्फन्ट्री डिव्हिजन व सेव्हंथ आम्र्ड डिव्हिजननी आपल्या संयुक्त कारवाईत आपल्या शौर्याने इटलीच्या सैन्याचा पाडाव केला व या एकाच लढाईत १,३०,००० सैनिकांना कैद केले आणि ४०० टॅक्स व १२४० तोफा हस्तगत केल्या. नंतर 'अल अमीन व इटली यथालि युद्ध आघाड्यावर भारतीय सैन्याने मोठे विजय मिळविले. भारताच्या चौदाव्या इन्फन्ट्री डिव्हिजनने ब्रह्मदेशाचा मोठा प्रदेश जपानी सैन्याकडून जिंकून घेतला. दुस-या महायुद्धाच्या समाप्तीच्या वेळी भारतीय सैन्य संख्या वीस लाख होती व अधिका-यांची संख्या १५,००० होती. । दुस-या महायुद्धात २,४३,३८८. भारतीय सैनिकांना वीरगती प्राप्त झाली व ६४,३५४ सैनिक जखमी झाले, तर ११,७५४ सैनिक बेपत्ता झाले. भारतीय सैन्याच्या पराक्रमाविना ब्रिटिशांना जर्मनी व जपानविरुद्ध विजय मिळविता आला नसता. या युद्धात ३१ भारतीयांना 'व्हिक्टोरिया क्रॉस' हा सर्वोच्च वीर सन्मान मिळाला. यात महाराष्ट्रातील यशवंत घाडगे व नामदेव जाधव या दोघांचा समावेश आहे. हे दोन्ही वीर मराठा इन्फन्ट्री रेजिमेंटचे होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधीन असलेल्या एका लहान स्थानिक सैनिकांच्या तुकडीचे दुस-या महायुद्धाअखेर जगातील एका मोठ्या सैन्यात रूपांतर झाले होते. वीस लाखांहून अधिक असलेल्या भारतीय सैन्याने जो पराक्रम गाजविला, त्यामुळे भारताला आता फार काळ पारतंत्र्यात जखडून ठेवता येणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली. भारतीयांनी चालवलेल्या स्वातंत्र्यलढ्याबरोबरच भारताला स्वातंत्र्य मिळण्याचे हेही एक मोठे कारण आहे. | ज्या भारतीय सैन्याच्या शौर्याने ब्रिटनला दुस-या महायुद्धात विजय मिळाला, त्याच भारतीय सैन्याचे स्वातंत्र्याच्या वेळी विभाजन करण्यात आले. या विभाजनात अनेक सैनिक, युद्धसामुग्री पाकिस्तानात गेली व त्या आधारे स्वातंत्र्य मिळताक्षणीच पाकिस्तानने काश्मीर गिळंकृत करण्यासाठी भारतावर आक्रमण केले. या आक्रमणाची पूर्ण कल्पना ब्रिटिश अधिका-यांना होती, पण ती त्यांनी भारतीय अधिका-यांना न देण्याचा कृतघ्नपणा दाखविला. भारताच्या फाळणीने आजवर भारतीय सैन्याचा असलेला एक भागच शत्रू म्हणून भारतीय सैन्याविरुद्ध उभा राहिला, स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय सैन्य स्वातंत्र्यानंतर भारताची फाळणी झाली तशी भारतीय सैन्याचीही फाळणी झाली. जे सैन्य व अधिकारी एका सैन्यातून लढले होते, ते आता वेगवेगळ्या सैन्यांत गेले. फाळणीनंतरही भारत व पाकिस्तान यांचे एकच व एकत्रित सैन्यदल असावे असा विचार काही सेनेतील अधिका-यांनी मांडला. तसे झाले असते तर केवळ भारताचाच किंवा आशियाचा नव्हे तर जगाचा इतिहासही बदलला असता. भारताच्या विभाजनाचा फार मोठा परिणाम इन्फन्टीवर झाला. विभाजनाच्या अगोदर अनेक रेजिमेंट्स संयुक्त रेजिमेंट्स (मिक्स्ड) होत्या. त्यांत दोन्ही धर्माचे सैनिक होते. बटालियन, प्रशिक्षण केंद्रे आदी संयुक्त होते. त्या सर्वांचे विभाजन झाले. त्यामुळे रेजिमेंटची संपत्ती, इतिहास, त्यांच्या नोंदी आदी सर्वांचेच विभाजन झाले. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्यरचना पूर्णपणे पुनर्गठित करण्यात आली. शिल्पकार चरित्रकोश