पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हुद्दार, श्रीकांत नारायण प्रशासन खंड मोठ्या व मध्यम प्रकल्पांचा पाया घातला. चंद्रपूरच्या जंगलात सर्वेक्षण करीत असताना अत्यंत मागासलेल्या गोंड, माडीया अशा आदिवासी लोकांशी त्यांचा संपर्क होत असे. त्यांच्यात मिळूनमिसळून त्यांना सर्वेक्षणाची (माडीया भाषेत ‘पैमास’) रूपरेखा समजावून सांगून त्यांनी या कालखंडात विदर्भातील अनेक प्रकल्पांचे सर्वेक्षण व अन्वेषण पूर्ण करून प्रकल्प अहवाल मंजूर करून घेतले. यातील बरेचसे प्रकल्प सध्या कार्यान्वित झाले असून गोसीखुर्द प्रकल्प हा केंद्र शासनाने राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट केलेला आहे. चंद्रपूरच्या जंगलात सर्वेक्षण करीत असतानाच त्यांनी स्थापत्य शास्त्रातील पदवीशी समकक्ष अशी ए.एम.आय.ई.ची परीक्षा उत्तीर्ण केली. १९७३ पासून ते कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत होते. याच कालावधीत त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या परीक्षा दिल्या. त्या दोन्ही ठिकाणी त्यांची प्रथम वर्ग अधिकारी म्हणून निवड झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते सर्वप्रथम आले. सन १९७५-७६ मध्ये ते केंद्रीय जल आयोगामध्ये साहाय्यक संचालक पदी कार्यरत असताना, जलविद्युत प्रकल्पांच्या संकल्पाबाबतचे काम त्यांचेकडे आले. त्यांनी ओरिसातील रंगाली प्रकल्प, जम्मू-काश्मीरमधील स्टकना प्रकल्प, अफगणिस्तानातील बामीयान आदी जलविद्युत प्रकल्पांसंबंधीत कामे केली. सन १९७६ च्या नोव्हेंबर मध्ये ते महाराष्ट्र शासनात प्रथम श्रेणी अधिकारी या नात्याने रुजू झाले व त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिव पदावरून सप्टेंबर २००६ अखेर ते निवृत्त झाले. त्यांच्या या जवळपास ३९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १६० मे. वॅटचा पेंच जलविद्युत प्रकल्प, १००० मे. वॅटचा कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा-४ या दोन्ही प्रकल्पांचे संपूर्ण बांधकाम करून हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित केले. प्रशिक्षणानंतर त्यांची नेमणूक पेंच पाटबंधारे प्रकल्प या मोठ्या प्रकल्पावर झाली. या प्रकल्पाच्या पायात मोठ्या प्रमाणात घळी असून, संगमरवरी दगडाचा पाया असल्याने त्यामध्ये ‘कर्टन ग्राऊंटींग’ पद्धतीने पायाला मजबुती आणली, कालव्याच्या संरेखेमध्ये बर्‍याच ठिकाणी ‘फिशर क्ले’ प्रकाराची माती असल्याने त्यांनी या मातीवर उछड पद्धतीच्या मातीचा भराव टाकून अस्तरीकरणाचा नवा प्रयोग तडीस नेला व याच प्रकल्पावर ‘बॅलेन्स कॅन्टी लिव्हर’पद्धतीचे दोन जलसेतूचे निर्माण केले. तसेच धरण पायथ्याला मत्स्य व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने फिश सिडस् फार्म व पिंपळाच्या आकाराची एक सुंदर बाग निर्माण केली. नागपूर येथे फलोत्पादन विभागातर्फे भरविण्यात येणार्‍या प्रदर्शनात या बागेतल्या विविध फुलांना सातत्याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. पदोन्नतीवर ते कार्यकारी अभियंता म्हणून पेंच जलविद्युत प्रकल्पावर रुजू झाले. भुयारी विद्युतगृहात मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होऊन दरडी कोसळल्या असल्यामुळे कोणीही ते काम करण्यास तयार नव्हते. त्यांनी जिवावर उदार होऊन, पुढाकार घेऊन मजुरांना प्रोत्साहित करून या संपूर्ण भुयाराला मजबुती व आधार देण्याचे काम केले. सन १९८६-८७ मध्ये प्रकल्पांची दोन्ही संयंत्रे कार्यान्वित झाली. हुद्दार यांच्या कामावर प्रभावित होऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांनी त्यांची कोयना प्रकल्पाच्या ४ थ्या टप्प्याच्या कामासाठी निवड केली. सुुरुवातीच्या काळासाठी त्यांची नियुक्ती कोयना प्रकल्पाच्या संकल्पनेसाठी मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (विद्युतगृहे) येथे झाली. कोयना प्रकल्पाच्या ४ थ्या टप्प्याचे अधिजल/अवजल भुयार, भूगर्भातील विद्युत गृह, आदान मनोरे, जलाशय छेद प्रक्रिया असे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वप्रथम होणार्‍या या प्रक्रियेचे त्यांनीच संकल्पन केले. यामुळे त्यांचे नाव

३७० शिल्पकार चरित्रकोश