पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुकथनकर, दत्रात्रेय महादेव प्रशासन खंड यांनी १९८३ मध्ये राजू शहाबुद्दीन याचा पहिला एन्काउण्टर केला. त्याच्यावर बलात्कार व खुनाचे अनेक आरोप होते. त्यांना या शौर्याबद्दल ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ देण्यात आले होते. त्यानंतर साळसकरांनी आपल्या कारकिर्दीत अमर नाईक, जग्गू शेट्टी, साधू शेट्टी, कुंदनसिंग रावत, झाहूर रमाखंडा अशा कुविख्यात गुंडांना तसेच अरुण गवळीच्या टोळीतील अनेक गुंडांना ठार केले. अखेरच्या काळात ते मुंबई पोलीस दलात खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख होते. - शैलेश राजपूत

सुकथनकर, दत्तात्रेय महादेव मुख्य सचिव-महाराष्ट्र शासन, केंद्रीय नगर विकास मंत्रालय २१ फेब्रुवारी १९३२ भारतीय प्रशासकीय सेवेत सुमारे तीन दशकांहून अधिक काळ सेवा करणार्‍या दत्तात्रेय महादेव सुकथनकर यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे आईवडील हे दोघेही बडोदा संस्थानात नोकरी करीत होते. दत्तात्रेय सुकथनकर १९४७ मध्ये मुंबई विद्यापीठातून मॅट्रिक परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे बडोद्याच्या सर प्रतापसिंहराव कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी बी.कॉम. ही बडोदा विद्यापीठाची पदवी उच्च श्रेणीत प्राप्त केली. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयामधून पूर्ण करून एम.कॉम. ही पदवी प्राप्त केली. नंतर त्यांनी सुरत येथील के.पी. वाणिज्य महाविद्यालयात व्याख्याता म्हणून काम केले. एकीकडे अध्यापनाचा अनुभव घेत असताना त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारीही होत होती. वयाच्या चोविसाव्या वर्षी (१९५६) त्यांची आय.ए.एस.साठी निवड झाली. तेव्हापासून सुमारे साडेतीन दशके त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत विविध खात्यांमध्ये विविध अधिकारपदे भूषविली. शिक्षण खात्यात उपसचिव व सचिवपदी ते सर्वाधिक काळ राहिले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर त्यांच्या प्रशासकीय कार्याला विशेष बहर आला. १९६२ मध्ये वसंतराव नाईक यांच्या काळात नव्यानेच स्थापन झालेल्या पुणे जिल्हा परिषदेचे ते पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. १९६४ ते १९७२ अशी आठ वर्षे ते महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागात उपसचिव होते. पुढे १९७६ ते १९७९ पर्यंत त्याच खात्याचे सचिव म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. नंतर त्यांनी औद्योगिक विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले. पुढे वर्षभर मुंबई महानगराचे आयुक्त व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी आपले उत्तरदायित्व पार पाडले. पुढील दोन- तीन वर्षे ते भारत सरकारच्या नगरविकास मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहत होते. नंतर महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिवपद भूषवून ३१ ऑगस्ट १९९० रोजी सुकथनकर रोजी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले.

शिल्पकार चरित्रकोश