पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड सोमण, दत्रात्रेय शंकर खोरे योजनेतील पाचशे योजनांचे नियोजन व त्यांच्या कामातील प्रगतीवर नियंत्रण हे काम त्यांनी केले. जागतिक बँकेच्या साहाय्याने जलविद्युत प्रकल्पांची दिलेल्या मुदतीमध्ये कार्यवाही केली. त्याबद्दल जागतिक बँकेने त्यांची प्रशंसाही केली. भंडारदरा जलविद्युत (१२ मेगावेट) योजनेचे नियोजन व १५ महिन्यात कार्यवाही याकडे सोडल यांनी लक्ष पुरविले. जलसिंचन विभाग सचिव, जलशक्ती विभाग व जलसिंचन व्यवस्थापनाचे प्रमुख अशाही जबाबदार्‍या सोडल यांनी सांभाळल्या. भारतात प्रथमच घाटगर धरणामध्ये राखेचा मर्यादित उपयोग क्राँक्रिटमध्ये केला. जल व्यवस्थापनात शेतकर्‍यांचा सहभाग अनिवार्य केला. यासाठी पाण्याच्या पुरवठ्याच्या आकारमानासहित कायद्याचा मुसदा तयार केला. २००१-२००२ मध्ये प्रथमच जलसिंचनाचा अहवाल सादर केला. त्यात महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये एकूण पाणीसाठा किती? प्रत्येक पाणीसाठ्याचा उपयोग पिण्यासाठी, सिंचनासाठी व उद्योगांसाठी कसा होतो याचा तपशील बारकाईने नमूद केला. उपग्रहाद्वारे जलसिंचन क्षेत्राचे मापन व त्यावरील वसुलीचे दर ठरविणे, पाण्याच्या विविध उपयोगांचा तुलनात्मक अभ्यास करून पाण्याचे दर ठरविणे, त्यासाठी पाणी नियंत्रण अधिकारी नेमणे व पाणीकराच्या वसुलीसाठी त्यांचा हिशेब ठेवणे, अंमलबजावणी करणे व लेखापरीक्षा करणे, जलधोरणाचा मसुदा व धरण सुरक्षा मसुदा, जलसिंचन व्यवस्थापनेतील अधिकार्‍यांना प्रशिक्षण अनिवार्य करणे व जलआकारणी दर काळानुसार बदलणे, सरकारी नियमानुसार दरवर्षी १५% वाढ करणे, औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा पुनर्वापर याचीही त्यांनी चर्चा केली. सोडल यांनी आपल्या कामाच्या संदर्भात ६ संशोधनपर व १० विस्तृत विवेचनपर विचारपत्रे सादर केली. जलस्रोत विभागातील उल्लेखनीय सहभागाबद्दल २००२-२००३ मध्ये ‘शांती यादव मोहन’ पुरस्कार मिळाला. २००४ मध्ये रशियातील मॉस्को येथे ‘जलसिंचन व जलविकास’ यावर आंतरराष्ट्रीय आयोगाकडून नवीन पद्धतीच्या व्यवस्थापनेबद्दल वात्साव अवार्ड मिळाले. त्यांनी या संदर्भाने ४२ राज्यस्तरीय, २० राष्ट्रीय व ६ आंतरराष्ट्रीय कृतिसत्रे, चर्चासत्रे, परिषदांना हजेरी लावली. नेदरलँड व इंग्लडमध्ये १५ दिवसांचे ‘जल योजना’ यावर त्यांचे प्रशिक्षण झाले. तसेच फ्रान्स, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, तुर्कस्थान, स्वीडन येथे चर्चासत्रे परिषदा यात त्यांचा सहभाग होता. महाराष्ट्र राज्यातील ‘बेंचमार्किंग ऑफ इरिगेशन प्रोजेक्ट’, जल आकारणी (वॉटर प्राइसिंग) या विषयांच्या संदर्भाने ‘जागतिक बँक’ वॉशिंग्टन येथे तसेच कॅनडातील मॉन्ट्रीयल येथे भारताचे प्रतिनिधित्व केले. - रोहिणी गाडगीळ

सोमण, दत्तात्रेय शंकर पोलीस महासंचालक-महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्त-मुंबई ८ मे १९३० दत्तात्रेय शंकर सोमण यांचा जन्म जळगाव येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पुणे येथील नूतन मराठी शाळेत झाले, तर इंग्रजी पाचवीपर्यंतचे शिक्षण पुणे येथीलच न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले.त्यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत होते. १९४५ मध्ये त्यांच्या वडिलांची बदली सोलापूर येथे झाल्यामुळे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण तेथील हरिभाई देवकरण प्रशाला येथे झाले. १९४७ मध्ये ते मुंबई विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर स । शिल्पकार चरित्रकोश