पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड साळसकर, विजय सहदेव बांग्लादेश, चीन, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, लाओस पीडीआर व मॉरिशस यासारख्या अनेक देशांतील अधिकार्‍यांचे प्रशिक्षण केले. दुधवा राष्ट्रीय वन, उत्तर प्रदेश येथील पर्यावरण विषयक अनेक संशोधन प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. तसेच याच उद्यानातील पाणघोडा प्रकल्प, बिहार, उत्तर प्रदेश व बंगालमधील उंच गवत क्षेत्र, भारतीय कोल्हा प्रकल्प, सातपुड्यातील जैवविविधता प्रकल्प यासारख्या अनेक प्रकल्पातही त्यांचा सहभाग होता. त्यांचे अनेक संशोधन पर लेखही प्रसिद्ध झाले आहेत. स्वेच्छानिवृत्तीनंतरही विश्वास सावरकर कार्यरत आहेत. २००४ च्या दरम्यान मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली याच्या आसपास मोठ्या प्रमाणावर बिबट्याने हल्ले केले. याचा अभ्यास करून उपाय सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विश्‍वास सावरकरांची नियुक्ती केली होती. त्यांनी दिलेल्या सूचना नंतर यशस्वीपणे अमलात आणल्या गेल्या. ‘गाईड फॉर प्लॅनिंग वाईल्डलाइफ मॅनेजमेंन्ट इन प्रोटेक्टेड एरियाज अन्ड मॅनेजड् लॅन्डस्केप’ हे मार्गदर्शक पुस्तक त्यांनी २००५ मध्ये लिहिले. २००५ पासून त्यांनी प्रशिक्षण, संशोधन व अकादमीत काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. २००४-२००५ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मध्ये बदल सुचविणार्‍या समितीचे ते सभासद होते.२००६-०७ मध्ये जागतिक बँकेतर्फे सातपुडा जंगलातील जैवविविधता संरक्षण समितीचे ते सदस्य होते. महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्याची सीमा आखणी करणार्‍या समितीचे २००७-०८ मध्ये अध्यक्ष होते. सध्या विश्वास सावरकर मध्य प्रदेशातील सहा व्याघ्र प्रकल्पांच्या समितीचे अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र व अंदमान निकोबारच्या राज्य वन्यजीव सल्लागार समितीचे सदस्य आहेत. डेहराडून येथील डि.जी.एन.एफ.ए.मध्ये विविध अभ्यासक्रमात व्याख्याते म्हणूनही ते काम पाहतात. पुणे येथील भारती विद्यापीठाच्या पर्यावरण शिक्षण व संशोधन संस्थेत पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही ते मार्गदर्शन करतात. - आशा बापट

साळसकर, विजय सहदेव महाराष्ट्र पोलीस सेवा प्रमुख-खंडणीविरोधीपथक,मुंबईपोलीसदल ५ एप्रिल १९५७ - २६ नोव्हेंबर २००८ विजय सहदेव साळसकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एडगाव येथे झाला. त्यांनी मुंबई येथील दालमिया महाविद्यालयात बी.कॉम. व मुंबई विद्यापीठातून एम.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांना सायकल चालवण्याचे वेड होते. त्यांनी सायकलने मुंबई-गोवा, मुंबई-दिल्लीपर्यंत प्रवासही केला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाच वर्षे त्यांनी ‘न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी’त मासिक ७५० रु. पगारावर नोकरी केली. गुन्हेगारी जगाबद्दल मुळातच चीड असल्यामुळे १९८३ मध्ये ते पोलीस दलात रुजू झाले. १९८३ मध्ये साळसकर यांनी नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयात महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले. विजय साळसकर हे मुंबई पोलीस दलात ‘एन्काउण्टर स्पेशलिस्ट’ या नावाने ओळखले जायचे. त्यांनी आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे पंचाहत्तरहून अधिक गुंडांना ठार केले होते. दि. २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ते दहशतवाद्यांचा सामना करत असताना धारातीर्थी पडले. विजय साळसकर यांना त्यांची देशभक्ती व शौर्याबद्दल मरणोत्तर ‘अशोकचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. विजय साळसकर शिल्पकार चरित्रकोश