पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

या चरित्रनायकांची यशोगाथा जाणून घेण्याअगोदर आपल्या भारतीय सेनेचे स्वरूप आणि पार्श्वभूमी जाणून घेणे उद्बोधक ठरेल असे वाटते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या सेनेचा ख-या अर्थाने विकास झाला. आता सेनेला जे स्वरूप लाभले आहे, त्यापर्यंत जो विकासक्रम आहे त्याचा भूसेना, नौसेना के वायुसेना असा यथ स्वतंत्र धावता आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भूसेना मानवी संस्कृतीच्या प्रारंभापासूनच समाजाने वीरवृत्तीचा सन्मान व आदर केला आहे. आदिम काळात मानवाने जेव्हा टोळीच्या स्वरूपात आपल्या समाजजीवनाला प्रारंभ केला, तेव्हा त्या टोळीतील सर्वाधिक शक्तिवान व्यक्तीचीच सर्वोच्चपदी निवड होत असे. त्यानंतर मानवी संस्कृतीचा विकास होते असताना राजकारणात व राज्य प्रशासनात सैन्याची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. राज्यकर्त्याला आपल्या अस्तित्वासाठी सैन्याचे पाठबळ असणे महत्त्वाचे वाटत असे. आधुनिक कालखंडातही राष्ट्राला जगात सन्मान मिळायचा असेल तर समर्थ सैन्याचे पाठबळ आवश्यक असते. राष्ट्रभक्तीला राष्ट्रशक्तीचे पाठबळ नसेल तर त्या देशाला जगात पुरेसा सन्मान मिळत नाही. त्यामुळे समर्थ, सुदृढ, संघटित व सुसंचालित सैन्यदल नसेल तर त्या देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव टिकू शकत नाही. । | आपल्या देशातही अगदी वैदिक काळापासून शस्त्रसज्जतेचे महत्त्व सांगितले आहे. अनेक ऋषीही शस्त्रास्त्र विद्येचे उपासक होते. आपल्या शौर्याने युद्धात जे विजय मिळवून देतात त्या सैनिकांचा योग्य सन्मान करण्याची आवश्यकता मनुस्मृतीसारख्या प्राचीन ग्रंथातही नमूद केली आहे. आज जगातील सर्वच देशांत विविध पदकांच्या रूपाने शौर्याला सन्मानजनक प्रतिष्ठा दिली जाते. जर युद्धात वीरगती प्राप्त झाली, तर स्वर्गप्राप्ती आणि जर युद्धात विजय मिळाला, तर राज्यप्राप्ती यांपैकी काहीतरी एक निश्चित मिळेलच अशी ग्वाही भगवद्गीतेमध्ये दिली गेली आहे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चयः ।। २.३७ ।। कौटिल्यानेही आपल्या अर्थशास्त्रात सैन्यदलाचे महत्त्व सांगून सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्याची आवश्यकता नमूद केली आहे. युद्धात पराक्रम करणा-या सैनिकांना राजाने जमीन द्यावी व युद्धात वीरगती प्राप्त करणाच्या सैनिकांवर अवलंबून असणा-यांचीही उचित काळजी राजाने घ्यावी असे चाणक्य म्हणतो. भारताच्या आधुनिक सैन्यदलाची मुहूर्तमेढ इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने रोवली गेली. इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे सैनिकांना वेगवेगळ्या पदकांनी गौरविले जात असे, तीच प्रथा या कंपनीने भारतात सुरू केली. इंग्लंडमध्ये सर्वोच्च पराक्रम गाजविणा-या सैनिकाला 'व्हिक्टोरिया क्रॉस' हे सर्वोच्च पदक दिले जात असे. १८५६ च्या ‘क्रिमियन युद्धात हे पदक प्रथम दिले गेले. पहिल्या व दुस-या महायुद्धात अनेक भारतीय सैनिकांनाही या पदकाने गौरविले गेले. त्यांत महाराष्ट्रातील सैनिकांचाही समावेश आहे. पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्लीला ‘इंडिया गेट'ची उभारणी करण्यात आली, त्याच्यावर अशा सर्व सैनिकांचा नामोल्लेख आहे. भारतात सोळाव्या व सतराव्या शतकाच्या दरम्यान आपल्या राज्यविस्तारासाठी इंग्रजांनी 'स्टेट फोर्सस अॅण्ड आर्मीज ऑफ द किंग' उभी करायला सुरुवात केली. यात प्रामुख्याने मराठा, राजपूत, रोहिला व शीख सैनिकांचा समावेश असे. मराठा सैन्य आपले शौर्य, कार्यक्षमता, अनुशासन व किमान साधनांवर निर्भर असणारे शिल्पकार चरित्रकोश ३८९ = =