पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड हुद्दार, श्रीकांत नारायण कामगिरी होय. १९३८ साली छोट्या उपविभागापासून सुरू केलेल्या संघटनेची धुरा आपल्या द्वितीय अधिकार्‍याकडे १९६६ साली सोपवताना तिच्यात दोन यांत्रिकी मंडळे व १६ यांत्रिकी विभाग समाविष्ट होते. १९६६ साली ‘भारत फोर्ज’ कंपनीच्या फोर्जींगचा कारखाना उभारण्याचे काम चालले होते. त्या कंपनीचे अध्यक्ष नीलकंठराव कल्याणी यांनीे हिरेमठ यांना आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. प्रदीर्घ तीस वर्षांच्या सेवेनंतर, निवृत्तीस ५ वर्षे अवकाश असतानाच हिरेमठ यांनी शासकीय सेवा सोडली आणि ‘भारत फोर्ज’ कंपनीत ते रुजू झाले. आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी नवे तंत्रज्ञान आत्मसात केले. पुढे अल्पावधीत ही कंपनी भारतभर नावाजली गेली त्यात हिरेमठांचा सिंहाचा वाटा होता. परंतु याच सुमारास त्यांना अती श्रमामुळे हृदयविकाराचा त्रास झाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही वर्षे भारत फोर्जमध्ये त्यांना मनाविरुद्ध काढायला लागली. त्यानंतर १९७३ मध्ये अचानक त्यांना सिपोरेक्स इंडिया कंपनीचे प्रमुख बी.जी.शिर्के यांनी आपल्याकडे बोलावले. त्यांनी जनरल मॅनेजर म्हणून कार्यभार स्वीकारला. पुढील १० वर्षे त्यांनी नेमाने उत्तम इंजिनीअरिंग कौशल्याने सिपोरेक्स कंपनीला परदेशांच्या नकाशावर विराजमान केले. मध्यपूर्वेत सौदी अरेबिया, इराक इत्यादी ठिकाणी निर्यात करून कंपनीने खूप नफा व नाव कमावले. उत्पादनाची व निर्यातीची सर्व जबाबदारी हिरेमठांनी चोखपणे पार पाडली. अशा तर्‍हेने प्रकृतीची उत्तम तर्‍हेने काळजी घेत वयाच्या ७० वर्षापर्यंत ते सिपोरेक्समध्ये कार्यरत राहिले. स्वत:चा कारखाना असावा या हेतूने त्यांनी चिंकवे हा गाड्यांकरिता सुटे रबरी भाग बनविण्याचा कारखाना वयाच्या ७० व्या वर्षी विकत घेतला. त्यात कमालीची सुधारणाही केली. परंतु लघु उद्योगाचे अर्थशास्त्र सांभाळणे त्यांना त्या वयात जमले नाही. त्यांनी अकरा वर्षे अथक परिश्रम करून, कारखाना चालू ठेवून कामगारांचे हित जपले परंतु त्यावेळी कारखानदारीची वाईट वर्षे व अवास्तव व्याजदर या कारणांमुळे तो कारखाना १९९४ मध्ये विकून टाकण्याचा निर्णय त्यांंनी घेतला. त्यांना खेळांची आवड होती. क्रिकेट, टेनिस व बॅडमिंटन हे खेळ ते उत्तम खेळत. वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. जगदीश हिरेमठ हे त्यांचे चिरंजीव आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हृदयरोग तज्ज्ञ आहेत तर मोठे चिरंजीव मृत्युंजय पाटबंधारे खात्यात व महांतेश हे इंजिनिअरींगमध्ये डॉक्टरेट मिळवून उपग्रह निर्मिती व त्याचे अवकाशात प्रक्षेपण या क्षेत्रात अमेरिकेत नावाजलेले आहेत. - मृत्युंजय हिरेमठ

हुद्दार, श्रीकांत नारायण सचिव-पाटबंधारे विभाग १ ऑक्टोबर १९४८ श्रीकांत नारायण हुद्दार यांचा जन्म तसेच शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षणही नागपूर येथे झाले. घरची परिस्थिती व वडिलांची नोकरीही बेताचीच असल्याने त्यांना हातभार लावण्याच्या दृष्टीने त्यांनी शालान्त परीक्षेनंतर स्थापत्य शास्त्रात पदविका परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी चंद्रपूर येथे नोकरीस प्रारंभ केला. १९६७ ते १९७३ या काळात त्यांनी आवेक्षक या पदावर काम केले. ते प्रथमत: पाटबंधारे खात्यात नागपूर अंतर्गत पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळ येथे रुजू झाले आणि सुरुवातीच्या काळामध्ये चंद्रपूर जिल्हा, नागपूर जिल्हा व यवतमाळ जिल्हा या भागातील पाटबंधारे प्रकल्पांचे सर्वेक्षण व अन्वेषण करून विदर्भातील जंगलाने वेढलेल्या परिसरात त्यांनी शिल्पकार चरित्रकोश