पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हुद्दार, श्रीकांत नारायण प्रशासन खंड उद्यान विकसित केले. कोयना प्रकल्पाच्या विकासात त्यांचे योगदान आणि अनुभव यापोटीच त्यांची कोयना प्रकल्पाच्या तज्ज्ञ समितीवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यकुशलतेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाने सर विश्वेश्वरय्या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच त्यांना फाय फाऊंडेशन पुरस्कार, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींगचा विश्वेश्वरय्या पुरस्कार, पुणे व नागपूर महानगरपालिकेतर्फे त्यांचा सत्कार, तसेच केंद्र शासनातर्फे जवाहरलाल नेहरू पुरस्कार व पुण्यातील निनाद संस्था, इंजिनिअर फोरम, नागपूर यांचेतर्फे स्थापत्य शास्त्रातील भरीव कामगिरीबद्दल जीवन गौरव, सेंटर फॉर इंडिस्ट्रियल डेव्हलपमेंट कौन्सिल या संघटनेतर्फे २००९ मधील विश्वकर्मा पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. त्यांना काव्य, साहित्य यासाठीचा प्रेरणा फौंडेशनतर्फे २००६ मधील पहिला जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी अनेक स्थापत्य विषयक परिषदा तसेच विविध महाविद्यालयांमधून मार्गदर्शन केले. सेवानिवृत्तीनंतरही कृष्णा पाणी वाटप तंटा लवाद व बाभळी प्रकल्प, पोलावरम व मांडवी खोरे तंटा या संदर्भातील महाराष्ट्र राज्याची भूमिका ते हिरिरीने मांडत आहेत. - संपादित

३७२ शिल्पकार चरित्रकोश