पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोडल, सुरेश विठ्ठल प्रशासन खंड वाटले. त्यातूनच सोडल यांना प्रेरणा मिळाली. त्यांचे शिक्षण कोल्हापूर-कराड येथे शिवाजी विद्यापीठातून झाले. १९६५ ते ६९ या काळात शिक्षण पूर्ण करून त्यांनी पहिला क्रमांक मिळवून बी.ई. (सिव्हील) ही पदवी व सुवर्णपदक मिळवले. १९७५-७६ मध्ये उत्तर प्रदेशातील रूरकी विद्यापीठातून ‘जलस्रोतांचा विकास’ (वॉटर रिसॉर्सेस डेव्हलपमेंट) व ‘पाण्याची उपलब्धता व विकास’ यातील पदविका घेतली. भारत शेतीप्रधान देश असल्यामुळे स्वातंत्र्यानंतर बांधकाम खात्याकडे विकासासाठी विविध प्रकारची कामे देण्यात आली. जुलै १९६९ ते एप्रिल १९७१ मध्ये ‘कुकडी योजने’तील ‘येदगाव’ धरणासाठी मातीची परीक्षा करण्यासाठी क्षेत्र शोधणे, पायासाठी जागेचा शोध घेणे, १९७१ ते १९७४ मध्ये उज्जैन येथील मुख्य कालव्यांचे संकल्पन चित्रण व बांधकाम संरचना, १९७४ ते १९७८ मध्ये उज्जैन योजनेतील भीमा नदीवरील सेतू प्रणालीचे संकल्पना चित्रण व बांधकाम, ऑक्टोबर १९७८ ते १९८३ मध्ये कार्यकारी अभियंता असताना नाशिक-केंद्रीय संरचना चित्रण संघटना- (भूमीवरील व भूमीखालील) पृष्ठभागावरील व पृष्ठभागाखालील ऊर्जाघर यांचे नियोजन संरचना चित्रण करणे अशा जबाबदार्‍या सोडल यांनी सांभाळल्या. तसेच सप्टेंबर १९८३ ते डिसेंबर १९८६ मध्ये कार्यकारी अभियंता असताना त्यांनी सावंतवाडी-लघुसिंचन व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लघुसिंचन योजनांचे नियोजन, संरचना, बांधकाम व व्यवस्थापन याकडे लक्ष पुरविले. त्यांनी सप्टेंबर १९८६ ते डिसेंबर १९८९ मध्ये कार्यकारी अभियंता या नात्याने हेटावणे मध्यम योजना, पेण याचे नियोजन व बांधकाम व चार खेडेगावातील शेतकर्‍यांचा सहभाग घेऊन नियोजन व पुनर्वसन आणि ४५ मी. उंचीचे मातीचे धरण याचे नियोजन व बांधकाम याकडे लक्ष पुरविले. १९८९ मध्ये कार्यकारी अभियंता असताना माणगाव, रायगड जिल्हा येथील क्षारयुक्त जमीन व कोकण क्षेत्रातील क्षारयुक्त जमिनींचे नियोजन, संरचना, बांधकाम याकडे लक्ष पुरविले आणि सागरी माती पसरून जमिनीचा पोत सुधारण्याची संकल्पनासुद्धा राबविली. जून १९९१ ते ९३ मध्ये कार्यकारी अभियंता असताना जायकवाडी मुख्य कालवा याचे फ्रान्स व जागतिक बँक यांच्या साहाय्याने जेसर द्बारे नियोजन व व्यवस्थापन करून त्यास गती दिली. जून १९९३ ते १९९५ मध्ये अधीक्षक अभियंता, व्यवस्थापक उजनी योजना सोलापूर, भीमा योजनेतील सिंचनाचे व्यवस्थापन, भीमा योजनेतील क्षेत्राचे विकसन करण्यासाठी प्राधिकारी अशा जबाबदार्‍या त्यांच्याकडे होत्या. सिंचन व्यवस्थापनेतील तीस संघटनांमध्ये शेतकर्‍यांच्या सहभागाचे व्यवस्थापन करून चौपटीने वाढलेल्या सिंचनाची वसुली केली. जुलै ९५ ते एप्रिल ९७ मध्ये ते प्रतिनियुक्त कार्यवाह होते. महाराष्ट्रातील पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन करणे, आंतरराज्यीय योजनांचा विचार करणे, महाराष्ट्र राज्यातील ५ सिंचन विकास महामंडळं स्थापनेसाठी प्रयत्न करणे, खुल्या बाजारात ९००० कोटी रोख्यांच्या विक्रीतून जलसिंचन विकास महामंडळाची स्थापना करणे या कामात त्यांचा सहभाग होता. नंतर एप्रिल १९९७ ते २००१ या काळात सोडल यांनी मुख्य अभियंता व सह सचिव म्हणून मुंबई येथील जलसिंचन विभाग मंत्रालयात जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र राज्यातील जल विद्युत योजनांचे नियोजन, आंतरराज्य योजनांचा विचार, महाराष्ट्रातील कृष्णा शिल्पकार चरित्रकोश