पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म्हणून विख्यात होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर स्वतंत्र मराठी सैन्याची उभारणी ला. त्यानंतर पेशवे, शिंदे, होळकर, भोसले. गायकवाड आदी सरदारांनीही स्थायी सैन्य व्यवस्था का | सतराव्या शतकाच्या मध्यावर ईस्ट इंडिया कंपनीने फोर्ट विलियम, फोर्ट सेंट जॉर्ज व बाँबे प्रेसिडन्सी स्थापना केली. मुंबई व कलकत्ता येथे नेटिव्ह इंडियन कंपनीची स्थापना सैन्याच्या स्वरूपात केली. त्यानंतर ही सैन्याची व्यवस्था वाढत गेली. तत्कालीन भारतीय सैनिकांकडे मस्केट व बायनट ही शस्त्रे १८५३ पर्यंत होती त्यानंतर नवी शस्त्रसामग्री यायला सुरुवात झाली. प्रारंभीची भारतीय सैन्याची रचना पायदळावर (उन्फन्टी) आधारित होती. हळूहळू या सैन्यात तोफखाना, मशीनगन्स, रणगाडे आदी शस्त्रास्त्रांचा समावेश झाला. त्यानंतर मराठा, राजपूत, जाट, शीख, डोगरा, गरखा अशा वेगवेगळ्या रेजिमेंट्सही स्थापन करण्यात आल्या त्यानंतर त्यांत आर्मुड कोअर, आर्टिलरी, इंजिनिअर, सिग्नल आदी विभागांची निर्मिती करण्यात आली. | पहिल्या महायुद्धात (१९१४-१९१८) भारतीय सैन्याने अनेक युद्धक्षेत्रांत कर्तबगारी बजावली. ब्रिटिश शासनाने भारतीय सैनिकांना पूर्व आफ्रिका, इजिप्त, फ्रान्स, गेलिपोली, मेसोपोटेमिया, पॅलेस्टाइन आदी युद्धक्षेत्रात पाठविले. या सर्व युद्धक्षेत्रांवर भारतीय सैन्य मोठ्या शौर्याने लढले व या शौर्याची व युद्धकौशल्याची दखल ब्रिटिश शासन व जगानेही घेतली. जेव्हा भारतीय सैन्याला फ्रान्समध्ये पाठविले गेले, तेव्हा त्यांच्याकडे फक्त साधे कपडे व गणवेश होता. । त्यामुळे तेथील थंडी व बर्फवर्षाव यांमुळे सैन्याचे मोठे नुकसान झाले तरी भारतीय सैनिकांनी आपल्या शौर्याची चमक दाखविली. पहिल्या महायुद्धाअखेरीस भारतीय सैन्य हे ब्रिटिश सत्तेचा प्रमुख आधार बनले. (बाय एंड ऑफ फर्स्ट वर्ल्ड वॉर, इंडियन आर्मी हँड नाऊ बिकम द ब्रिटिश एंपायर्स स्ट्रैटेजिक रिझव्र्ह.) पहिल्या महायुद्धात साठ हजार भारतीय सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. या युद्धात भारतीय सैनिकांना दोनशे विविध प्रकारचे शौर्य पुरस्कार मिळाले. पंजाब, मराठा, राजपूत, बलुची, शीख आदी अनेक रेजिमेंट्सनी आपल्या शौर्याचा ठसा उमटविला. मराठी सैन्याने मेसोपोटेमियाच्या युद्धक्षेत्रात आपला पराक्रम गाजविला. मराठा सैन्याच्या नावानेच शत्रू घाबरायचा ही वस्तुस्थिती अनेक ब्रिटिश अधिका-यांनीही मान्य केली. मराठा सैनिकांच्या तीन बटालियननी कुत अल अमारा क्षेत्रात आपल्या अद्वितीय शौर्याचे प्रदर्शन केले. त्याबद्दल या बटालियनना ‘रॉयल' हा किताब देऊन गौरविण्यात आले. आज त्या बटालियनला ‘मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटची पाचवी रॉयल बटालियन' या नावे संबोधले जाते. पहिल्या महायुद्धात मराठा सैन्याने आपल्या पराक्रमाने छाप पाडली. | दुस-या महायुद्धातही भारतीय सैन्याने अप्रतिम शौर्य, साहस आणि आपल्या युद्धकौशल्याचा प्रत्यय जगाला दिला. या काळात भारतीय सैन्याचा मोठा विस्तार झाला. इन्फन्ट्री बटालियनची युद्धापूर्वीची संख्या ९६ होती, ती युद्धानंतर २५० पर्यंत पोहोचली. या युद्धासाठी सैन्यात व्यापक प्रमाणात भरती करण्यात आली. भारतीय सैनिकांनी या युद्धात आफ्रिका, इटली, इराण, ब्रह्मदेश, मलेशिया व युद्धाच्या अखेरीस जावा, सुमात्रा, बोर्निओ येथील रणांगणे आपल्या शौर्याने गाजविली. या युद्धापूर्वी काही विशिष्ट जाती किंवा प्रांतांना ‘मार्शल रेस'चा दर्जा देऊन भरती होत असे. परंतु या युद्धात व्यापक प्रमाणात भरती करावी लागल्याने मार्शल रेस'चा सिद्धान्तच रद्दबातल झाला. याच युद्धाने भारतीय स्वातंत्र्याचा ख-या अर्थाने पाया रचला गेला व ब्रिटिश साम्राज्याच्या अस्ताला प्रारंभ झाला. यदकाळात इन्फन्ट्री, मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री, आर्टिलरी, मशीनगन बटालियन, आर्ड कोअर अशा विविध शाखांची स्थापना व संख्या वाढली. युद्धकाळातच ब्रिटिश सरकारने भारतात पाच डिव्हिजन सैन्य उभे करण्याचा शिल्पकार चरित्रकोश लागलाणचाराला