पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड सोडल, सुरेश विठ्ठल सेवानिवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झालेले सुकथनकर सतत कार्यमग्न राहिले. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमांशी त्यांनी आपला अनुभव-संबंध जोडला. ते अनेक शासकीय समित्यांचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. सरकारी समित्यांप्रमाणे विविध औद्योगिक समूहांचे कार्यकारी संचालक म्हणूनही ते काम पाहतात. पुण्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, तसेच सांस्कृतिक संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. ‘संगीत महाभारती’ आणि ‘मुंबई प्रथम’ ह्या संस्थांचे ते उपाध्यक्ष आहेत. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले. नवी दिल्ली येथील ‘नागरी संघटना जीवनक्रम’ या राष्ट्रीय संस्थेच्या नियंत्रक मंडळाचे ते अध्यक्ष होते. मोडकळीस आलेल्या जुन्या निवासी इमारतींची वेळीच पुनर्बांधणी करणे हे उद्दिष्ट ठेवून काम करणार्‍या महाराष्ट्र शासनाच्या एका विशेष समितीचे सुकथनकर प्रमुख सल्लागार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वेतन आयोगाच्या विविध समित्यांवर सुकथनकर यांनी सदस्य, अध्यक्ष, सल्लागार या नात्याने काम पाहिले. १९९७-१९९८ मध्ये स्थापन झालेल्या पाचव्या वेतन आयोगाशी सुकथनकर संबंधित होते. आयोगाच्या शिफारशी प्रत्यक्षात कशा अमलात आणाव्यात यासंबंधी त्यांनी केलेले मार्गदर्शन विशेष मोलाचे ठरले. त्यांनी नागरी पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था आणि विल्हेवाट समितीवर महत्त्वाचे काम केले. ‘सुंदर शहर, स्वच्छ शहर’ या विचाराला चालना देण्यात सुकथनकर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे होते. एक आदर्श प्रशासक या नात्याने त्यांनी सतत प्रशासकीय सुधारणांचा विचार केला. प्रशासन साधे, स्वच्छ, पारदर्शी आणि गतिमान असावे ह्यावर सुकथनकर यांचा भर असतो. २००३ मध्ये त्यांनी प्रशासकीय सुधारणा समितीचा अहवाल शासनाला सादर केला होता. भारत सरकारच्या पर्यावरण आणि वनसंपदा मंत्रालयाकडून इ.स. २००० मध्ये किनारपट्टीवरील पर्यावरण संवर्धन आणि रक्षण यासाठी एक समिती नियुक्त केली गेली. सुकथनकर त्या समितीचे सदस्य होते. किनारपट्टीवरील नियंत्रण सर्व घटक राज्यांना लागू करण्याचे काम आणि त्यासंबंधीचे नियम तयार करण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले होते. ते ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ या बिगर शासकीय सेवाभावी संघटनेचे सल्लागार सदस्य आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा निसर्गप्रिय उपयोग करून कोकण भूमीचा सर्वांगीण विकास कसा घडवून आणता येईल, याबाबत ही संघटना कार्यरत आहे. सेवानिवृत्तीनंतर ही बिगर शासकीय सेवाभावी संस्था, शासन आणि खाजगी उद्योग यांचा सुयोग्य मेळ घालून काही भरीव कार्य करणेे ही फारच कठीण बाब म्हणावी लागेल. परंतु एक सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी किती भरीव कामगिरी करू शकतो ह्याचे सुकथनकर हे एक चांगले उदाहरण आहे. - प्रा. विजय देव

सोडल, सुरेश विठ्ठल सचिव-जलसिंचन विभाग १० मार्च १९४८

सुरेश सोडल यांचा जन्म  सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथे झाला. त्यांच्या वडिलांनी १९४२ च्या चळवळीत भाग घेतला होता. १९४३ साली तुरुंगातून मुक्तता झाल्यावर त्यांनी अशिक्षित लोकांसाठी प्राथमिक रात्रशाळा काढली. त्यांच्या आई राधनबाई जिल्हा परिषदेच्या शाळेच्या अध्यक्ष होत्या.

गावात शाळा आणि चांगला रस्ता बांधण्याची परवानगी घेण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी बांधकाम विभागात त्यांच्या वडिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तेव्हा आपल्या मुलाने इंजिनिअर व्हावे व खेड्यातील लोकांचे प्रश्‍न सोडवावेत असे त्यांना शिल्पकार चरित्रकोश